Maize Price Rate High | मक्का य पिकाची लागवड केली आहे का? केली असेल तर व्हाल मालामाल पहा काय असणार भाव

Maize Price Rate High | मक्का य पिकाची लागवड केली आहे का? केली असेल तर व्हाल मालामाल पहा काय असणार भाव

Maize Price Rate High

Maize Price Rate High: आता सध्या देशात मक्याचा दर तेजीत आहे. मक्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा हा कमी होत असल्याने दराला आधार मिळतोय. तर खरिपातही मका लागवडीत अपेक्षेप्रमाणं वाढ झाली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातही मकाचा दर हा तेजीत राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

Maize Price Rate High

जगात मका हे महत्वाचउत्पादन आहे. मका ह्या पिकाला उष्ण आणि कोरड्या हवामानाचा फटका बसतोय आहे. त्यामुळं जागतिक मका पुरवठा मर्यादीत होण्याची शक्यता व्यक्त होतेय.अमेरिकेचा कृषी विभाग अर्थात युएसडीएनं नुकत्याच प्रसिध्द केलेल्या अहवालात २०२२-२३

या वर्षात जागतिक मका उत्पादनात ३९१ लाख टनांची घट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यंदा अमेरिका आणि युरोपियन युनियनमध्ये मका उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. तसंच रशिया आणि युक्रेनमध्येही मका पिकाला फटका बसतो आहे.

मकाचे उत्तपादान घटत चालले आहे

सध्या जागतिक पातळीवर मका निर्यातीत अमेरिका आघाडीवर आहे. मात्र येथील पिकाचं दुष्काळामुळं नुकसान होतंय. त्यामुळं यंदा अमेरिकेतील मका उत्पादन हे १९२ लाख टनांनी कमी राहून ३ हजार ६४७ लाख टनांवरच स्थिरावेल, असा अंदाज युएसडीएनं व्यक्त केला जात आहे. तर युनियनमधील रोमानिया, हंगेरी, फ्रान्स, इटली, स्पेन, स्लोवाकिया, बुल्गेरिया आणि जर्मनी या देशांनाही दुष्काळाचा फटका बसतोय.

हेही वाचा : शासन महिलांना देते आहे फ्री शिलाई मशीन येथे करा अर्ज

त्यामुळं युरोपियन युनियनमधील मका उत्पादन हे १०९ लाख टनाने घटणार आहे. युद्धाच्या झळा सोसणाऱ्या युक्रेनमध्येही यंदा उत्पादन १२१ लाख टनांनी घटेल आहे, तर रशियातही उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा कमीच राहील, असा अंदाज युएसडीएनं व्यक्त केलाय.

काय आहेत भाव वाढीचे कारण

तसेच युएसडीएनं यंदा जागतिक मक्याची मागणी स्थिर राहील, तर शिल्लक साठा ५१ लाख टनांनी घटून ६ हजार ६७ लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त केलाय. म्हणजेच यंदाचा शिल्लक साठा हा मागील आठ वर्षांतील दुसरा निचांकी साठा असेल. म्हणजेच यंदा जागतिक बाजारात मक्याचा पुरवठा मर्यादीत असेल. त्यामुळे मका दर तेजीत राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

मक्याचा दर तेजीत

यंदा देशात सध्या मक्याचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी झाला आहे. त्यामुळे परिणामी देशात मका तेजीत आहे. मक्याला चांगला दर मिळत असल्यानं यंदा पेरा वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र ताज्या अहवालानुसार देशात केवळ दीड टक्क्यानेच मक्याची लागवड वाढली.

हेही वाचा : आता आपल्या जमिनीची मोजणी करा फक्त 5 मिनिटात आणि ते ही आपल्या मोबाईलवर

देशात आतापर्यंत जवळपास ८० लाख हेक्टरवर मका आहे. तर बाजारात मकाच्या दर हा २३०० ते २८०० रुपयांच्या दरम्यान आहे. देशातील मागणी बघता मका दरात पुढील काळात २०० रुपयांपर्यंत सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांन कडून व्यक्त केला जात आहे.


📢 मुद्रा योजना अतर्गत व्यवसाय सुरु करण्यासठीमिळत आहे 50 हजार ते 10 लाख रु कर्ज :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!