Mahila Nidhi Yojana | मोदी सरकारने महिलांसाठी केली नवी योजना सुरू, ‘इतक्या’च तासांत मिळणार तब्बल 40 हजार रुपये

Mahila Nidhi Yojana: मोदी सरकार महिला आणि पुरुषांसाठी विविध योजना राबवत आहेत. याशिवाय अनेक राज्य सरकारेही महिलांसाठी विविध योजना (Yojana) राबवत आहेत. त्याचप्रमाणे आता राजस्थानच्या अशोक गेहलोत सरकारने महिला सक्षमीकरणासाठी ‘महिला निधी योजना’ सुरू केली आहे.

Mahila Nidhi Yojana

ही योजना सुरू करण्यामागे सरकारचा उद्देश महिलांना आर्थिकरित्या (Financial) स्वावलंबी बनवण्याचा आहे. या योजनेंतर्गत उपलब्ध (Loan) कर्ज घेऊन महिला आपला व्यवसाय (Business) सुरू करू शकतात.

महिला व्यवसाय करू शकतात

राज्य सरकारने सुरू केलेल्या या योजनेतून महिलांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. कर्जाच्या पैशातून महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. यानंतर राजस्थानच्या महिलांना आर्थिक मदतीसाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही. योजनेअंतर्गत महिलेला अर्ज केल्यानंतर 48 तासांच्या आत कर्ज मिळेल.

हेही वाचा : आपल्या पत्नीच्या नावावर उघडा हे खाते महिन्याला मिळतील 45 हजार रु 

48 तासांत कर्ज मिळण्याची तरतूद

महिला निधी योजनेत 48 तासांत 40 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळण्याची तरतूद आहे. जर तुम्ही यापेक्षा जास्त रकमेसाठी अर्ज केला असेल तर कर्जाची रक्कम खात्यात येण्यासाठी 15 दिवस लागतील. राजस्थानच्या 33 जिल्ह्यांमध्ये 2.70 लाख स्वयं-सहायता गट तयार करण्यात आले आहेत. आतापर्यंत 30 लाख कुटुंबे यात सामील झाली आहेत. राज्यातील एकूण 36 लाख कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे.

अर्थसंकल्पात केली होती घोषणा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या वतीने 2022-23 च्या अर्थसंकल्पात महिला निधी योजनेची घोषणा करण्यात आली होती. तेलंगणानंतर राजस्थान हे दुसरे राज्य आहे, जिथे महिला निधी योजना सुरू करण्यात आली. राज्यातील महिला बचत गटांना बळ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत गरीब आणि मालमत्ता नसलेल्या महिलांनाही सहज कर्ज मिळू शकणार आहे.

हेही वाचा : सायकल खरेदी साठी शासन देते आहे 5 हजार रु अनुदान येथे पहा माहिती 

कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

या योजनेचा उद्देश महिलांचे सक्षमीकरण आणि महिलांचे उत्पन्न वाढवणे हा आहे. ही योजना ग्रामीण उपजीविका विकास परिषदेच्या वतीने राजस्थानमध्ये स्थापन करण्यात आली. योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही महिलेला आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि बँक खात्याची माहिती द्यावी लागेल. सरकार लवकरच या योजनेशी संबंधित अर्ज प्रक्रियेचे अनावरण करणार आहे.


📢 कृषी पंप संच विकत घेण्यासठी शासन देते आहे अनुदान :- येथे पहा 

📢 200 गाई पालन साठी शासन देते आहे 50% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!