Mahatma Phule Jan Arogya Yojana :- महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजना एकत्रित करून राज्यातील सर्वच घटकांना पाच लाखांपर्यंत मोफत
उपचार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तब्बल १३५६ आजार या योजनांमध्ये समाविष्ट केले आहेत. मूत्रपिंडावरील शस्त्रक्रियेसाठी
साडेचार लाखांची तरतूद आहे. सोलापूर जिल्ह्यातील ५१ रुग्णालयांमध्ये या योजना लागू आहेत. रेशनकार्ड नसले तरी या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
Mahatma Phule Jan Arogya Yojana
जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही खुशखबर मानली जात आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना राज्यातील शासकीय आणि बिगर शासकीय मिळून एक हजार रुग्णालयांमध्ये राबविली जात आहे.
दुसरीकडे प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत पाच लाखांचे आरोग्य विम्याचे कवच मिळते. मात्र, या योजनेचे कार्ड असलेले नागरिक किंवा त्यांचे नाव यापूर्वीच योजनेसाठी नोंदविण्यात आले आहे, त्यांनाच लाभ मिळतो.
Free Hospital Treatment
या योजनेसाठी नव्याने नोंदणी करता येत नाही. त्यामुळे अनेकजणांना योजना असूनही लाभ मिळत नव्हता. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने नवीन निर्णय घेत शिधापत्रिका नसली तरीदेखील उपचार देण्याची तरतूद केली आहे.
विशेष बाब म्हणजे योजनांमध्ये आता शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. शिधापत्रिका नसलेल्यांना रहिवासी दाखला द्यावा लागणार असून योजनेतील प्रत्येक रुग्णालयात आरोग्य मित्र असणार आहे. नागरिकांसाठी स्वतंत्र कॉल सेंटरदेखील उभारले जाणार आहे.
✍️ हेही वाचा :-छतावर सौर पॅनेल मोफत बसवता येतील, 20 वर्षांसाठी मोफत वीज उपलब्ध असेल, येथून त्वरित ऑनलाइन अर्ज करा
कोण असणार लाभार्थी?
- – गट – अ : पिवळे, केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंब
- – गट – ब : शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंब (शासकीय/ निमशासकीय कर्मचाऱ्यांसह) व शिधापत्रिकाधारक नसलेले कुटुंब.
- – गट- क : गट ‘अ आणि ब’मध्ये समाविष्ट न होणारे शासकीय, शासनमान्य आश्रम शाळेतील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, तसेच माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांतील सदस्य, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत व महाराष्ट्राबाहेरील बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंब.
- – गट – ड : महाराष्ट्र सीमा भागातील रस्ते अपघातात जखमी झालेले महाराष्ट्राबाहेरील व देशाबाहेरील रुग्ण.