Mahatma Fule Karjmukti Yojna | प्रोत्साहनपर अनुदानाच्या दुसऱ्या यादीची अजूनही 18 हजार 800 शेतकऱ्यांना प्रतीक्षा ! पहा कधी येणार यादी

Mahatma Fule Karjmukti Yojna: नमस्कार महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत नियमित पीक कर्ज भरणाऱ्या. शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान शासनाकडून देण्यात येत आहे.

प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी शासनाकडून दिनांक 14 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली आहे.

तसेच यादीत नाव आलेल्या व केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा ही करण्यात आले होते. त्यानंतर दुसरी यादी जाहीर होण्याची अपेक्षा असताना तब्बल दोन महिन्यानंतरही ती जाहीरच करण्यात आलेली नाही.

Mahatma Fule Karjmukti Yojna

त्यामुळे जिल्ह्यात 18800 शेतकरी अनुदानापासून वंचित असल्याचे चित्र आहे. राज्य शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबविण्यात आली. या योजनेअंतर्गत शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.

प्रोत्साहन अनुदान रखडले

पहा कधी येणार प्रोत्साहनपर अनुदानाची दुसरी यादी येथे क्लिक करा 

जून महिन्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रोत्साहन अनुदान रखडले होते. त्यानंतर स्थापन केलेल्या एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस. यांच्या सरकारने प्रोत्साहन अनुदान देण्याचा उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा निर्णय कायम ठेवला होता.

तसेच दिवाळीपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील 21,465 शेतकऱ्यांच्या खाती बँकाकडून अपलोड करण्यात आली होती.

या योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या पहिल्या यादीत जिल्ह्यातील तीन हजार एक शेतकऱ्याची नावे होती. त्यापैकी 2600 शेतकऱ्यांनी आधार प्रमानीकरण केल्याने त्यांच्या खात्याला अनुदान जमा करण्यात आले. तर अठरा हजार आठशे शेतकऱ्यांना अजूनही अनुदान देण्यात आलेले नाही.

पहा कधी येणार प्रोत्साहनपर अनुदानाची दुसरी यादी येथे क्लिक करा 

Leave a Comment