Maharashtra ST Workers :- वारंवार मागणी करूनही प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याचे पाहून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी ( ST Workers) पुन्हा एकदा आंदोलनाचे अस्त्र उपसण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या कोअर कमिटीची बैठक औरंगाबाद येथे नुकतीच पार पडली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला.
Maharashtra ST Workers
जवळपास दोन वर्षापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जवळपास पाच महिने संप (ST Workers Strike) पुकारला होता. एसटी महामंडळाचे विलिनीकरण, वेतन वाढ आणि इतर मागण्यांवर हा संप करण्यात आला होता. विशेष म्हणजे एसटीमधील मान्यताप्राप्त अथवा प्रस्थापित असलेल्या संघटनेने संप पुकारला नव्हता.
एसटी महामंडळाचे कर्मचारी
एसटी कर्मचारी संघटनेने आता आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. यापूर्वी झालेल्या करारातील तरतुदीनुसार शासनाने देय असणारा 42 टक्के महागाई भत्ता लागू करावा, घरभाडे भत्ता, वेतनवाढीचा दर यांचा फरक, मूळ वेतनात जाहीर झालेल्या.
रुपये पाच हजार, चार हजार, अडीच हजारामुळे ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात निर्माण झालेल्या विसंगती दूर कराव्यात, 4849 कोटींमधील शिल्लक रकमेचे वाटप त्वरीत करण्यात यावे, या रकमांचे समायोजन करून दहा वर्षांसाठी सातवा वेतन आयोग लागू करावा.
एसटी कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे
वाहन रोजनाम्यानुसार प्रत्यक्ष धाववेळ देण्यात यावी, नवीन बसेसचा पुरवठा करण्यात यावा, सेवानिवृत्तांना पत्नीसह व विद्यमान कर्मचाऱ्यां ना सर्व प्रकारच्या गाड्यांचा वर्षभर मोफत फॅमीली पास देण्यात याव्या, या मागण्यांसह आणखी पाच मागण्यांचा त्यात समावेश आहे.
त्याची पूर्तता होत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे. या पार्श्वभूमीवर, 3 ऑगस्टला औरंगाबादमध्ये महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
हेही वाचा :- काय सांगता ? आता थेट पेट्रोल शिवाय धावणार Bajaj ची ही नवीन बाईक !, किंमतही एवढीच !, पहा संपूर्ण माहिती