LPG Cylinder Price | ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी चांगली बातमी ! 100 रुपयांनी स्वस्त झाला LPG सिलेंडर, पहा तुमच्या जिल्ह्यातील एलपीजी सिलेंडर किती दर ?

LPG Cylinder Price :- ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांनी एलीपीजी गॅसच्या दरात मोठी कपात केली आहे. त्यानुसार,

व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 99.75 रुपयांनी स्वस्त झाला आहे. यामुळं हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. 

LPG Cylinder Price

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील गॅसचे दर

  1. मुंबई :- (1102.50 घरगुती), (1640.50 व्यावसायिक)
  2. ठाणे :- (1102.50), (1640.50)
  3. नागपूर :- (1154.50), (1864.50)
  4. पुणे :- (1006), (1701)
  5. नाशिक :- (1106.50), (1716)
  6. छत्रपती संभाजीनगर :- (1111.50), (1745)
  7. कोल्हापूर :- (1105.50), (1660)
  8. सातारा :- (1107.50), (1708)
  9. सोलापूर :- (1118.50), (1732)
  10. सिंधुदुर्ग :- (1117), (1678)

घरगुती गॅस सिलेंडरमध्ये बदल नाही

घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या (14.2 किलो) दरात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राज्याच्या राजधानीत मुंबईत घरगुती गॅसचा दर 1102.50 रुपये इतका आहे. या किंमतीत शेवटचा बदल 1 मार्च 2023 रोजी

झाला होता. तीन वर्षात घरगुती गॅसच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. सध्या घरगुती गॅस सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेला आहे. तसेच यावरील सबसिडी देखील बंद झाल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

✍️ हेही वाचा :- छतावर सौर पॅनेल मोफत बसवता येतील, 20 वर्षांसाठी मोफत वीज उपलब्ध असेल, येथून त्वरित ऑनलाइन अर्ज करा.

Leave a Comment