कायदा काय सांगतो
वडिलोपार्जित मालमत्तेच्या बाबतीत एक ते दोन पिढ्यानतर मुलीचे हक्क जवळजवळ कमी तर होत जातात. परंतु 2005 मध्ये हिंदू उत्तराधिकारी कायद्यात काही बदल केला आहे. त्या कायद्यानुसार आता वडिलांच्या संपत्ती मध्ये आता मुलीला मुला इतकाच अधिकार देण्यात आला आहे.
मुलिला संपत्ती मध्ये हक्क कधी मिळत नाही
जर एखाद्या मुलीने तिच्या वारसा हक्काचा त्याग केला तर तिला मालमत्तेत कोणताही हक्क मिळत नाही. मग ही मालमत्ता तिच्या वडिलांची स्व कष्टाअर्जित असो किंवा वडिलांची स्वतंत्रपणे मिळवलेली मालमत्ता असो. जर मुलीने तिचा वाटा सोडला असेल आणि नोटरी बोंड वर तिची स्वाक्षरी असेल. आणि त्या कागदपत्राची कागद नोंद झाली असेल तर त्यावर मुलीचा कोणताही अधिकार उरत नाही.
जर वडिलांनी स्वतः मिळवलेल्या मालमत्तेला मृत्युपात्रात मुलीच्या नावे लिहून मुलींना पूर्णपणे नाकारले असेल. आणि या मृत्युपत्र ची नोंद झाली असेल तर वडिलांच्या मृत्यूनंतर मुलींना मालमत्तेत कोणताही अधिकार मिळत नाही.
परंतु हे लक्षात घ्या की वडील स्वतः घेतलेली मालमत्तेच मृत्युपत्र करू शकतात. परंतु वडिलोपार्जित संपत्तीच्या संदर्भात कोणतीही मृत्युपत्र करू शकत नाही. ती व्यक्ती आपल्या मुलीचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही.