Land Measurement App Best | मोबाईलवरून जमिनीची मोजणी करा मिनिटात! वाचा स्टेप बाय स्टेप जमीन मोजण्याची पद्धत 1

Land Measurement App: जमीन मोजणी म्हटले म्हणजे अर्ज करा त्याच्यानंतरची ती प्रक्रिया आणि मोजणी  शेतापर्यंत येण्यासाठी लागणारा कालावधी हा खूप जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेकदा मनस्ताप सहन करावा लागतो.

तसेच बऱ्याचदा कार्यालयांचे हेलपाट्या मारण्यामध्ये वेळ आणि पैसा देखील वाया जातो. त्यामुळे जमिनीची मोजणी पारदर्शक आणि पटकन व्हावी याकरिता आता रोव्हर यंत्रांची मदत घेतली जात आहे.

Land Measurement App

या यंत्रांच्या मदतीने जमीन मोजणीची प्रक्रिया कमीत कमी वेळामध्ये पूर्ण होते. यामुळे खर्च आणि वेळ दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणावर बचत होते. परंतु याही पुढे जात जर आपण पाहिले तर मोबाईलच्या मदतीने देखील जमीन मोजता येते.

ही देखील एक अगदी सोपी पद्धत असून तुम्ही तुमच्या (Land Measurement App) मोबाईलच्या साह्याने जमीन कमीत कमी वेळेमध्ये मोजू शकतात. लेखामध्ये आपण मोबाईल ने जमीन कशी मोजायची याच्या स्टेप बाय स्टेप पद्धत समजून घेणार आहोत.

मोबाईलद्वारे जमीन मोजायच्या स्टेप्स

1- पायरी पहिली याकरिता सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईल मध्ये तुम्हाला जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर नावाचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करणे गरजेचे आहे.

2- पायरी दुसरी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर ते ओपन करावे व हे ॲप्लिकेशन वापरत असताना तुमच्या मोबाईल मध्ये जीपीएस नेहमी चालू असणे गरजेचे आहे व तुमच्या मोबाईल मधील इंटरनेटचा स्पीड देखील उत्तम असायला हवा. जेणेकरून हे ॲप्लिकेशन उत्तम पद्धतीने काम करू शकेल.

3- पायरी तिसरी जिओ एरिया एप्लीकेशनने मोजमाप सुरू करण्या अगोदर त्याची सेटिंग व्यवस्थित करून घेणे गरजेचे आहे. यासाठी ॲप ओपन करावे आणि फील्ड मापन या पर्यायावर क्लिक करावे आणि येथे जा आणि क्षेत्र युनिटवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकर निवडायचे आहे.

4- पायरी चौथी बाकीचे महत्त्वाच्या बाबी सेट केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक त्रिकोणी चिन्ह दिसते. या ठिकाणी तुम्हाला जीपीएस वापरा या पर्यायावर क्लिक करून निवडावे लागेल आणि जेव्हा आपण ते निवडतात तेव्हा आपले एप्लीकेशन पुन्हा आपले स्थान बदलले. एप्लीकेशनने स्थान बदलल्यानंतर प्लस या चिन्हावर क्लिक करावे आणि जमिनीचे मोजमाप सुरू करावे.

5- पायरी पाचवी मोजमाप सुरू करण्यासाठी तुम्हाला जिथून सुरुवात करायची आहे प्रथम तुम्ही तिथे उभे रहा व आता आपल्याला प्लस चिन्हावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आपल्या शेतात फिरवू या असे आल्यानंतर तुम्ही चालत जायचे आहे.

ठिकाणी तुम्हाला वळण घ्यायचे (Land Measurement App) आहे किंवा फोल्ड करायचे आहे त्यावरील प्लस चिन्हावर क्लिक करावे. अशाप्रकारे तुम्ही ज्या ठिकाणाहून चालायला सुरुवात केली असेल त्या ठिकाणी येऊन तुम्ही थांबाल.

जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर ॲप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

6- पायरी सहावी फेरफटका मारल्यानंतर तुम्ही थांबल्यानंतर जमिनीचे क्षेत्रफळ निवडले जाते. त्या ठिकाणी तुम्ही जिओ एरिया जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर ॲप मध्ये एकर मधील जमिनीचे वास्तविक मोजमाप तपासू शकतात व एकूण किती एकर जमीन आहे हे दाखवले जाईल.

मोबाईल वरून जमीन मोजण्यासाठी ॲप

मोबाईलवर जमीन (Land Measurement App) मोजण्याकरिता तुम्ही जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर हे ॲप वापरू शकता व गुगल प्ले स्टोअर वर मोफत डाउनलोड करू शकता.

1 thought on “Land Measurement App Best | मोबाईलवरून जमिनीची मोजणी करा मिनिटात! वाचा स्टेप बाय स्टेप जमीन मोजण्याची पद्धत 1”

Leave a Comment