Lalya Disease In Cotton | कपाशी वरील लाल्या का होतो ? व त्याचे नियंत्रण कसे करावे

Lalya Disease In Cotton: नमस्कार आपल्या महाराष्ट्रात कापसाचे उत्पन्न हे खूप मोठ्या प्रमाणावर घेण्यात येत. पण गेल्या काही वर्ष्यासपासून कापशी पिकावर बोड अली म्हणजेच गुलाबी रंगाचा अळी येत आहे.

पण त्या मध्ये आणखी एक असा रोग आहे. जो कपाशी पिकाला खूप हानिकारक आहे.. तो म्हणजे लाल्या रोग हा रोग कपाशी ला पाते लागण्याच्या वेळेला येतो. याच लाल्या रोगविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

Lalya Disease In Cotton

तस तर शेतकऱ्यांना माहितीच आहे. की कोणत्या पिकावर कोणते रोग येतात पण कापशी सारख्या पिकाला जास्त नुकसान देणारा. रोग म्हणजे लाल्या रोग या रोगांमुळे कापशी च्या झाडाची सर्व पाने लाल पडून हे गळायला सुरवात होते.

हेही वाचा :- कुकुट पालन साठी शासन देणार 75% अनुदान आजच करा ऑनलाईन अर्ज 

आणि हळू हळू पूर्ण झाड हे सुकून जाते जर आपण या रोगाचे वेळीच नियंत्रण नाही केले तर. अपल्याय मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होईल कारण जर हा रोग आला तर संपूर्ण शेतातल्या पिकाला घेऊन बसतो.

लाल्या रोग होण्याचे करणे 

  1.  या लाल्या रोगाचे कारण काय आहे. हे बघू जर आपण कापशी पीक लावण्याआधी जर त्या जमिनीमध्ये असे पीक घेतले असेल. की ज्या पिकाला जमिनीतील अन्नद्रव्ये खूप जास्त प्रमाणात लागतात जसे. की केळी किंवा ऊस हे पीक लावले असेल तर हा लाल्या रोग तुमच्या कपाशीच्या लागू शकतो. करण हे पीक जमिनीतील खूप जास्त प्रमाणात अन्नद्रव्ये हे खाऊन टाकतात. त्या मुळे जमीन ही उत्पन्न क्षमतेला कमी पडते.
  2. याचे दुसरे कारण असे आहे की शेतकरी आपल्या शेतामध्ये वारंवार एकाच पीक घेत असतो त्या मुळे जमिनीतील सुपीकता कमी होते म्हणजेच जर आपण आपल्या शेतात कापशी वर परत दुसरे पीक पण कापशी घेत असाल तर हा लाल्या रोग होऊ शकतो
  3. कापशी लागवड साठी आपण कोणत्या जमिनीची निवड करतो यावर देखील हे अवलंबून असते की पिकावर किती प्रमाणात रोगाचा प्रदूर भाव होतो त्यासाठी कापशी लागवड करण्यासाठी हलकी किंवा मुरमाड जमीन निवडणे टाळावे
  4. बऱ्याचदा पावसाळ्यात जास्त पाऊस झाल्यामुळे जमिनीत जास्त पाणी साचून राहिले व अशा पाण्याचा निचरा व्यवस्थित आणि पटकन झाला नाही तर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव होतो.

हेही वाचा :- 500 शेळ्या 25  बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान येथे करा अर्ज 

हे आहेत लाल्या रोगाचे कारण 

  1. याउलट, पावसामुळे पाण्याचा ताण पडला तर त्याचा परिणाम जमिनीतील नत्र, मॅग्नेशियम सारखी आवश्यक मुलद्रवे कपाशीच्या झाडाला हव्या त्या प्रमाणात शोषता येऊ शकत नाही. हेदेखील एक महत्त्वाचे कारण या रोगामध्ये आहे.
  2. जेव्हा कपाशीची बोंडांवस्था असते, तेव्हा कपाशीच्या पिकाला जास्त प्रमाणात नत्राची गरज असते. नेमक्या याच वेळी जर नत्राचे प्रमाण कमी झाले तर कपाशीची पाने लाल होतात.
  3.  बीटी जनुक असलेल्या कपाशीच्या जाती मध्ये बोंड आळीला प्रतिबंध करण्याचा गुणधर्म असल्यामुळे झाडावर जास्त बोंडे टिकून राहतात व साहजिकच जास्त बोर्डांना परिणामी जास्त नत्राची गरज भासते.
  4. अशा वेळी जमिनीतून लागणाऱ्या आवश्यक त्या नत्राचा पुरवठा न झाल्याने बोंडाना लागणाऱ्या नत्राची गरज ही कपाशीच्या पानाच्या माध्यमातून भागविली जाते. त्यामुळे पानांमध्ये नत्राचे प्रमाण कमी होऊन कपाशीचे पाने लाल पडू लागतात.
  5. तसेच रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाला म्हणजे तुडतुडे किडी चा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास कपाशीचे पान सुरुवातीला कडेने लाल पडून नंतर संपूर्ण पान लालसर दिसते.

लाल्या रोगाचे नियंत्रण कसे करावे 

 

  1. कापशी वरील लाल्या रोगाचे प्रमाण नियंत्रण कसे करावे हे जाणून घेऊ या
  2. कापशी लागवड करताना अतिशय हलकी जमीन निवडणे टाळावे
  3. ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा चागल्या प्रमाणात होतो अश्या ठिकाणी लागवड करावी
  4. कापशी पिकाला त्याच्या योग्य वेळी खताची योग्य मात्र ही द्यावी
  5. कोरडवाहू क्षेत्रासाठी ही नत्राची मात्रा ही 2 वेळा विभागून द्यावी

हेही वाचा :- 200 गाई पालन साठी शासन देते 50% अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज

  1. तसेच कपाशीच्या निरनिराळ्या अवस्था जसे की बोंडे भरणे, पाते लागणे यासारख्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये दोन ते तीन वेळेस दोन टक्के युरिया किंवा डीएपीची फवारणी करावी.
  2. एवढ्या प्रमाणात काळजी घेतल्यानंतर घेतल्यावर जर लाल्या रोगाची लक्षणे कपाशीवर दिसून लागल्यात. चाळीस ग्रॅम मॅग्नेशियम परफेक्ट प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून शिफारसीनुसार दोन ते तीन फवारण्या कराव्यात. अथवा जमिनीतून 20 ते 30 किलो मॅग्नेशियम सल्फेट प्रती फॅक्टरी द्यावे.
  3. कपाशीवर मावा तुडतुडे फुलकिडे यासारख्या रस शोषक कीटकांचा प्रादुर्भाव दिसत असेल तर त्याच्या नियंत्रणासाठी फी क्रोनील 20 मिली किंवा दहा मिली इमिडा क्लोप्रिड किंवा 20 मिली बुप्रोफेझिन 25 एस सी प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

📢 कुसुम सोलर पंप साठी शासन देतेय 95% अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाळ योजने अतर्गत शासन देणार 50% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!