Khatache Bhav 2022 | सर्व खतांचे नवीन दर पहा

Khatache Bhav 2022 | सर्व खतांचे नवीन दर पहा

Khatache Bhav 2022

Khatache Bhav 2022: खरीप हंगामासाठी शेतकरी बियाणे व खतासाठी पैसे जमवत असतो. यामध्ये बियाणे व खतांच्या किंमतीत डबलने वाढ झाल्याने शेतकरी अडचणीत आला. तर या लेखात आपण खतांच्या किंमती बाबत जाणून घेणार आहोत.

Khatache Bhav 2022

यंदा खतांच्या किंमतीत चांगलीच वाढ झालेली आहे. सर्व कंपन्यांनी आपल्या खतांचे दर 200 ते 300 रुपयांनी वाढविले आहेत. तर जाणून घेऊया कोणत्या कंपनीने खतांच्या दरात किती वाढ केली जाणून घेऊया.

खताचे नवे दर

पोटॅश खतांच्या किंमतीत दुपटीने वाढ झालेली आहे. मागील वर्षी पोटॅश खत 930 रुपयांना मिळत होते. परंतु, यंदा पोटॅश खताची किमत 1700 रुपये झाली आहे. (Khatache Bhav)

डीएपी खताची बॅग 1200 रुपयांना मिळत होती. परंतु, यावर्षी सर्व डीएपी उत्पादक कंपन्यानी 50 किलोची डीएपी बॅग 1350 रुपयांना मिळणार आहे. म्हणजेच डीएपी खताची किंमतीत 150 रुपयांनी वाढ झाली आहे.

10:26:26 खत उत्पादकांनी हा ग्रेड 1470 रुपयांनी मार्केट मध्ये उपलब्ध केलेला आहे. मागील वर्षी या ग्रेडची किंमत 1250 रुपये होती. यंदा 200 रुपयांनी या ग्रेड मध्ये वाढ झालेली आहे.

खताचे भाव 2022

20.20.0.13 या ग्रेडची किंमत कोरोमंडल कंपनीने 1450 रुपये एवढी ठेवली आहे. तसेच इफ्को कंपनीने या ग्रेडची किंमत 1400 रुपये आहे. झुआरी-कृभकोचा 1470 रुपयांनी मार्केट मध्ये उपलब्ध झालेला आहे.

15.15.15 खतांचा ग्रेडची किंमत 1500 रुपये एवढी ठेवली आहे. 16.20.0.13 हा ग्रेड 1475 रुपयांनी मार्केट मध्ये उपलब्ध झालेला आहे.

युरियाचा दर मागील वर्षाप्रमाणे एका बॅगमागे 266 रुपये एवढाच आहे. तर यंदा अशाप्रकारे खतांच्या किंमती आहे. खतांच्या या किंमती पाहून समजलेच असेल की, खतांच्या किंमती वाढल्या आहेत.

खत खरेदी करताना ही काळजी घ्या :-

 

  • ज्या ठिकाणांहून खत खरेदी करत आहे त्या दुकान मालकांकडे खते विक्रीचा परवाना आहे की नाही तपासून घ्या.
  • खत विक्रेत्यांकडून तुम्हाला खत खरेदी केल्यानंतर पावती मिळते. त्या पावती नंतर संबंधिचा परवाना क्रमांक नमूद केलेला असतो.
  • रासायनिक खतांची विक्री ई-पॉश मशीन मधून करावी अशी केंद्र सरकारची सूचना आहे. त्यासाठी शेतकऱ्याला आधार कार्ड सोबत असणं आवश्यक आहे.
  • तुम्हाला प्रिंट दिली जाते त्यामध्ये खताची एमआरपी दिलेली असते. या प्रिंट मध्ये दिलेले रेट आणि खतांच्या बॅगवर एकच असायला हवे. जर असे नसल्यास याबाबतची तक्रार कृषी विभागाकडे करता येते.

खताचे किंमतीत वाढ झालेली आहे. तसेच खत खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत माहिती दिलेली आहे. ही माहिती शेतकऱ्यांनासाठी महत्वाची आहे. ही माहिती पुढे नक्की शेअर करा.


📢 ऊस पाचट कुट्टी मशीन वर मिळणार 50% अनुदान :- येथे पहा 

📢 नवीन विहीर साठी मिळणार 3 लाख अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!