Khat Niyantran Che Upay | आपण पिकला दिलेली खाते हे त्यांना मिळतात की नाही हे कसे ओळखायचे

Khat Niyantran Che Upay | आपण पिकला दिलेली खाते हे त्यांना मिळतात की नाही हे कसे ओळखायचे

Khat Niyantran Che Upay

Khat Niyantran Che Upay: नमस्कार शेतकरी बंधुनो आपण आज पर्यंत आपल्या पारंपरिक पद्धतीने आपल्या शेतात हे रासायनिक खते टाकत असतो. परन्तु तुम्हाला माहिती आहे का? आपण टाकलेले खत हे नेमके आपल्या पीक पर्यंत पोहचतात. की ते फक्त आपल्या जमिनीला हानिकारक व शेतातील तण साठी उपयुक्त ठरते.

तर आज आपण हेच जाणून घेणार आहोत की आपण आपल्या शेतात वापरल्या जाणारे खत हे वाय तर जात नाही ना. आणि हे खते वाया जाऊ नये म्हणून आपल्या पिकांना खत टाकायचे नेमके पद्धत काय आहे. हे जनम घेणार आहोत जेणेकरून आपला रासायनिक खतांवरील खर्च हा कमी होईल व आपल्या पिक ही चांगले येईल त्या साठी हा लेख सविस्तर वाचा.

Khat Niyantran Che Upay

खताचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. तसेच खताचा तुटवडा आणि जास्त दरात खताची विक्रि होत असल्याने शेतकरी हैरान आहेत. सध्याच्या काळात शेतकरी रासायनिक खताचा जास्तीचा वापर करतात बर्याच शेतकर्याच्या असा समज असतो.

हेही वाचा : सायकल खरेदी साठी शासन देते आहे 5 हजार रु अनुदान येथे पहा माहिती 

की जास्त खत घातले म्हणजे जास्त उत्पादन मिळेल. म्हणुन पिकाला भरमसाठ खताचा पुरवठा केला जातो.पण पिकाला ईतक्या खताची गरज आहे का? आणी दुसरे म्हणजे पिकाला घातलेली खते पिकाला पोहचतात का? याची सवीस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

रासायनिक खताचे नियोजन    

पिकाला गरजेपेक्षा जास्त खते उत्पादन खर्च तर वाढतो शिवाय जमिनीची सुपिकता कमी होते. खत देण्याच्या चुकीचा पध्दतीमुळे बरीच खते वाया जातात. दिलेली खते पिकापर्यत पोहचण्यासाठी काय करायला पाहिजे. मातीपरीक्षण करून रासायनिक खतासोबत सेंद्रिय खताचा सुद्धा वापर केल्याने उत्पादन वाढुन जमीनीची सुपिकता टिकुन राहते.

खताचा कार्यक्षम वापर होण्यासाठी पुढील उपाय करावे.

खते जमीनीत योग्य ओलावा असताना पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत विभागुन द्यावीत. पेरणी करताना खते बियाणाखाली पेरून द्यावीत. खताची मात्रा मुळाच्या सनिध्यात द्यावी. आवरण युक्त खते,ब्रिकेट्स सुपर ग्रँन्युलसचा वापर करावा.

युरीया निंबोळी पेंडीसोबत 5:1 या प्रमाणात द्यावा. पाण्याचा अतीरेकी वापर टाळावा.तृणधान्य पिकासाठी खताचा चार, दोन, एक, याप्रमाणात नत्र,स्पुरद, पालाश आणि गंधक या प्रमाणात तर कडधान्य पिकासाठी एक,दोन,एक,एक याप्रमाणात खताचा वापर करावा.

हेही वाचा : कुकुट पालन साठी शासन देते 75 अनुदान येथे करा ऑनलाईन अर्ज 

माती परीक्षण करून खताचे नियोजन करावे       

माती परीक्षणच्या आधारित शिफारशीनुसार खताचा वापर करावा. सुक्ष्म अन्नद्रव्याच्या वापर फवारणीद्वारे करावा.पिकाचे अवशेष आणि हिरवळीच्या खतांचा वापर करावा. रासायनिक खते,शक्यतो कंपोस्ट खत ,गांंढुळ खत ,शेणखत या सेंद्रिय खतासोबत द्यावीत. याशिवाय रायझोबीयम, पिएसपी यासारख्या जिवाणु खताचा वापर करावा.

  सेंद्रिय खताचा नियमित वापर केल्यामुळे जमिनीचा सामु 6.5 ते 7.5 दरम्यान राहतो.क्षारयुक्त आणि चोपण जमीनीत भुसुधारकांचा म्हणजेच जिप्सम, सेंद्रिय खते,लेंडी खत,प्रेसमड तसेच उसाच्या मळीचा वापर केल्याने जमीनिची प्रत सुधारते. चुनखडी विरहित जमीनिमधे जिप्समचा वापर करावा असा तज्ञाचा सल्ला आहे.


 📢 पीएम किसान मानधन योजना अतर्गत शेतकर्यांना मिळणार 36 हजार रु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सूर :- येथे पहा             

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!