Keep House Flies Away Best | घरात फार माश्या झाल्या, घरभर भिरभिर फिरतात? 5 उपाय, माश्या घरात येणारच नाहीत..

Keep House Flies Away: घरात माश्या शिरल्यानंतर अनेकांची चीड चीड होते. त्यांचा आवाज व वावर अनेकांना सहन होत नाही. माश्या घरात विषाणू आणि बॅक्टेरिया आणतात. व घरात अंडी घालून समस्या आणखी वाढवतात. एवढेच नाही तर ते अन्न आणि पिण्याचे पाणी दूषित करून ते विषारी बनवतात. अशा परिस्थितीत शरीरात विविध आजार उद्भवण्याची शक्यता निर्माण होते.

Keep House Flies Away

माश्या पळवून लावण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. मात्र, सर्व प्रयत्न करूनही माश्या घरात शिरकाव करतातच. ज्यामुळे घरात अदृश्य रोगराई पसरते. माश्या घरात जीवाणू आणि जंतूंना जन्म देतात आणि अनेक प्रकारचे संक्रमण पसरवतात. त्यामुळे घरातून माश्यांना जर पळवून लावायचे असेल तर, ५ काही टिप्स फॉलो करून पाहा. या टिप्समुळे घरात माशे शिरणार नाही

सफरचंद, लिंबू, किंवा एखादा लिंबूवर्गीय फळ घ्या, त्यावर २० लवंग अडकवून ठेवा. व हे फळ एका प्लेटवर ठेवा. आता ही प्लेट टेबलच्या मध्यभागी ठेवा. काही वेळाने आपल्याला दिसून येईल की, सर्व माश्या तेथून गायब झाल्या आहेत. लवंग व लिंबूवर्गीय फळाच्या सुगंधामुळे माश्या घरात शिरणार नाही.

शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

सॉल्ट वॉटर स्प्रे

एक स्प्रे बॉटल घ्या. त्यात एक ग्लास (Keep House Flies Away) पाणी भरा. व 2 चमचे मीठ टाकून मिक्स करा. आता ज्या ठिकाणी माश्या येत असतील त्या ठिकाणी फवारणी करा. सर्व माश्या पळून जातील. आपण यात एसेंशियल ऑईलचा वापर देखील करू शकता.

पुदिना आणि तुळस स्प्रे

माश्या दूर करण्यासाठी आपण पुदिना आणि तुळशीचा वापर करू शकता. यासाठी पुदिना आणि तुळशीच्या पानांची पेस्ट बनवा. व ही पेस्ट पाण्यात मिसळून मिश्रण तयार करा. मिश्रणाचे तयार पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरा. जे कीटकनाशकासारखे कार्य करेल आणि माश्यांना पळवून लावेल.

दूध आणि काळी मिरीचे पाणी

एक कप दूध घ्या, त्यात एक चमचा काळी मिरी घालून मिक्स करा. आता त्यात २ चमचे साखर मिसळा. ज्या ठिकाणी माश्या जास्त आवाज करतात त्या ठिकाणी ठेवा. दुधामुळे माश्या येतील आणि त्यात बुडतील.

व्हीनस फ्लायट्रॅप लावा

आपण घरात व्हीनस फ्लायट्रॅप हे झाड लावू शकता. हे झाड कीटक (Keep House Flies Away) खाते. व्हीनस फ्लायट्रॅप हे झाड घराबाहेर किंवा घरामध्ये ठेवा. ते घरातील सर्व माश्या खातील.


📢 सोलर पंप अनुदान योजना 2023 :- येथे पहा 

📢 कांदा चाळ योजनेचे नवीन अर्ज सुरु :- येथे पहा 

Leave a Comment