Kdaba Kutti Anudan Yojana | कडबा कुट्टी मशीनवर 50% अनुदानावर अर्ज सुरु

Kdaba Kutti Anudan Yojana : नमस्कार मंडळी आम्ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी योजना घेऊन आलो आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे. विशेषता ज्या शेतकऱ्यांकडे जास्त जनावरे आहेत. आणि त्याचा चारा हा खूप जास्त प्रमाणात वाया जातो त्याच्या साठी शयसनाने कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना चालू केली आहे. या योजने नुसार कडबा कुट्टी मशीन वर शेतकऱ्यांना 75%अनुदान दिले जाणार आहे. त्या मुळे शेतकऱ्यांना हे मशीन घ्यायला आर्थिक मदत मिळणार आहे. या साठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तर तो कुठे करायचं तयासाठी कोणते कागतपत्रे लागणार आहे. या विषयी सविस्तर माहिती पाहण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

Kdaba Kutti Anudan Yojana

ज्या शेतकऱ्यांकडे गुरे आहेत त्यांना चारा पाणी व्यवस्थित करावे लागते. यामध्ये प्रामुख्याने गुरांना लागणारा चारा कापण्यासाठी शेतकरी बांधवाना खूप कष्ट करावे लागते. त्यामुळे तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्याकडे गुरे असतील तर त्यांचा चारा पाणी करण्यासाठी कडबा कुट्टी मशीन म्हणजेच chaff cutter machine खूप मदतीचे ठरेल.

कडबा कुट्टी मशीनचे फायदे 

 • कडबा कुट्टी मशीनला विद्युत मोटर जोडली असल्याने चारा कापण्यासाठी खूप कमी वेळ लागतो.
 • खूप मोठा चारा अगदी कमी वेळेत कापता येतो.
 • चारा बारीक केल्याने जनावरांना खाण्यास सोपा जातो.
 • चाऱ्याची कमी जागेत साठवणूक करता येते.
 • नासाडी कमी होते.

वरीलप्रमाणे कडबा कुट्टी मशीनचे शेतकऱ्यांना फायदे होत असतात. हे कडबा कुट्टी मशीन तुम्ही शासकीय अनुदानावर देखील खरेदी करू शकतात. याच संदर्भात आपण या ठिकाणी अगदी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.

कडबा कुट्टी मशीनसाठी असा करा अर्ज 

शासकीय अनुदानावर जर तुम्हाला कडबा कुट्टी मशीन खरेदी करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. हा अर्ज सादर करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

 • mahadbt वेब पोर्टलवर जा.
 • युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगीन करा.
 • लॉगीन केल्यावर अर्ज करा असे अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
 • कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावर क्लिक करा.
 • जसे हि तुम्ही कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावर क्लिक कराल त्यावेळी एक अर्ज तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर ओपन होईल त्यामध्ये खालीलप्रमाणे माहिती निवडायची आहे.
 • मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा.
 • तपशील या पर्यायाखालील तपशिलामध्ये मनुष्यचलित अवजारे हा पर्याय निवडा.
 • व्हील ड्राईव्ह प्रकार आणि एच पी श्रेणीमध्ये काही पर्याय निवडायचा नाही.
 • यंत्र सामग्री अवजारे या पर्यायासाठी फॉरेज ग्रास ॲण्ड स्ट्रा हा पर्याय निवडा.
 • प्रकल्प खर्च श्रेणी रिकामी सोडा.
 • सर्वात शेवटी मशीनच्या प्रकारामध्ये Above 3 व upto 3 असे पर्याय दिसेल त्यापैकी एक पर्याय निवडा आणि अर्ज जतन करा या बटनावर क्लिक करा.

कडबा कुट्टी मशीन योजनेचा फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा


📢 कुसुम सोलर पंप 95% अनुदानावर 2022 सुरु :- येथे पहा 

📢 रासयनिक खतावर मिळणार साबिसिडी 2022 :- येथे पहा 

2 thoughts on “Kdaba Kutti Anudan Yojana | कडबा कुट्टी मशीनवर 50% अनुदानावर अर्ज सुरु”

Leave a Comment

close button
error: Content is protected !!