Karj Mafi Yojana 2022 | महात्मा फुले कर्ज माफी योजना | कर्ज माफी योजना २०२२

Karj Mafi Yojana 2022 | महात्मा फुले कर्ज माफी योजना | कर्ज माफी योजना २०२२

Karj Mafi Yojana 2022 : नमस्कार शेतकरी बांधवांनो सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकरी हिताचे निर्णय घेतला आहे. या मध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे. आता सरकार मार्च अखेर पर्यंत 200 कोटीची कर्ज माफी करण्याचा निर्णय आहे. तर चला बघूया या कर्ज माफीचा लाभ कोण कोणत्या शेतकऱ्यास मिळणार. कसा व किती मिळणार.

कर्ज माफी योजना २०२२ 

यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. कृषी योजना शिवाय शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभ मिळावा. अशा घोषणाही अर्थमंत्री अजित पवार यांनी केल्या होत्या. यामध्ये महत्वाचे म्हणजे महात्मा जोतिराव फुले  शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील उर्वरीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न गेल्या दोन वर्षापासून रखडलेला होता. घोषणा झाल्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचे काय असा सवाल आता विरोधकांकडून विचारला जात आहे. मात्र, घोषणाच नाही तर अंमलबजावणीसाठीही योग्य नियोजन केले आहे. या उर्वरीत शेतकऱ्यांची कर्जमाफी मार्च अखेरपर्यंत होणार असल्याचे  सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे. 54 हजार शेतकऱ्यांना तब्बल 200 कोटी रुपयांची ही कर्जमाफी असणार आहे. यासंबंधीची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधान परिषदेमध्ये दिली. त्यामुळे या महिन्या अखेरीस 54 हजार शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा हा कमी होणार आहे

2 लाखापर्यंतची कर्जमाफी

ठाकरे सरकार सत्तेत येताच 2 लाखापर्यंतची शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. त्या दरम्यान राज्यातील तब्बल 31 लाख 73 हजार शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला होता. याकरिता राज्य सरकारच्या तिजोरीवर 20 हजार 250 कोटींचा भार पडला होता. असे असताना तिजोरीतील खडखडाट आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे प्रोत्साहनपर रक्कम आणि उर्वरीत 54 हजार शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी रखडली होती. (Karj Mafi Yojana 2022) आता या मार्च महिन्यातच ही कर्जमाफी निकाली काढली जाणार आहे.

महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना 

राज्य सरकारने 2 लाखापर्यंतची कर्जमाफीची घोषणा तर केली. परंतू अंमलबजावणी कधीपर्यंत होणार हे स्पष्ट केले नव्हते. त्यामुळे हे आश्वासनहीन हवेतच राहणार असा सवाल त्यांनी विधान परिषदेमध्ये उपस्थित केला होता. मात्र, यावर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, मार्च अखेर पर्यंत या 54 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे. याकरिता बॅंकांनी 35 लाख थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती ही सरकारला दिली होती. त्यानुसार हा कर्जमाफी केली जाणार आहे.


📢 गाई गोठा अनुदान योजना :- येथे पहा 

📢 वडिलोपार्जित संपत्तीवर मुलीचा अधिकार :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!