Kapashi Varil Kitaknashke Favarni | कापूस पिकावरील मावा,तुडतुडे कीटकांसाठी फवारणीचा उपयुक्त सल्ला

Kapashi Varil Kitaknashke Favarni: नमस्कार आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कापूस हे पीक घेतले जाते. या वर्षी पाऊस वेळेवर ना पडल्याने कापूस पिकाची लागवड ही उशिराने झाली त्या नंतर पावसाने परत शेतकऱ्याना आभाळाकडे पाहायला लावले होते. पण गेल्या 15 दिवसा पासून संपूर्ण महाराष्ट्र भर पाऊस झाला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवतजीव आला व पिकाला ही जीवनदान मिळाले त्या मुळे शेतकरी सध्या अनदीती आहे. पण शेतकऱ्यांना या वर्षी कापूस पिकावर 4 ते 5 कीटकनाशके फवारण्या कराव्या लागणार आहे. पहा या फवारण्याचे व्यवस्थापन कसे करायचे आहे हे पाहण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

Kapashi Varil Kitaknashke Favarni

महाराष्ट्रावर जे दुष्काळाचे सावट घोंगावत होते ते दूर झाले हि आनंदाची गोस्ट आहे. पण अजूनही कोरडच्या कपाशीला अधून मधून 3/4 पावसाची आवश्यकता आहेच, आणि तो पडेलच अशी आपण परमकृपाळू परमेश्वराजवळ प्रार्थना करूयात मित्रानो.

सर्व शेतकरी बंधूनी कापूस या पिकाला आपल्या यथाशक्ती खताचे डोस दिले आहेत. आणि आता यापुढे 4 ते 5 किटनाशक औषधी फवारणी करावी लागणार आहे. ह्या ज्या फवारण्या आपण करणार आहोत त्या मुख्यतः सेंद्री अळी आणि थ्रीप्स या किडी साठीच असणार आहेत. 

हेही वाचा :500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देत आहे 50  लाख रु अनुदान येथे करा अर्ज 

किती वेळा फवारणी करावी 

कारण या दोन किडी मुळेच कापूस उत्पन्नात जास्त घट येते ,प्रत्येक शेतकरी आपापल्या परीने फवारणी करतीलही. मित्रानो गेल्या 10/12 दिवसापासून आपल्या भगवती सिड्स च्या सर्वच ग्रुप्सवर माहिती येत आहे. की ,शेतकरी मावा आणि तुडतुडे या किडीना अक्षरशः वैतागून गेला आहे. आणि ते खरेही आहे. गेल्या 15 /20 दिवसापासून सातत्याने असलेले ढगाळ वातावरण त्याला कारणीभूत आहे.

मावा या किडीला हे वातावरण पोषक आहे शेतकऱ्यांनी 1/2 वेळा रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केली तरीही हि कीड आटोक्यात येत नाही. अशा ढगाळ वातावरणात,बऱ्याच शेतकऱ्यांनी मावा आणि तुडतुड्यांच्या बंदोबस्तासाठी सुरुवातीला इमिडक्लारप्राईड या नियोनिकोटींन गटातीलच कीडनाशक फवारले आहे.

मावा व तुडतुडे या किडीचे आयुष्य 15/17 दिवसांचे असते,या गटातील औषधाच्या फवारणी मुळे. मावा व तुडतुड्यांची पुढील पिढी अधिक प्रतिकारक्षम जन्माला आली. कापूस फवारणी सल्ला या लेखात मी सांगीतले होते की नियोनिकोटींन गटातील औषध पुन्हा पुन्हा फवारू नये.

हेही वाचा : आपल्या विहीर किवा बोअरवेल ला लागणार 100% पाणी या पद्धतीचा करा वापर 

कोणकोणते कीटक कापूस पिकावर असतात 

आलटून पालटून त्याची फवारणी करा, तरीही शेतकरी पुन्हा पुन्हा त्याच गटातील औषधांची फवारणी करत आहेत. शेतकरी बंधुनो मावा व तुडतुडे हि कीड कापसाच्या पानाच्या खालच्या बाजूला असते ,आणि आपण फवारणी वरच्या बाजूने करतो. व्यवस्थित खालून वरून फवारणी केली /झाड सर्व बाजूनी पूर्ण ओले होईल.

अशी ,आणि फवारणीत आपण सिलिकॉन स्टिकर 7 मिली वापरले असेल तर मावा व तुडतुडे यांचा खात्मा होतो, थोडक्यात ज्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित फवारणी केली आहे त्यांच्या कापूस पिकावरचा या किडीचा अटॅक नियंत्रणात आहे, आणि ज्यांची व्यवस्थित फवारणी झाली नाही, त्यांच्या कापसावर विपरीत परिणाम झालेला पाहायला मिळत आहे चुराडा मुरडा आला आहे.

कापसाची वाढ खुंटली आहे.बरेच शेतकरी या किडीना अक्षरशः वैतागून गेले,काहींनी तर मला फोनवर असेही विचारले कि या वर्षी कापूस येईल की नाही.मित्रानो मावा आणि तुडतुडे या किळीमुळे कोरडवाहू कापूस 25 जून नंतर लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी एक फवारणी पॉवर/पेट्रोल पंपानेच करावी, फवारणी करताना कापसाचे झाड झटकले गेले पाहिजे 

हेही वाचा : कुकुट पालन साठी शासन देते 75% अनुदान येथे कर अर्ज 

कोणते कीटक नाशके फवारावी 

इतक्या प्रेशरने फवारणी झाली पाहिजे. किंवा उलट्या दिशेने फवारणी करावी,माझ्या शेतातही हाच मावा आणि तुडतुड्यांचा अटॅक होता मी खालील प्रमाणे फवारणी चा प्रयोग करून पहिला मावा तुडतुड्यांचा अटॅक 90 ते 95 % कमी झाला.खाली दिलेल्या 2 प्रकारच्या कीडनाशक फवारणी पैकी कोणतीही एक फवारणी करा.

1) रोंफेन 30 मिलीथ्रीप्सील 15 मिली (ऑरगॅनिक आहे, थ्रीप्स असले तरच घ्यावे)स्टिकर 5 मिलीनिम अर्क 30 ते 40 मिली2) असिफेट 30 ग्रॅमस्टिकर 7मिलीफिप्रोनिल 25 मिली(थ्रीप्स असतील तर घ्या)निमार्क 20% चे 40 मिलीवरील 1 नंबरची फवारणी मी माझ्या शेतात उलट्या नोझलने केली ,म्हणजे नोझलचे तोंड जमिनीकडे न ठेवता, आकाशाकडे नोझलचे तोंड होते.

त्यामुळे पानाच्या खालच्या बाजूने पूर्ण पान ओले होत होते.व फवारणी करताना एकाच ओळीत चालत चालत फवारणी केली होती.कापूस वन वे आहे.वरील कीड नाशकांची ,फवारणी वर सांगितल्या प्रमाणे करा मावा तुडतुड्यांचा अटॅक निश्चितच कमी होईल ,प्रयोग करून पहा.


📢 शेतकऱ्यांना आपल्या शेतात पीप लाईन साठी शासन देते आहे अनुदान :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप साठी शासन देते 95% अनुदान :- येथे पहा 

1 thought on “Kapashi Varil Kitaknashke Favarni | कापूस पिकावरील मावा,तुडतुडे कीटकांसाठी फवारणीचा उपयुक्त सल्ला”

Leave a Comment

close button
error: Content is protected !!