Kanda Chal Anudan 2022 | कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु

Kanda Chal Anudan 2022 | कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु

Kanda Chal Anudan 2022

Kanda Chal Anudan 2022 : नमस्कार माझ्या सर्व बळीराजानो.   आम्ही आपल्यापर्यंत शासनाच्या नाव नवीन योजनाची माहिती घेऊन येत असतो. त्याच प्रमाणे आज कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आम्ही आनंदाची अशी बातमी घेऊन आलो आहे. ती म्हणजे कांदा चाळ अनुदान योजना. चला तर बघूया काय आहे. योजनाचा लाभ कसा घेऊ शकता. कागदपत्रे व ऑनलाइन फॉर्म कसा व कुठे भरावा तर बघूया सविस्तर माहिती.

 कांदा चाळ योजना 2022 

सर्वसाधारणपणे कांदा  जमिनीवर पसरवून ठेवून किंवा स्थानिकरीत्या.
 तयार केलेल्या चाळीमध्ये कांद्याची साठवणूक करतात. त्यामुळे कांदा  सोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. तसेच कांद्याची प्रत व टिकाऊपणा यावर विपरीत परिणाम होतो. शास्त्रशुद्द कांदाचाळ उभारणीमुळे  कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते. १. सदर योजनेचा  लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी. 

कांदा चाळ अनुदान 2022  

 ५, १०, १५, २० व २५ मे. टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल रुपये ३५००/- प्रति मे. टन  याप्रमाणे क्षमतेनुसार अर्थसहाय्य देय राहील. एका लाभार्थ्याला २५ मे टन क्षमतेच्या कमाल मर्यादा (Kanda Chal Anudan 2022) अनुदान आहे. 
 नवीन कांदा चाळ योजना पत्रात लाभार्थी
 • स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे.
 • ७/१२ वर कांदा  पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.
 • शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे बंधनकारक आहे.
 • सादर योजनेचा लाभ वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी
 • शेतकऱ्यांचा गट,
 • स्वयंसहायता गट
 • शेतकरी महिला गट
 • शेतकऱ्यांचे उत्पादक संघ
 • नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था
 • शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था
 • सहकारी पणन संघ
कांदा चाळ अनुदान कागदपत्रे 
 • ७/१२
 • ८ अ
 • आधार कार्डाची छायांकित प्रत 
 • आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रत
 • जातीचा प्रमाणपत्र (अनु.जाती/ अनुजमाती शेतकऱ्यांसाठी)
 • यापूर्वी कोणत्याही योजनेतून कांदाचाळीचा लाभ घेतला नसल्याबाबतचे हमीपत्र

कांदा  चाळ योजना व्हिडीओ येथे पहा 


📢 नवीन विहीर योजना 2022 :- येथे पहा 

📢 pm किसान ११ व हफ्ता :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!