Jyotirao Phule Karj Mukti Yojana | शेतकऱ्यांनासाठी मोठा निर्णय, नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना या महिन्यात 50 हजार रुपये अनुदान मिळणार

Jyotirao Phule Karj Mukti Yojana: राज्य सरकारने मागे शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला होता. ‘महात्मा जोतीराव फुले योजने’मार्फत 31 लाख 73 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. यामुळे राज्याच्या तिजोरीवर 20 हजार 250 कोटींचा मोठा भार पडला होता.

Jyotirao Phule Karj Mukti Yojana

कर्जमाफीची घोषणा तर केली, पण काही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिल्याचे दिसत होते. राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्या जाणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती.

कोरोना काळात देशासह राज्यात तिजोरीवर मोठा भार पडला त्यामुळे ठाकरे सरकारने सर्व योजना काही काळासाठी निधी अभावी बंद देखील करण्याची वेळ आली होती. यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी निधीची देखील कमतरता आली. (Jyotirao Phule Karj Mukti Yojana)

आता शेतकऱ्यांनासाठी आनंदाची बातमी आली आहे. याबाबत राज्य सरकारने प्रसनोट देखील प्रसिद्ध केली आहे. जाहिर केलेले प्रोत्साहन अनुदानाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.लवकरच नियमित कर्जफेड शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर‌ 50 हजार रुपयांचे अनुदान मिळण्याची शक्यता आहे.

 

प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार…

राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. यासाठी 10 हजार कोटी रुपये लागणार आहे. अशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना माहिती दिली होती. (Mahatma Jyotiba Phule Farmers Debt Relief)

राज्य प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा तर केली, पण यासाठी कोणते शेतकरी पात्र असतील, असा प्रश्न सरकार समोर उभा राहिला. तर यासाठी शासन निर्णय घेऊन पुढील अमंलबजावणी केली जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जून महिना देखील लागू शकतो.

 

या शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान

2017-18, 2018-19 व 2019-20 या तीन वर्षांत ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केलेली असेल, त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान दिल्या जाणार आहे. (Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana 2022)

तसेच, 2022-23 ‘महिला शेतकरी सन्मान वर्ष’ म्हणून साजरा करण्याचा ठाकरे सरकारने निर्णय घेतला आहे. त्यामुळे या योजनेत नियमित कर्जफेड करणाऱ्या महिला शेतकऱ्यांना 75 हजार रुपये अनुदान देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

तुम्ही देखील दिलेल्या वर्षांत कर्जफेड केली असेल तर तुम्हाला प्रोत्साहनपर अनुदान लवकरच मिळणार आहे. ही माहिती पुढे शेतकऱ्यांना पर्यंत नक्की पोहचवा.

50 नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50000 प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे याबाबत नवीन परिपत्रक जाहीर करण्यात आलेला आहे हे परिपत्रक काय आहेत कोणत्या शेतकऱ्यांना 50000 प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेले फोटोज इमेजेस आपण पाहू शकता


📢 कडबा कुट्टी मशीन वर 50% अनुदान योजना सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!