John Deere 5405 Tractor Best | जॉन डियर 5405 ट्रॅक्टर आहे आता पर्यंतचा सर्वात महागडा ट्रॅक्टर पहा काय आहे याचे वैशिष्ट्य

John Deere 5405 Tractor: नमस्कार मित्रांनो आपल्याला शेतीमध्ये यंत्राचा वापर करावा लागतो. त्यामुळे आपला वेळ वाचतो व मित्रांनो यामध्ये ट्रॅक्टर हे यंत्र शेतीसाठी खूप फायद्याची आहे. यामुळे मित्रांनो बाजारामध्ये ट्रॅक्टरच्या विविध कंपन्या उपलब्ध आहेत. आणि यात प्रत्येक ट्रॅक्टरचे वेगवेगळे वैशिष्ट्ये तसेच त्यांच्या किमती आहेत.

मित्रांनो आपण ट्रॅक्टरच्या किमतीचे पाहायला तर साधारणतः ट्रॅक्टरच्या किमती पाच ते सात लाखापर्यंत राहतात पण जॉन डियर 5405 या ट्रॅक्टरची किंमत 22 लाख रुपये एवढी आहे. या ट्रॅक्टरची किंमत एवढी जास्त कशामुळे आहे चला तर मग पाहूया या लेखात आपण याची संपुर्ण माहिती.

John Deere 5405 Tractor

मित्रांनो जर आपल्याला ट्रॅक्टर भाड्याने व्यवसायासाठी जर घ्यायचं राहिलं तर आपल्याला हेवी ट्रॅक्टरची आवश्यकता असते. यात जॉन डियर 5405 हे ट्रॅक्टर पाहायला गेलं तर 65 एचपी चे ट्रॅक्टर आहे. व याची किंमत 22 लाख रुपये आहे.

मित्रांनो तुम्ही याला कोणतेही मोठी अवजारे जोडून काम करता येते. चाळीस ते पन्नास एकर जमीन जर तुमच्याकडे असेल तर हे ट्रॅक्टर तुमच्या खूप फायद्याचे ठरू शकते.

हे आहे सर्वात महागडे ट्रॅक्टर

मित्रांनो या ट्रॅक्टरला 80 लिटर एवढे इंधनाची टाकी आहे. आणि मित्रांनो हे 80 लिटर जर एक वेळेस तुम्ही टाकला तर तुम्ही आठ एकर रुटर फिरवू शकता. आणखीन (John Deere 5405 Tractor) मित्रांनो जर तुम्हाला एक एकर जर शेती नांगरायचे असेल तर पंधरा लिटर एवढे डिझेल लागते.

व्हिल बेस 2050 एमएम इतका आहे. मागचा टायर हा जेसीबीचा टायर ज्या आकाराचा असतो. त्या आकाराचा आहे. अशा अनेक प्रकारचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये या ट्रॅक्टरमध्ये देण्यात आलेले आहे.

या ट्रॅक्टरची महत्त्वाची वैशिष्ट्य

मित्रांनो हा ट्रॅक्टर दिसायला जेसीबीच्या आकाराचा (John Deere 5405 Tractor) दिसतो. मित्रांनो याची सर्वात महत्त्वाची जर वैशिष्ट्ये म्हणजे ड्रायव्हरच्या वजनानुसार शीट बरोबर लावण्याची सुविधा दिलेली आहे. आणि याच केबिन आपल्याला खूप आकर्षक पाहायला मिळते.

मित्रांनो आपल्याला या ट्रॅक्टर मध्ये पावर स्टेरिंग देण्यात आलेली आहे. हे टेलिस्कोपिक या पद्धतीची स्टेरिंग आहे ते बाहेर आत होते. मित्रांनो यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला असून चांगल्या सुविधा दिलेल्या आहे.

आणखीन म्हणजे मित्रांनो या ट्रॅक्टरचे एक्सलेटर तुम्ही बोटाच्या साह्याने मॅनेज करू शकता. आणखी महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो मध्ये जेसीबी किट दिले आहे. त्याच्या साहाय्याने तुम्ही ट्रॅक्टर मध्ये डिझेल किती आहे ट्रॅक्टर कुठे आहे व काय काम करत आहे. हे तुम्हाला पाहता येतील तुमच्या मोबाईलवर आणखीन म्हणजे मित्रांनो हे ट्रॅक्टर तुम्ही चालवताना बाहेरचा कुठलाही आवाज येत नाही.

55 एचपी एवढी याची क्षमता

तुम्हाला ट्रॅक्टर किती खोलीवर नांगरायचे आहे हे सुद्धा मॅनेज करता येते मित्रांनो हे ट्रॅक्टर 65 एचपी चे आहे. पण यामध्ये तुम्ही दिलेल्या बटणाचा वापर करून 55 एचपी एवढी याची क्षमता करू शकता. यातून तुम्हाला मायलेज सुद्धा चांगला मिळेल मित्रांनो या ट्रॅक्टरची वजन अडीच हजार किलो एवढे आहे. या ट्रॅक्टरमध्ये असे बरेच महत्त्वाचे वैशिष्ट्ये आहेत.

मित्रांनो तुम्हाला हा ट्रॅक्टर कसा वाटला जर हा (John Deere 5405 Tractor) ट्रॅक्टर आवडला तर तुम्ही ही माहिती इतर शेतकऱ्यांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना या ट्रॅक्टर बद्दल माहिती होईल.

Leave a Comment