Jamin Kharedi Anudan 2022 | जमीन खरेदी योजनेचे ३ दिवस आजच करा अर्ज

Jamin Kharedi Anudan 2022 | जमीन खरेदी योजनेचे ३ दिवस आजच करा अर्ज

Jamin Kharedi Anudan 2022

Jamin Kharedi Anudan 2022 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतमजूर कुटुंबासाठी ही बातमी आहे. शेतमजूर  कुटुंबांना शंभर टक्के अनुदानावर २ एकर बागायती किंवा ४ एकर कोरडवाहू जमीन घेऊ शकते. ती घेण्यासाठी सरकारने शेतमजूर कुटुंबासाठी 100% अनुदान देण्याचे देण्याचे ठरवले आहे. या योजनेसाठी जिल्हा करिता अर्ज सुरू झालेले आहे. आपण 100% अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात. तर आपण जाणून घेणार आहोत की या योजनेसाठी कोणते शेतमजूर अर्ज करू शकता. त्यासाठी काय कागदपत्रे व पात्रता काय आहे. हे आपण जाणून घेणार आहोत अर्ज कोठे सादर करायचा आहे. ही संपूर्ण माहिती या बातमीमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

शेत जमीन खरेदी अनुदान योजना

या योजनेचा लाभ दारिद्र रेषे खालील भूमिहीन अनुसूचित जाती. व नवबौद्ध शेतमजूर कुटुंबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे व त्यांचा राहणीमान सुद्धा सुधारावा यासाठी होणार आहे. त्यांचे शेतमजुरी वर असलेले अवलंबित्व कमी व्हावे व ती शेतकरी स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर काम करू शकतात. या उद्देशाने शासनामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजना राबवण्यात येत आहे. ही योजना 2004 पासून सुरू झालेली आहे.

जमीन खरेदी अनुदान 

या योजनेद्वारे अनुसूचित जाती व नवबौद्ध भूमिहीन शेतमजुरांना ४ एकर कोरडवाहू किंवा २ एकर बागायती जमीन ही खरेदी  करता येणार आहे. आणि तीही शासकीय दराने खरेदी करून शासनाकडून 100% अनुदान उपलब्ध करून घेता येणार आहे. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग. मंत्रालय मुंबई शासन निर्णयान्वये कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान ही महत्वकांक्षी योजना. राज्यांमध्ये सन 2004-05 पासून कार्यान्वित केली. असून दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर मजुरांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि अन्य साधन नसल्याने. अनुसूचित जाती व नवबौद्ध भूमिहीन शेतकऱ्यांना शासकीय अटी पूर्ण करीत. असल्यास निवड समितीने निवड केलेल्या लाभार्थ्यास ४ एकर कोरडवाहू किंवा २ एकर बागायत. खालील जमीन शासकीय दराने खरेदी करून शासनाकडून 100% अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे.

शेत जमीन खरेदिसाठी ची पात्रता 

या योजनेअंतर्गत लाभार्थी किमान 18 ते 60 वर्षे वयोगटातील असावा. तो दारिद्र रेषेखालील भूमिहीन शेतमजूर असावा. भूमिहीन शेतमजूर परित्यक्त्या स्त्रिया यांना लाभार्थ्यांच्या निवडीला प्राधान्य दिला जाणार आहे. महसूल व वनविभागाने ज्यांना गायरान व सिलींगच्या जमिनीचे वाटप केले आहे. त्या लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

जमीन खरेदी अनुदान योजना २०२२ 

खरेदी केलेली जमीन ही पती पत्नीच्या नावे खरेदी केली जाते. भूमिहीन शेतमजूर परित्यक्त्या स्त्रियांना त्यांच्या नावावर खरेदी करण्यात यावी. कोणत्या कारणास्तव जमीन कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरित करता येणार नाही भूमिहीन लाभार्थ्यांना लाभार्थ्यांनी ही जमीन कोणत्याही परिस्थितीत (Jamin Kharedi Anudan 2022) विक्री करता येणार नाही.

शेतजमीन कारेदिसाठी ची कागदपत्रे 
  • शेत जमीन पसंत बाबत लाभार्थ्यांचे शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र
  • मागील वर्षाचा वार्षिक उत्पन्नाचा तहसीलदार यांचा दाखला
  • मतदान कार्ड
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • अर्ज विहित नमुन्यात पासपोर्ट फोटोसह रहिवासी दाखला
  • भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत तहसीलदार दाखला
  • लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असलेल्या विविध प्रमाणपत्र व साठ वर्षाखालील असल्याचा वयाचा दाखला
  • अर्जदाराने अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याबाबतचे जातीचे प्रमाणपत्र

📢 कांदा चाळ अनुदान योजना  :- येथे पहा 

📢५०० शेळ्या २५ बोकड अनुदान योजना :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!