Infestation Of Snails On Soybean | सोयाबीन पिकाचे गोगलगाई पासून असे करा नियत्रण

Infestation Of Snails On Soybean | सोयाबीन पिकाचे गोगलगाई पासून असे करा नियत्रण

Infestation Of Snails On Soybean

Infestation Of Snails On Soybean : शेतकऱ्यांना सतत अस्मानी किंवा सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. तरीही सर्व अडचणींवर मात करून शेतकरी शेती करत असतो. कधी दुष्काळ, कधी नापिकी, कधी कमी भाव तर कधी अतिरिक्त पाऊस अशा विभिन्न प्रकारच्या अडचणींचा सामना शेतकरी करतो. शेतात राबून घर खर्च आणि मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाची चिंता शेतकऱ्यांना नेहमीच सतावत असते. परंतु आता मात्र शेतकऱ्यांसमोर नविनच संकट उभारले आहे.

Infestation Of Snails On Soybean

शेतकऱ्यांनी  उसने-पासने करून, कशीबशी खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची पेरणी केली. परंतु पिक उगवण स्थितीत असतानाच, पिकांवर गोगलगायींनी तुटून हल्ला केला आहे. पीक संपूर्ण उगवण्यापूर्वीच गोगलगायी पीक खाऊन घेत आहेत.

त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. पाठीवर शंख आणि आकाराने लहान असणाऱ्या गोगलगायीने शेकडो हेक्टर वरील सोयाबीनचा फज्जा पाडला आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

पहिली पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या खर्चाला तोंड द्यावे लागले होते. वाढलेल्या खते, बी-बियाण्यांच्या किमती यामुळे शेतकरी पहिलाच पिंजून गेला आहे. त्यात आता गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे पहिली केलेली पेरणी वाया जाण्याची व दुबार पेरणीच्या खर्चाची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

सोयाबीन पीक खाणाऱ्या गोगलगायी

सोयाबीनच्या एका झाडाला दोन-दोन गोगलगाय खाऊन झाडच संपवत आहेत. गोगलगायींची संख्या एवढ्या जास्त प्रमाणात असल्याने त्यांना वेचणे शक्य नाही. तरी देखील पिकांना वाचविण्यासाठी चोराखळी, वडगावं, कन्तहेवाडी, सापनाई, गौर या गावातील काही शेतकरी गोगलगाय शेतातून वेचत आहेत.

सध्या या अडचणींवर कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने, पदरात आणखी निराशा येण्याची शक्यता आहे. या संकटावरती लवकरात लवकर उपाय योजना करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे करण्यात येत आहे.

 हेही वाचा :- 200 गाई पालन साठी शासन देते 50% अनुदान येथे करा ऑनलाईन अर्ज 

या वर नियत्रण कसे करावे

शेतकऱ्यांनी पैश्यांची बचत करत, बँकेकडून कर्ज, पाहुण्यांकडून पैसे उसने घेऊन महागडे खते, बी-बियाण्यांची सोय केली होती. सानपाई येथील शेतकरी अगंत बाराते यांनी तर लाडक्या लेकीच्या लग्न सराईचे नियोजन पुढे ढकलून पेरणीला पैसे जुळवले होते. एका एकरची पेरणी करण्यासाठी साधारण 5500 – 6000 रुपये एवढा खर्च झाला. मात्र, उभं पीक गोगलगायी खाऊन टाकत आहेत.

एकरी हिशोब

बी- बियाणे- 3230 रुपये/बॅग (30 किलो), खते – 1980 रुपये/पोते, ट्रॅक्टर भाडे- 1100 रुपये/एकर एवढा एकरी खर्च करून दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर गोगलगायीमुळे आले आहे. आता दुबार पेरणीसाठी पैसे कुठून आणावेत असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

हेही वाचा :- ड्रोन खरेदी साठी शासन देते 100 % अनुदान येथे करा ऑनलाईन अर्जी 

योग्य वेळी फवारणी करा”

गोगलगायींचा वाढता धोका लक्षात घेता, कृषी विभागाने योग्य मार्गदर्शन करण्यास सुरूवात केली आहे. गोगलगायींपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी योग्य वेळी पिकांवर कीटक नाशकाची फवारणी करण्याचे आव्हान कृषी विभागाचे महेश तीर्थंकर यांनी केले आहे.

काय करावं कळेना

पहिल्याच पेरणीसाठी कशीबशी पैश्याची जुळवाजुळव केली होती. बँकेकडून कर्ज घेतलेले आहे. एकराला आम्हाला 5 हजारांपेक्षा जास्त खर्च आला आहे. आता काय करावं काही कळेना झाले. गोगलगायी पीक येऊ देत नाहीत, एका झाडाला जर बघितले तर दोन, कुठं तीन अशा गोगलगायी लागल्यात. सगळ पीक धोक्यात आहे. सरकारने लवकर यावर काहीतरी उपाय काढावा अशी विनंती ज्ञानेश्वर बाराते या शेतकऱ्याने केली आहे.


📢 नवीन घरकुल योजने अतर्गत शासन देणार 1.2 लाख रु अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाळ योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!