Indian Fertilizer Price | हे आहेत सर्व रासायनिक खताचे नवीन भाव पर bag

Indian Fertilizer Price : नमस्कार शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे. आता पावसाळा चालू झाला असून शेतकाऱ्यांकच्या पेरण्या चालू झाल्या असून त्यांना पेरणीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांची गरज पडत असते. आणि याचा फायदा हे खत विक्रेते घेत आहे. ते खताची टंचाई दाखवून शेतकऱ्यांना लुटत आहे.

त्यासाठी आम्ही अपल्यासाठी सर्व खतांचे शासनाने ठरवून दिलेले भाव घेऊन आलो आहे. जेणे करून खत विक्रेते आपल्याला फसवू नये म्हणून चला तर बघू कोणत्या खताला किती भाव आहे.

Indian Fertilizer Price

युरिया खताची किंमत प्रतिबॅग २६६.५० रुपये निश्चित असून डीएपी खताची प्रतिबॅग किंमत इफको, जीएसएफसी, आरसीएफ, कृभको, आयपीएल, झुआरी पीपीएल / एमसीएफएल, कारोमंडल, स्पीक, चंबळ या नाममुद्रेची १ हजार ३५० रुपये. तर एनएफएल कंपनीच्या खताची किंमत प्रतिबॅग १ हजार २०० रुपये निश्चित करण्यात आलेली आहे.

 हेही वाचा :- कुकुट पालन योजनेसाठी शासन देते 75% अनुदान आजच घ्या लभ 

“एमओपी खताची किंमत जीएसफसी, आरसीएफ, आयपीएल, चंबळ या कंपनीच्या प्रतिबॅगची विक्री किंमत १ हजार ७००, एनएफएल १ हजार १०० तर कोरोमंडलची १ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. दीपक फर्टिलायझर्सच्या २४:२४:०० खताची किंमत १ हजार ९०० रुपये, कोरोमंडलच्या २४:२४:०८५ खताची किंमत १ हजार ९०० रुपये निश्चित करण्यात आली आहे.

२०:२०:०:१३ या खताची इफको कंपनीच्या खताची प्रतिबॅग किंमत. १ हजार ४००, दीपक फर्टिलायझर्स, कोरोमंडल १ हजार ४५० रुपये, जीएसएफसी १ हजार ३२५ रुपये, आरसीएफ १ हजार १५० रुपये, कृभको. १ हजार ३०० रुपये आयपीएल १ हजार ३२०, झुआरी पीपीएल / एमसीएफएल, चंबळ एनएफएल. १ हजार ४७० रुपये, स्पीक – १ हजार ४७५ रुपये यापेक्षा अधिक दराने एका बॅगेची विक्री करता येणार नाही.

रासायनिक खतांचे नवीन भाव

झुआरी पीपीएल / एमसीएफएल कंपनीच्या १९:१९:१९ या खताची प्रतिबॅग किंमत १ हजार ५७५ रुपये, १०:२६:२६ या खताची इफको. दीपक फर्टिलायझर्स, कृभको, झुआरी पीपीएल/ एमसीएफएल, कोरोमंडल, चंबळ आणि एनएफएल कंपनीच्या खतांची. किंमत प्रतिबॅग १ हजार ४७० रुपये. तर जीएसएफसी १ हजार ४४० रुपये प्रतिबॅग, १२:३२:१६ या रासायनिक खताची जीएसएफसी कंपनीच्या खताची १ हजार ४५० रुपये. तर इफको, दीपक, कृभको, झुआरी पीपीएल / एमसीएफएल, कोरोमंडल, चंबळ आणि. एनएफएल १ हजार ४७० रुपये, १४:३४:१४ या कोरोमंडल कंपनीच्या खताची किंमत प्रतिबॅग १ हजार ९०० रुपये निश्चित करण्यात आली आहे.

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 साठी 50% अनुदानावर सुरु

आजचे खताचे भाव

१४:२८:०० या दीपक फर्टिलायझर्सच्या खताची किंमत १,४९५ रुपये, १५:१५:१५ या आरसीएफच्या खताची किंमत १ हजार ५०० रुपये, १६:२०:००:१३ या खताची जीएसएफसी कंपनीच्या बॅगची किंमत १ हजार १२५, आयपीएल १ हजार २५० रुपये आणि कोरोमंडल १ हजार ४०० रुपये, आयपीएल कंपनीच्या १६:१६:१६ खताची किंमत १ हजार ४७५ रुपये, २८:२८:०० या खताची झुआरी पीपीएल/ एमसीएफएल कंपनीच्या बॅगची किंमत १ हजार ७००, कोरोमंडल कंपनीच्या बॅगची किंमत १ हजार ९०० रुपये अशी निश्चित करण्यात आलेली आहे.

जीएसएफसी कंपनीच्या अमोनिअम सल्फेट खताची किंमत १ हजार १०० रुपये, १५:१५:१५:०९ या खताची आयपीएल कंपनीची बॅग १ हजार ४५०, कोरोमंडल १ हजार ३७५ रुपये, कोरोमंडलच्या १७:१७:१७ खताची किंमत १ हजार २१० रुपये, दीपक फर्टिलायझर्सच्या ०८:२१:२१ या ४० कि.ग्रॅ. च्या बॅगची किंमत १ हजार ८५० रुपये तर ०९:२४:२४ या खताच्या ४० च्या बॅगची किंमत १ हजार ९०० कि.ग्रॅ. रुपये निश्चित करण्यात आलेली आहे.


📢 नवीन विहीर अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पमाप अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!