How Make Neem Pesticide | कमी खर्चात कडुलिंबापासून बनवा कीटकनाशक-खत, उत्पादन वाढून मिळेल

How Make Neem Pesticide | कमी खर्चात कडुलिंबापासून बनवा कीटकनाशक-खत, उत्पादन वाढून मिळेल

How Make Neem Pesticide

How Make Neem Pesticide: नमस्कार शेतकरी मित्रांनो आता जर शेती करायचे म्हंटले तर आपल्याला शेतातील सर्वच गोष्टीचे लक्ष ठेवावे लागते. म्हणजेच आपल्याला आपले पीक हे निरोगी राहावे या साठी त्याची खूप काळजी घ्यावी लागते. त्या मुळे आता शेती करणे हे एवढे सोपे राहिलेले नाही आहे.

कारण प्रत्येक पिकांवर नवनवीन रोग येत आहेत. आणि या रोगाचा उपाय करण्यात शेतकऱ्याला खूप आर्थिक खर्च येत आहे. पण आता आपण आज या लेखात पाहणार आहोत की आपण आपल्या घरी बिनखर्चीक कीटक नाशक कसे बनवायचे आहे.

हे पाहणार आहोत म्हणजेच आपण कडूलिंबा पासून हे कीटक नाशक तयार करणार आहोत. तर हे कीटक नाशक कसे तयार करायचे आहे. त्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे हे पाहण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

How Make Neem Pesticide

शेतकऱ्यांना या रोगाच्या कीटकनाशकांसाठी (Pesticides) आता अधिकचे पैसे मोजावे लागत आहे. तसेच शेतात रासायनिक कीटकनाशके (Chemical pesticides) आणि खतांच्या वाढत्या वापरामुळे शेतजमिनीच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होत आहे.

हेही वाचा: आपण घेतलेले खते हे खरे आहेत की बनावटीचे आहे हे कसे ओळखावे 

शेतकऱ्यांनी शेतात (Agriculture) जास्तीत जास्त सेंद्रिय कीटकनाशकांचा (Organic Pesticides) वापर करण्यासाठी सरकार आपल्या स्तरावर शेतकऱ्यांना सतत प्रोत्साहन देते.

पिकांवर निंबोळी कीटकनाशकाचा करा वापर

शेतात जास्तीत जास्त सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर करण्यासाठी सरकार आपल्या स्तरावर शेतकऱ्यांना सतत प्रोत्साहन देते. कृषी तज्ज्ञ शेतकऱ्यांना कडुलिंबाची पाने, कडुलिंब पेंड आणि निंबोळी यांचा कीटकनाशके म्हणून वापर करून शेतात वापरण्याचा सल्ला देतात.

असे केल्याने पिकातील सर्व प्रकारच्या शत्रू कीटकांचा नायनाट होतो आणि पिकाला कोणत्याही प्रकारचे रोग जाणवत नाहीत. यासोबतच पिकांच्या उत्पादनात (crop production) अनेक पटींनी वाढ होते. याशिवाय पिकांचा खर्चही अनेक पटींनी कमी होईल.

हेही वाचा : शेळी पालेन साठी बँक देते कर्ज असा करा अर्ज 

‘असे’ बनवा कडुलिंबाचे कीटकनाशक

सर्व प्रथम 10 लिटर पाणी घरी घ्या. यामध्ये पाच किलो कडुनिंब हिरवी किंवा कोरडी पाने आणि बारीक चिरलेली कडुनिंब निंबोळी, दहा किलो ताक आणि दोन किलो गोमूत्र, एक किलो लसूण एकत्र मिसळून घ्यावे. नीट मिक्स करून एका मोठ्या भांड्यात ठेवा.

रोसामा हे द्रावण काड्यांमध्ये मिसळत रहा. रंग दुधाळ झाल्यावर या द्रावणात 200 मिलीग्राम साबण आणि 80 मिलीग्राम टीपॉल घाला. आपल्या गरजेनुसार या पिकांवर फवारणी करा.

निंबोळी खताचा करा वापर

शेतात रासायनिक खतांऐवजी कडुलिंबाच्या पानांचे खत देखील वापरले जाऊ शकते. कडुनिंबाची पाने आणि निंबोळी खड्ड्यात टाकून चांगले कंपोस्ट खत तयार करता येते. त्याचा शेतात वापर केल्यास शुद्ध पीक मिळेलच, तसेच सर्व रोगांपासूनही आपला बचाव होईल.


📢 मुद्रा योजने अतर्गत मिळवा 50 हजार ते 10 लाख रु कर्ज :- येथे पहा  

📢 नवीन विहीर साठी शासन देते 3 लाख रु कर्ज :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!