Hawaman Andaj Maharshtra | शेतकऱ्यांनो काळजी घ्या, असे असेल पुढील हवामान

Hawaman Andaj Maharshtra | शेतकऱ्यांनो काळजी घ्या, असे असेल पुढील हवामान

Hawaman Andaj Maharshtra

Hawaman Andaj Maharshtra : नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यासाठी मोठी बातमी आहे. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी हवामान विभागाने राज्यातील. सर्व जनतेला व विशेषता शेतकऱ्यांना या आठवड्या मध्ये काळजी घेण्यास सांगितले आहे. पण त्यांनी असे का सांगितले आहे. व हवामानात कोणते बदल होणार आहेत या विषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचवा.

Hawaman Andaj Maharshtra

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ग्रमीण कृषी हवामान केंद्राने या आठवड्यात. शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. जिल्ह्याच्या काही तालुक्यात दोन दिवस ढगाळ हवामान राहून २९ एप्रिल ते १ मे या काळात उष्णतेची तीव्र लाट राहण्याचा अंदाज आहे. हवामानावर अधारित कृषी सेवा सल्ला समितीची आज बैठक झाली.

महाराष्टातील हवामान अंदाज 

पुढील दोन दिवस कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जना गरजने सह. पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विदर्भात मात्र हवामान कोरडे राहणार असून तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या चोवीस तासांत कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला मध्य महाराष्ट्रात. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि गारांसह पाऊस पडला मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे होते. हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी का कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मुंबईत उन्हाचा जोर कायम असून गेल्या चोवीस तासात कुलाबा वेधशाळेत 35 तर सांताक्रुज मध्ये 38.5 तापमानाची नोंद करण्यात आली.

महाराष्ट्रातील हवामान खात्याचा अंदाज

गंभीर वाढीच्या टप्प्यावर सिंचनाची वारंवारता वाढवावी. नुकत्याच लागवड झालेल्या रोपांना सावली करण्याची व्यवस्था करावी. गरम वार्‍याला अडथळा निर्माण होण्यासाठी शेताच्या कडेला, बांधावर व्यवस्था करावी.जनावरांना सावलीत ठेवावे आणि पिण्यास भरपूर स्वच्छ आणि थंड पाणी द्यावे. जनावरांकडून सकाळी १२ ते दुपारी ३ या काळात काम करू घेऊ नये. त्यांना हिरवे गवत, प्रथिनेयुक्त, खनिज मिश्रण आणि मीठयुक्त खाद्य द्यावे.जनावरांना सकाळी किवा सायंकाळी चरावयास न्यावे. जनावरांच्या गोठ्याचे तापमान कमी करण्यासाठी शेडचे छत पेंढ्याने झाकावे तसेच भिंतींना पांढरा रंग द्यावा किंवा भिंतींना शेण-मातीचा लेप लावावा.पोल्ट्री हाऊसमध्ये पडदे लावावेत आणि हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी. भिंतींना पांढरा रंग द्यावा किंवा भिंतींना शेण-मातीचा लेप लावावा.
महाराष्ट्रातील हवमान अंदाज 

27 आणि 28 एप्रिल रोजी कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस तर काही. ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट पाहण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र पुढील आठवडाभर हवामान कोरडे राहणार असून तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


📢 कुकुट पालन अनुदान योजना २०२२ सुरु :- येथे पहा 
📢 कुसुम सोलर पंप अनुदान योजना २०२२ :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!