Havaman Andaj Maharashtra | राज्यात पाच दिवस मुसळधार पाऊस बरसणार, या जिल्ह्यांना दिला ऑरेंज अलर्ट

Havaman Andaj Maharashtra: जून महिना संपण्यात आलेला आहे परंतु महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस झालेला नाही. अनेक भागात पाऊस नसल्यामुळे पेरणीला देखील सुरूवात झाली नाही. परंतु आता शेतकऱ्यांनासाठी आनंदाची बातमी आहे. अनेक भागात दडी मारून बसलेला पाऊस दाखल झाला आहे.

Havaman Andaj Maharashtra

जून महिन्यात काही भागांत अतिशय मुसळधार पाऊस बरसला, तर काही भागांत पाऊस देखील झालेला नाही. आता पावसाची रिपरिप दिसायला सुरुवात झाली आहे. मुंबईसह राज्यात मंगळवारी रात्री अनेक ठिकाणी पावसाची रिमझिम पाहायला मिळाली. (Punjab Dakh Havaman Andaj)

लाईव्ह हवामान अंदाज

मुंबईतील काही भागांत मंगळवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस बरसला. तसेच पश्चिम उपनगरात अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, बोरीवली, कांदिवली व दहिसर या परिसरात देखील चांगलाच पाऊस बरसला.

हेही वाचा :-500 शेळ्या 25 बोकड साठी मिळतंय 50 लाख रु अनुदान आजच करा अर्ज

राज्यात देखील काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे हवेत देखील गारवा निर्माण झालेला आहे. या दोन दिवसांच्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.(Havaman Andaj)

हवामान विभागाने वर्तविली पावसाची शक्यता…

हवामान विभागाने पाच दिवस मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवलेली आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला.

उत्तर भारतात पाऊस

उत्तर भारतात देखील पावसाची वाट पाहणं सुरू आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांत पावसाची चाहूल लागलेली आहे. स्कायमेट वेदरचे हवामानशास्त्र जीपी शर्मा यांनी सोमवारी महत्वाची माहिती दिली. (Weather Report)

येत्या दोन ते तीन दिवसांत पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा आणि बांगलादेशच्या लगतच्या भागांत चक्रीवादळ निर्माण होईल. त्यानंतर 27 जूनपर्यंत दिल्लीत मान्सून दाखल होईल.

या राज्यात पाच दिवस मुसळधार पाऊस

हवामान खात्याकडून पश्चिम बंगालमध्ये येत्या पाच दिवसांत मुसळधार पाऊस बरसणार, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. बंगालच्या कोणत्या भागात मुसळधार पाऊस होणार जाणून घेऊया. (Havaman Khate Andaaz)

हेही वाचा :- कुकुट पालन साठी शासन देते 75% अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज 

दार्जिलिंग, कालिम्पॉन्ग, जलपाईगुडी, कूचबिहार आणि सिक्कीम या जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या दक्षिण आणि नैऋत्येच्या येणाऱ्या वाऱ्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेला हा हवामान अंदाज लक्षात आपल्या शेती कामांचे तसेच इतर कामांचे नियोजन करावे. तसेच हा हवामान अंदाज पुढे इतरांना देखील नक्की शेअर करा.


📢 जमिनीची मोजणी करा आता आपल्या मोबाईल वर :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!