Harbhara Top 05 Biyane | हरभरा टॉप 05 बियाणे जाणून घ्या उत्पादन क्षमता, कालावधी, संपूर्ण खरी माहिती

Harbhara Top 05 Biyane :- नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आपण पाहणार आहोत. हरभरा लागवड आपण करत असाल तर आपल्यासाठी महत्त्वाची माहिती आहे.

आपण या लेखांमध्ये हरभऱ्याचे टॉप 05 बियाणे जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम बियाणे विजय या बियाणेचे प्रसारित वर्ष 1983 साली प्रसारित करण्यात आलेला आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या द्वारे प्रसारित आहे. जमिनी यासाठी मध्यम ते भारी काळीजमीन 45 ते 60 cm खोली असलेली जमीन असणे आवश्यक आहे.

Harbhara Top 05 Biyane
Harbhara Top 05 Biyane

Harbhara Top 05 Biyane

याबाबत याचं जर आपण पाहिलं तर पेरणीच कालावधी 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर आहे. आणि बागायती 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर आहे. आणि एकरी बियाणे 35 ते 40 किलो यामध्ये आपल्याला लागते.

जर यामध्ये त्याचे उत्पादन जिल्ह्यातील सरासरी 14 क्विंटल हेक्टर ते बागायती सरासरी 23 kw हेक्टर एवढे आहे. तसेच याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

विशाल हरभरा बियाणे माहिती 

विशाल या बियाणेच माहिती पाहणार आहोत. तर सन 1995 साली प्रसारित करण्यात आलेले हे बियाणे आहेत. विशाल यामध्ये मध्यम ते हलकी जमीन.

यामध्ये तसेच काही जमीन जिरायती 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर बागायती 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पेरणीचा कालावधी मानला जातो.

प्रति एकर 35 ते 40 किलो बियाणे या ठिकाणी लागते. आणि पिकाचा कालावधी 110 ते 115 दिवस आहे. आणि या ठिकाणी जिरायतीची उत्पादन सरासरी 13 क्विंटल हेक्टरी आहे. बागायती सरासरी 20 क्विंटल हेक्टरी या ठिकाणी आहे. तर यामध्ये आहे

हरभरा दिग्विजय

हरभरा दिग्विजय प्रसारित वर्ष 2006 हे संशोधन केंद्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. जमीन याला मध्यम, भारी, काळी असलेली जमीन.  पेरणीच कालावधी जिरायतीसाठी 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर बागायतीसाठी 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर आहे.

प्रति एकर बियाणे 35 ते 40 किलो आपल्याला लागू शकते. पिकाच कालावधी 90 ते 95 दिवसाचा आहे. यामध्ये जिरायती उत्पादन क्षमता सरासरी 14 क्विंटल हेक्टर आहे.

बागायती सरासरी 23 क्विंटल हेक्टरी आहे. उशिरा पेरणी सरासरी 21 क्विंटल हेक्टरी या ठिकाणी उत्पादन आपल्याला मिळू शकते. 

हरभरा जाकी 9218

हरभरा जाकी 9218 प्रसारित वर्ष 2005 आहे. या संशोधन केंद्र आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यासाठी जमीन मध्यम ते भारी काळीजमीन आणि पेरणीचं कालावधी ऑक्टोबर चा पहिला पंधरवाडा ते नोव्हेंबर चा पहिला आठवडा आहे.

प्रति एकर बियाणे यासाठी 30 ते 35 किलो लागू शकतो. पिकाचे कालावधी 105 ते 110 दिवस उत्पादकता क्षमता सरासरी 18 ते 20 क्विंटल हेक्टरी आहे.

हरभरा फुले विक्रम

हरभरा फुले विक्रम आहे. फुले विक्रम यांचे प्रसारित वर्ष 2016 आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्याकडून याला प्रसारित करण्यात आलेला आहे. यासाठी जमीन सुद्धा मध्यम ते भारी, काळी जमीन असावी. पेरणीचा कालावधी जिरायती 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर बागायती 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर प्रति प्रती 30 किलो लागू शकतो.

पिकाचा कालावधी आहे 105 ते 110 दिवस उत्पादकता याची 16 क्विंटल प्रति हेक्टर जिरायतीसाठी बागायतीसाठी 22 क्विंटल हेक्टरी. याला थोडासा उशीरा पेरणी केल्यास 21 क्विंटल प्रति हेक्टर या ठिकाणी आपल्याला उत्पादन पासून मिळू शकते. या संदर्भातील व्हिडिओ सुद्धा आपण खाली देण्यात आलेला आहे या संदर्भात नक्की उपयोगी वाटेल अशी आशा करतो धन्यवाद.


📢 नवीन विहीर साठी शासन देते आहे 100% अनुदान :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते आहे 50 लाख रु अनुदान :- येथे पहा

Leave a Comment

close button
error: Content is protected !!