Gulabi Bond Ali | कापूस पिकावर ही फवारणी करा ! व आपल्या पिकला बोंड आली पासून दूर ठेवा

Gulabi Bond Ali | कापूस पिकावर ही फवारणी करा ! व आपल्या पिकला बोंड आली पासून दूर ठेवा

Gulabi Bond Ali

Gulabi Bond Ali:- कपाशी लागवड करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांची एक समस्या आहे. ती समस्या म्हणजे गुलाबी बोंड अळीची आहे. अनेक शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला की, यासाठी कोणती औषधे फवारायचे.

शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा लेख आहे. तर जाणून घेऊया गुलाबी बोंड अळीसाठी काय फवारायला हवं. गुलाबी बोंड अळीला घाबरून न जाता त्याची ओळख करून घेणं महत्वाचे आहे. गुलाबी बोंड अळी आपल्या घबराटीचा फायदा घेऊन.

Gulabi Bond Ali

गुलाबी बोंड अळी नियंत्रण :- मोठ्या भयानक अळीच्या जाती निर्माण झाल्या आहेत. च‌ला तर गुलाबी बोंड अळीची माहिती जाणून घेऊया. गुलाबी बोंड अळीच्या किंवा इतर अळीवर्गिय किटकांच्या जीवनचक्रात 4 अवस्थेत असतात.

यामध्ये अंडी, अळी, कोष, पतंग अशा 4 अवस्थेत असतात. यानुसार गुलाबी बोंड अळी तुमच्या क्षेत्रात आली किंवा नाही. त्याबद्दलची प्रत्येक अवस्थेतील ओळख (रंग, आकार, स्थान व काळ) शेतकऱ्याला माहिती असणे गरजेचं आहे.

हेही वाचा : आपल्या सोयाबीन पिकला अधिक फुले लागण्यासाठी करे हे उपाय 

अंडी अवस्था

अंडी अवस्था गुलाबी बोंड अळीची मादी पहिल्या पावसानंतर किंवा कापसाच्या पाते धरायच्या अगोदर. पहिल्या पिढीची सुरूवात कोवळे शेंडे व पातळ्यांवर अंडी देऊन करते. यामुळे जून-जुलै दरम्यान पतंगांनी घातलेल्या अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्यांना उपजीविकेसाठी पाते, फुले, कोवळी बोंडे उपलब्ध नसतात.

त्यामुळे या अंडीतुन निघालेल्या अळ्या मरून जातात. अशाप्रकारे गुलाबी बोंड अळीची पुढील उत्पत्ती स्थिती रोखता येईल. त्यानंतर कपाशीच्या अवस्थेत दुसऱ्या पिढीपासून अंडी सरळ नवीन

कोवळ्या बोंडावर व पुष्प कोषावर दिल्या जातात. मादी पतंग स्थितीत 100 ते 200 अंडी एकल किंवा 4 ते 5 अंडी समूहाने लहान फटीत वेगवेगळे लांबोळी, पांढरी, गोल, चपटी अंडी घालते.

अळी अवस्था

सर्वसाधारणपणे 3 ते 5 दिवसात अंडी पक्व होतात. या पक्व झालेल्या अंड्यातून पांढऱ्या रंगाची 1 मि.मी‌. लांब व डोके तपकीरी रंगाचे असलेले अळी बाहेर पडते. या अळ्या रात्री पात्यामध्ये डोमकळ्याच्या माध्यमातून बोंडात शिरतात. यासाठी 5 ते 6 दिवस लागतात. अळी अवस्था सुमारे 8 ते 21 दिवसांच्या दरम्यान असते.

कोष अवस्था

कोष अवस्था सुमारे 8 ते 10 मि.मी. लांब व बदामी रंगाची असते. कोष अवस्था सुमारे 6 ते 20 दिवस असते. त्यातून पतंग रात्री किंवा पहाटेच बाहेर पडतात. खाद्य वनस्पती अभाव व प्रतिकुल परिस्थितीत कोषावस्था 6 महिने ते 2 वर्षापर्यंत देखील राहू शकते.

हेही वाचा : कापूस पिक शेतकऱ्यांना करणार मालामाल पहा काय असेल भाव 

पतंग अवस्था

पतंग सुमारे 8 ते 9 मि.मी., करड्या रंगाचा व पतंगाच्या पुढील पंखांवर काळसर रंगाचे पट्टे दिसतात. पतंग अवस्था सुमारे 5 ते 31 दिवस राहते. या पतंगाला अंधारात राहावंसं वाटतं. त्यामुळे ते दिवसा मातीत किंवा जमिनीच्या फटीत दडून बसतात.

याचे सर्वांत महत्त्वाचे कारण असे आहे की, पतंगाचा मिलन व अंडी देण्याचा काळ रात्री म्हणजेच अमावास्येच्या काळात असतो. मंद प्रकाशात निळ्या ब्लबवर बोंड अळीचे पतंग येत असतात.

प्रखर प्रकाशात बोंड अळीचे पतंग येत नाही. हे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावे. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा येत असतो आणि त्याला रोखायचे कसे हे तुम्हाला समजलं असेल.


📢 नवीन घरकुल योजने अतर्गत मिळत आहे 1.20 लाख रु. अनुदान :- येथे पहा 

📢 200 गाई पालनसाठी शासन देत आहे 50% अनुदान :- येथे पहा जीआर

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!