Gram Panchayat Election 2022 | राज्यात ग्रामपंचायत निवडणूकीचा 'धुरळा' उडणार, 'या' तारखेला होणार मतदान

Gram Panchayat Election 2022 | राज्यात ग्रामपंचायत निवडणूकीचा ‘धुरळा’ उडणार, ‘या’ तारखेला होणार मतदान

Gram Panchayat Election 2022

Gram Panchayat Election 2022 : राज्याच्या राजकारणात सुरू असलेले हे नाटक संपलं.. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच आता गावात देखील निवडणूकीचा धुरळा उडणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने आज मोठी घोषणा केली. राज्यातील एकूण 271 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात एक परिपत्रक देखील जाहीर केलं आहे.

त्या परिपत्रकात राज्यातील 271 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. यानुसार, 5 जुलै 2022 रोजी आचारसंहिता लागू होणार आहे. 4 ऑगस्ट 2022 रोजी 271 ग्रामपंचायतीत मतदान, तर 5 ऑगस्ट 2022 रोजी मतमोजणी होणार आहे.

Gram Panchayat Election 2022 

आता येणाऱ्या पुढील महिन्यात गावात राजकीय वातावरण रंगणार आहे. राज्यात सुमारे 28,813 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी मुदत संपलेल्या 62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायत मध्ये निवडणूक कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. असं परिपत्रकात नमूद करण्यात आले.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशन प्रक्रिया राबविण्याची अशी सूचना निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. ग्रामपंचायत मतदान सकाळी 7:30 वाजेपासून ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुका दरम्यान कोरोना नियम पालन करण्याचे आदेश देखील करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत निवडणूक 2022

राज्यात एकूण 271 ग्रामपंचायत मध्ये निवडणूक होणार आहे. 4 ऑगस्टला मतदान, तर 5 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबत परिपत्रक देखील जाहीर केले. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायत मध्ये निवडणुका होणार हे जाणून घेऊया…

जिल्हा – एकूण ग्रामपंचायत

 • औरंगाबाद (संभाजीनगर) – 16
 • जालना – 28
 • बुलडाणा – 5
 • लातूर – 9
 • नाशिक – 40
 • धुळे – 52
 • जळगाव – 24
 • अहमदनगर – 15
 • पुणे – 19
 • सोलापूर – 25
 • सातारा – 10
 • सांगली – 1
 • बीड – 13
 • उस्मानाबाद (धाराशिव) – 11
 • परभणी – 3
Gram Panchayat Election 2022 Maharashtra
 • तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक – 5 जुलै 2022
 • नामनिर्देशनपत्रे सादर करण्याची मुदत – 12 ते 19 जुलै 2022 पर्यंत… (वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत)
 • नामनिर्देशनपत्राची छाननी – 20 जुलै 2022
 • नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत – 22 जुलै 2022
 • निवडणूक चिन्ह, अंतिम उमेदवारांची लिस्ट – 22 जुलै 2022 (दुपारी तीन नंतर)
 • मतदान दिंनाक – 4 ऑगस्ट 2022
 • मतमोजणी व निकाल – 5 ऑगस्ट 2022

या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे गावच्या राजकारणातही रंग भरले जाणार आहेत. यानिमित्त गावातील उमेदवारांना आप आपली ताकद दाखवि-ण्याची संधी मिळणार आहे. ही माहिती नागरिकांसाठी महत्वाची आहे, आपणं इतरांना देखील ही माहिती नक्की शेअर करा.


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!