Government Scheme : शेतकऱ्यांनासाठी सरकारची नवीन योजना, 100 टक्के अनुदान मिळणार; करा ऑनलाईन अर्ज

Government Scheme: शेतकऱ्यांनासाठी नवीन योजना आली आहे. राज्य शासनाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान हे महाराष्ट्रात 2022-23 मध्ये राबविण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे. याबाबतचा शासन निर्णय 3 जून 2022 रोजी घेण्यात आला.

Government Scheme

या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले. (Department of Agriculture) शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

Sarkari Yojana 2022

शेतकऱ्यांना फलोत्पादनासाठी अनुदान दिले जाते. राज्यातील काही शेतकऱ्यांना कमी उत्पन्न मिळत असते, तर काही शेतकरी कर्जबाजारी असतात. अशा शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे. यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. (Sarkari Yojana 2022)

शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन मोठ्या प्रमाणात अनुदान मिळवा. अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अनुदानाचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात तसेच ऑनलाईन कसा करायचा जाणून घेऊया.

आवश्यक कागदपत्रे

 1. 7/12 उतारा
 2. 8-अ प्रमाणपत्र
 3. जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती लाभार्थ्यांनासाठी आवश्यक असल्यास)
 4. खरेदी करण्याचे साधन / उपकरणांचे कोटेशन किंवा बिल
या पिकांसाठी अनुदान मिळणार

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत खालील दिलेल्या पिकांसाठी अनुदान देण्यासाठी ही योजना राबविली जाते.

 • फळे
 • भाजीपाला
 • फूल
 • सुगंधी वनस्पती
 • कंदमुळे
 • मशरूम
 • मसाले
 • नारळ
 • काजू
 • कोको
 • बांबू

 

शेतकऱ्यांना मिळणार एवढं अनुदान

शेतकऱ्यांना राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाणार आहे. राज्य सरकारकडून 40 टक्के तर केंद्र सरकारकडून 60 टक्के अनुदान दिले जाते. म्हणजेच तुम्हाला 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे.

 असा करा ऑनलाईन अर्ज
 • या दिलेल्या  https://mahadbtmahait.gov.in/Farmer/SchemeData/SchemeData?str=E9DDFA703C38E51AF823840F3424F82E वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
 • वेबसाईट ओपन केल्यानंतर, खाली ‘नवीन अर्जदार नोंदणी’ तिथे क्लिक करून तुम्हाला अर्ज करायचा आहे.
 • या वेबसाइटवर लाभार्थ्यांनी संपूर्ण माहिती भरून आणि कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज भरायचा.
 • यामुळे शेतकऱ्यांना या योजनेच्या अनुदानाचा लाभ घेता येईल.
 • या वेबसाइटवर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता व अटी देखील आहे. त्या व्यवस्थितपणे वाचून अर्ज भरावा लागणार आहे.

सरकारची ही नवी शेतकऱ्यांनासाठी फायद्याची आहे. या योजनेत राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही कडून अनुदान दिले जाते. या योजनेची माहिती शेतकऱ्यांना माहिती असायला हवी. ही माहिती पुढे शेतकरी बांधवांना नक्की पाठवा.


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!