Government Scheme for Farmers | शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये, मोदी सरकारची जबरदस्त योजना; असा करा ऑनलाईन अर्ज

Government Scheme for Farmers | शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये, मोदी सरकारची जबरदस्त योजना; असा करा ऑनलाईन अर्ज

Government Scheme for Farmers

Government Scheme for Farmers: रासायनिक खतांच्या शेतीतून शेतकऱ्यांना बाहेर काढून सेंद्रिय शेती करावी, यासाठी सरकार प्रयत्न करतांना दिसत आहे. मोदी सरकार रासायनिक शेतीच्या चक्रातून योजनेतंर्गत बाहेर काढण्याचा, सरकारचा प्रयत्न सुरू आहे. सेंद्रिय शेती करणाऱ्यांसाठी एक फायद्याची योजना आहे.

Government Scheme for Farmers

सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने 2015-16 मध्ये एक योजना सुरू केली. या योजनेचे नाव ‘परंपरागत कृषी विकास योजना’ असे आहे. (Paramparagat Krushi Vikas Yojana) शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा कसा होईल, सविस्तर जाणून घेऊया..

परंपरागत कृषी विकास योजना

परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 3 वर्षांसाठी 50,000 रुपयांचे अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांना हे अनुदान टप्प्यात दिले जाते. पहिल्या वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 31,000 हजार रुपये वर्ग केले जातात.‌ यातून शेतकऱ्यांना सेंद्रिय खते, कीटकनाशके व बियाण्याची व्यवस्था करता येईल.

शेतकऱ्यांना दुसऱ्या वर्षी 8,800 रुपये दिले जातात. यातून पीक कापणी, पॅकेजिंग व मार्केटिंगसह हे अनुदान वर्ग केले जाते. तसेच क्लस्टर व क्षमता वाढीसाठी राज्य सरकारकडून 3 वर्षांसाठी 3000 प्रति हेक्टरी मदत केली जाते. (Paramparagat Krushi Vikas Yojana 2022)

 हेही वाचा : सुकन्या समृद्धी योजनेत झाले मोठे बदल पहा ते कोणते 

योजनेची पात्रता

 • परंपरागत कृषी विकास योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी भारताचा रहिवासी असावा.
 • योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी असावा.
 • अर्जदाराचे वय हे 18 वर्षांपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे.
आवश्यक कागदपत्रे
 1. शेतकऱ्यांच्या वयाचा पुरावा
 2. मोबाईल नंबर
 3. पासपोर्ट फोटो
 4. आधार कार्ड
 5. रहिवासी प्रमाणपत्र

इत्यादी कागदपत्रे अर्ज करताना आवश्यक आहे. अर्ज करताना या कागदपत्रांची स्कॅन कॉपी करावी लागणार आहे.

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी असा करा अर्ज
 • योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट https://pgsindia-ncof.gov.in/ वर जावे.
 • होम पेजवर ‘ऑप्शन’ या पर्यायावर क्लिक करा.
 • तुमच्यासमोर फॉर्म ओपन होईल. शेतकऱ्यांना वैयक्तिक माहितीसह व्यवस्थितपणे फॉर्म भरणं आवश्यक आहे.
 • तसेच अर्जासोबत, आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी करणं अनिवार्य आहे.
 • सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर ‘सबमिट’वर क्लिक करा.
 • प्रक्रियेची माहिती अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडीवर मिळून जाईल.

परंपरागत कृषी विकास योजनेच ऑनलाईन अर्ज करण्यासठी येथे क्लीक करा 

अशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस आहे. शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची भन्नाट योजना आहे. या योजनेची लाभाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाते. यामुळे ही योजना शेतकऱ्यांनसाठी फायद्याची ठरेल. आपण देखील थोडंसं सहकार्य करून, ही माहिती पुढे शेतकऱ्यांना नक्की शेअर करा.


📢 कडबा कुट्टी मशीन साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!