Gobar Scheme | शेणखतापासून कमवा पैसे; सरकारची जबरदस्त योजना

Gobar Scheme | शेणखतापासून कमवा पैसे; सरकारची जबरदस्त योजना

Gobar Scheme

Gobar Scheme: शेतकरी जनावरांचे एकाजागी शेण साठवित असतो. शेणाचे अनेक उपयोग आहेत. भारतीयांना शेण कसे वापरायचे चांगलेच माहिती आहे. आता मोदी सरकार शेतकऱ्यांच्या जनावरांच्या शेणापासून उत्पन्न वाढविण्याचा काम करत आहे. देशात तब्बल 300 दक्षलक्षाहून अधिक गुरे आहेत.

अनेकांना शेणाचे वेगवेगळे फायदे माहित आहे. शेणापासून बनवलेले बायोगॅस घरगुती गॅसच्या 50 टक्के गरजांची पूर्तता करते. भारत सरकारने एक कंपनी सुरू केली आहे जी शेणापासून बायोगॅस, कंपोस्ट आणि इतर उत्पादने बनविण्याचे काम करेल.

Gobar Scheme

शेणाचे अनेक फायदे असल्यामुळे शेणाला चांगलेच महत्त्व आहे. शेणाला चांगलीच किंमत मिळते. यामुळे शेणाला मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी सरकार योजना राबवित आहे.

शेणापासून कमवा पैसे

केंद्र सरकारने राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड (एनडीडीबी) मालकीची उपकंपनी, एनडीडीबी मृदा लिमिटेडची स्थापना केली आहे. ही नवीन कंपनी एनडीडीबी मृदा लिमिटेड मळी/शेणाच्या विक्री मधून दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक उत्पन्नाचे मार्ग निघतील.

हेही वाचा : नवीन घरकुल योजना अतर्गत मिळणार 1.20 लाख रु अनुदान 

स्वयंपाकाच्या इंधनाचे बायोगॅसमध्ये रूपांतर केल्याने शेतकऱ्यांची बचत होईल. गोवंशाच्या शेणाचा जास्त वापर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. ही नवीन कंपनी कंपोस्ट व्यवस्थापनसाठी प्रोत्साहन देईल. (Gobar Gas)

या शेणाचा खतासाठी जास्त वापर केला जाईल. शेणाचा खताचा वापर केल्याने रासायनिक खताची जागा सेंद्रिय खत घेतील. ज्यामुळे भारतामध्ये रासायनिक खताची आयातीवरील अवलंबित्व कमी होईल, असा सरकारचा विश्वास आहे.

शेणाचा उपयोग

शेणाचा उपयोग, बायोगॅस संयंत्र वापरून बायोगॅस निर्मितीसाठी होतो. हा तयार झालेला बायोगॅस जळण व इंधनासाठी वापरण्यात येतो. शेण व गांडूळ यांचा वापर करून चांगले असे गांडूळ खत तयार करता येते. अनेक ठिकाणी शेणाचे प्रकल्प देखील पाहायला मिळतात.

या शेणाचा शेतासाठी खत म्हणून वापर केल्या जातो. यासाठी शेणखत एका जागी सहा महिने कुजून साठवून त्याचा शेणखत म्हणून उपयोग केला जातो. यामुळे उत्पादन क्षमता देखील वाढते. तसेच शेणाचे असे विविध प्रकारचे छोटे ते मोठे फायदे आहेत.

हेही वाचा : सोयाबीन पिवळी पडत आहे तर त्यासाठी हे उपाय नक्की करा 

एनडीडीबी मृदा लिमिटेड

एनडीडीबी मृदा लिमिटेड कंपनी खत व्यवस्थापन श्रृंखला तयार करून शेणाच्या वापरावर लक्ष केंद्रित करेल, जे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी फायदेशीर ठरेल.

तसेच स्वच्छ भारत मिशन आणि हरित उर्जेला प्रोत्साहन देईल. कंपनी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करून काम करेल. तसेच प्रत्येक दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या घरी बॉयोगॅस संयंत्र उभारण्यात येईल.


📢 कडबा कुट्टी मशीन साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाळ योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!