Glyphosate Herbicide Banned Best | ग्लायफोसेट या तणनाशकाच्या देशभरातील वापरावर शेवटी निर्बंध घातलेतच. आता त्याला पर्याय काय 1

Glyphosate Herbicide Banned: ग्लायफोसेट या तणनाशकाच्या देशभरातील वापरावर शेवटी निर्बंध घातलेतच. अर्थात ही प्रक्रिया देशात मागील चार-पाच वर्षांपासून सुरू होती. जुलै २०२० मध्ये केंद्र सरकारने ग्लायफोसेटचा वापर देशात केवळ कीड नियंत्रण व्यावसायिक (पेस्ट कंट्रोल ऑपरेटर) यांच्या माध्यमातूनच करण्यात यावा. असा मसुदा आदेश काढला होता. त्यावर केंद्र सरकारने ९० दिवसांत सूचना, हरकती मागविल्या होत्या.

Glyphosate Herbicide Banned 

देशभरातून आलेल्या सूचना, हरकतींचा तज्ज्ञ समितीकडून अभ्यास केला गेला. या समितीच्या अहवालानुसार ग्लायफोसेट हे तणनाशक मानवी तसेच जनावरांच्या आरोग्यास घातक असल्याचा निष्कर्ष काढून त्यावर निर्बंध घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. .

त्यामुळे आत्ताच्या आदेशानुसार कीड नियंत्रक व्यावसायिक यांच्याशिवाय देशात कोणीही ग्लायफोसेटचा वापर करू शकत नाहीत. मुळात या आदेशात काहीही स्पष्टता नाही. देशभरातील शेतीमध्ये कीड Glyphosate Herbicide Banned नियंत्रण व्यावसायिक ही संकल्पनाच अस्तित्वात नाही. केंद्र सरकारने ती बाहेर देशांतून उचलली आहे.

का घातले या ग्लायफोसेट तानानाशक वर बंदी 

काही प्रगत देशांत शेती क्षेत्र मोठे असल्याने तेथील शेतकरी तण अथवा कीड नियंत्रण हे अशा व्यावसायिकांकडून करून घेतात. आपल्याकडे कीड नियंत्रण व्यावसायिक केवळ घरगुती तसेच गोदामातील पेस्ट कंट्रोलमध्ये आढळून येतात. त्यांच्याकडून ग्लायफोसेटचा वापर होत नाही. अशावेळी कुठलाही निर्णय घेताना बाहेरची एखादी संकल्पना अथवा तत्त्व आपल्याकडे जसेच्या तसे लागू पडते का? याचाही विचार केला गेला पाहिजे.

ग्लायफोसेट या तणनाशकाला पर्याय काय येथे पहा 

तणनाशक याचा वापर नियंत्रितच हवा

कोणतेही कीडनाशक असो की तणनाशक याचा वापर नियंत्रितच हवा. अनियंत्रित वापर मानवी आरोग्य तसेच पर्यावरणास हानिकारक ठरतो. ग्लायफोसेटमुळे कर्करोगाचा धोका संभवतो.

परंतु लेबल क्लेमनुसार त्याचा प्रमाणबद्ध वापर केला तर हे तणनाशक मानवी आरोग्यासाठी धोकादायक नाही, अशी निरीक्षणे अनेक संस्थांनी नोंदविली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने २०१८ मध्ये ग्लायफोसेटमुळे कर्करोग होण्याचा धोका जवळपास नसल्याचाच निष्कर्ष काढला आहे.

अशावेळी एखाद्या तणनाशकावर थेट बंदी आणण्याऐवजी त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून नियंत्रित वापर होण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न होणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही.

Leave a Comment

close button
error: Content is protected !!