Gharkul Yojana Maharashtra | नवीन घरकुल योजना आली, 1.20 लाख मिळणार; असा घ्या लाभ

Gharkul Yojana Maharashtra | नवीन घरकुल योजना आली, 1.20 लाख मिळणार; असा घ्या लाभ

Gharkul Yojana Maharashtra

Gharkul Yojana Maharashtra: चांगलं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असते. परंतु आर्थिक परिस्थिती मुळे कोणाकडून घर बांधणे देखील शक्य होत नाही. सगळा खर्च खाण्यापिण्यात व कपडालत्ता मध्येच जातो. काही असे देखील राज्यात नागरिक आहे त्यांचं घर देखील नाही, ते पालव तयार करून अवघड परिस्थितीत राहतात.

Gharkul Yojana Maharashtra

सामान्य नागरिकांनी करावं तरी काय..? असा प्रश्न सर्वांना पडला असेल… सरकार घर बांधण्यासाठी योजनेतंर्गत हातभार लावते. या सरकारच्या मदतीमुळे घर बांधण्यासाठी मदत मिळते. राज्य सरकारची नवीन घरकुल योजना आली आहे. योजनेची संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेऊया.

नवीन घरकुल योजना

राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत नवीन घरकुल योजना मंजूर करण्यात आली. या नवीन योजनेचे नाव ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना’ असं आहे. (Krantijyoti Savitribai Phule Gharkul Yojana) या योजनेमुळे नागरिकांना घर मिळवून देण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान संपूर्ण माहिती पहा 

राज्यातील ग्रामीण भागात मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी ही योजना राबविली जाणार आहे. ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजने’ला नुकतीच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

एवढा लाभ मिळणार

राज्यातील ग्रामीण भागात 20 लाभार्थ्यांसाठी एक वसाहत निर्माण करण्यात येणार आहे. एका वसाहतीसाठी अंदाजे 88.43 लाख एवढा खर्च येऊ शकतो. या वसाहतींना सर्व नागरी सुविधा देणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे.

10 कुटुंबासाठी तब्बल 44.31 लाख एवढा खर्च एका वसाहतीसाठी येणार आहे. घरकुल बांधकाम करण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांना या योजनेतंर्गत 1.20 लाख एवढं अर्थसहाय्य मिळेल.

जे लाभार्थी या योजनेसाठी निवडले जातील, त्यांची निवड जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे केली जाईल. या आर्थिक वर्षात वसाहतीसाठी तसेच वैयक्तिक घरकुलांसाठी सुमारे 30 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार

राज्यातील ग्रामीण भागात विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

घरकुल योजनेचा शासन निर्णय पाह्ण्यासाठी येथे क्लीक करा 

10 कुटुंबांकरिता प्रति वसाहतीसाठी अंदाजे 44.31 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. घरकुल बांधकामासाठी प्रति लाभार्थी 1.20 लाख रुपये निधी अनुज्ञेय असेल.

ग्रामीण भागात अनेक नागरिकांना चांगली घरं नाहीत.‌ अशा नागरिकांना या योजनेमुळे घरे मिळणार आहेत. या योजनेची माहिती नागरिकांसाठी महत्वाची आहे. आपणं ही माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा.


📢 आपल्या जमिनीची मोजणी करा आता आपल्या मोबाईल वरूनच :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप साठी शासन देते 95% अनुदान :- येथे पहा 

1 thought on “Gharkul Yojana Maharashtra | नवीन घरकुल योजना आली, 1.20 लाख मिळणार; असा घ्या लाभ”

  1. Pingback: Water Pump | तुमचा कृषी पंप नेहमी खराब होतो का ? त्यासाठी असे करा उपाय

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!