Gay Gotha Yojana Maharashtra | गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2022 | गाय गोठा

Gay Gotha Yojana Maharashtra | गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2022 | गाय गोठा

Gay Gotha Yojana Maharashtra

Gay Gotha Yojana Maharashtra :  ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्याला वैयक्तिक व सार्वजनिक कामे हाती घेऊन. त्याद्वारे कायमस्वरुपी मत्ता निर्माण करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. व कामाअभावी होणारे स्थलांतर थांबविणे हा उद्देश आहे. या कामांसाठी आवश्यक असणारे ६०:४० अकुशल-कुशल कामगारांचे प्रमाण संतुलित राहण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी. योजनेच्या विविध योजनांच्या जसे की, शेततळे, वृक्ष लागवड, शोषखड्डे, फळबाग लागवड, इत्यादी. अकुशल खर्चाचे प्रमाण जास्त असलेल्या योजनांच्या संयोजनातून या बाबी दिल्याने. प्रत्येक शेतकरी समृद्ध (लखपती) होतील, असा योजनेचा उद्देश आहे.

Gay Gotha Yojana Maharashtra

गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधकाम. यात दोन ते सहा गुरांसाठी एक गोठा बांधता येईल. त्यासाठी 77,188 रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे. सहापेक्षा अधिक गुरांसाठी सहाच्या पटीत म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट, 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान मिळणार आहे.

जनावरांचा गोठा अनुदान

  सदर कामाचा लाभ मिळवण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन,  वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्रे असलेले लाभार्थी पात्र असतील. गोठ्यांच्या प्रस्तावासोबत जनावरांची टगिंग आवश्यक राहील. या कामाला नियोजन विभागाच्या दिनांक २ सप्टेंबर २०२० रोजीच्या शासन परिपत्रकातील परिशिष्ट ९ मधील अनु क्रमांक ७५ नुसार नरेगा अंतर्गत ७७ हजार १८८ रु. इतका अंदाजित खर्च उपरोक्त शासन परिपत्रकातील सहा गुरांसाठी ची तरतूद रद्द करून. २ गुरे ते ६ गुरे करिता एक  गोटा व त्यानंतरच्या. अधिकच्या गुरांसाठी ६ च्या पटीत म्हणजेच १२ गुरांसाठी दुप्पट व १८ पेक्षा जास्त गुरांसाठी ३ पट अनुदान देय राहील. मात्र ३ पट्टीपेक्षा जास्त अनुदान अनुज्ञेय राहणार नाही.
शेळी पालन शेड अनुदान योजना 
शेळीपालन शेड बांधकाम 10 शेळ्यांकरिता शेड बांधण्यासाठी 49,284 रुपये अनुदान दिले जाणार आहे. 20 शेळ्यांसाठी दुप्पट, तर 30 शेळ्यांकरिता तिप्पट अनुदान दिले जाणार आहे. जर अर्जदाराकडे 10 शेळ्या नसतील तर किमान दोन शेळ्या असाव्यात. असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
कुकुट पालन शेड अनुदान योजना 
कुक्कुटपालन शेड बांधकाम 100 पक्ष्यांकरिता शेड बांधायचे असेल. तर 49,760 रुपये अनुदान दिले जाणार आहे. 150 पेक्षा जास्त पक्षी असल्यास दुपट निधी दिला जाणार आहे. जर एखाद्याकडे 100 पक्षी नसल्यास 100 रुपयांच्या स्टॅम्पवर दोन जामीनदारांसह शेडची मागणी करता येईल. त्यानंतर यंत्रणेने शेड मंजूर करावे आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये 100 पक्षी आणणे बंधनकारक राहील.
📢  कांदा चाळ अनुदान योजना २०२२ ऑनलाईन सुरु :-येथे पहा 
📢 नवीन विहीर अनुदान योजना २०२२ ऑनलाईन सुरु :-येथे पहा

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!