Gai/Mhias Gotha Anudan Yojana | शेळी पालन शेड 100%अनुदान योजना सुरु

Gai/Mhias Gotha Anudan Yojana | शेळी पालन शेड 100%अनुदान योजना सुरु

GaiMhias Gotha Anudan Yojana

Gai/Mhias Gotha Anudan Yojana: नमस्कार सर्वांना शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी गाय/म्हैस गोठा कुकुट पालन. शेड शेळी पालन शेड साठी 100% टक्के अनुदान वरती योजना सुरू झालेले आहे. त्यासाठी अर्ज देखील सुरू झालेले शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. तर या योजने विषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे. कागदपत्रे कोण कोणती लागणार आहे. त्याचबरोबर अर्ज कसा भरायचा आहे कुठे जमा करायचा आहे. अनुदान किती गुरं पर्यंत आपल्याला मिळणार आहे. संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

Gai/Mhias Gotha Anudan Yojana

नियोजन (रोहयो) विभाग शासन परिपत्रक दिनांक ०९ ऑक्टोबर, २०१२ अन्वये तसेच नियोजन (रोहयो) विभाग शासन निर्णय दिनांक ०१ ऑक्टोबर, २०१६ मधील परिच्छेद ३.५.७ तरतुदींनुसार, ६ गुरांकरिता २६.९५ चौ.मी.जमीन पुरेशी आहे.

तसेच त्याची लांबी ७.७ मी. आणि रुंदी ३.५ मी.असावी. गव्हाण ७.७ मी. X ०.२ मी. X ०.६५ मी. आणि २५० लीटर क्षमतेचे मूत्रसंचय टाके बांधण्यात यावे. जनावरांना पिण्याच्या पाण्याची २०० लिटर क्षमतेची टाकी सुध्दा बांधण्यात यावी. सदर कामाचा लाभ

मिळविण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वत:ची जमीन, वैयक्तीक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील. गोठयांच्या प्रस्तावासोबत जनावरांचे टॅगिंग आवश्यक राहील. या कामाला नियोजन (रोहयो) विभागाच्या दिनांक ०२ सप्टेंबर, २०२० रोजीच्या शासन परिपत्रकातील परिशिष्ट-९ मधील अनुक्रमांक ७५ नुसार नरेगा अंतर्गत रु.७७,१८८/- इतका अंदाजित खर्च येईल. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

गाय/म्हैस गोठा अनुदान योजना 

अकुशल खर्च = रु.६,१८८/- (प्रमाण ८ टक्के) कुशल खर्च रु.७१,०००/- (प्रमाण ९२ टक्के) = एकूण रु.७७,१८८/- (प्रमाण १०० टक्के) तथापि हे मापदंड सध्या प्रचलित मजूरी दर व DSR प्रमाणे आहे. जेव्हा केव्हा या दोनपैकी कोणत्याही एक किंवा दोन्हींच्या दरात बदल होईल तेव्हा या अंदाजित खर्चात बदल होईल.

हेही वाचा : सुकन्या समृद्धी उओज्नेत झाले मोठे बदल पहा संपूर्ण माहिती 

त्या प्रकारच्या बदलास मान्यता देण्याचा अधिकार जिल्हा कार्यक्रम समन्वयक/जिल्हा कार्यक्रम सह समन्वयक/ आयुक्त, मग्रारोहयो यांना प्रदान करण्यात येत आहे. उपरोक्त शासन परिपत्रकातील ६ गुरांसाठीची तरतूद रद्द करुन दोन गुरे ते ६ गुरे करिता एक गोठा व त्यानंतरच्या अधीकच्या गुरांसाठी ६ च्या पटीत म्हणजेच १२ गुरांसाठी दुप्पट व १८ पेक्षा जास्त गुरांसाठी ३ पट अनुदान देय राहील मात्र ३ पटीपेक्षा जास्त अनुदान अनुज्ञेय राहणार नाही.

शेळी पालन शेड अनुदान योजना 

शेळीपालन शेड बांधणे:- सद्य:स्थिती:- शेळीपालन हा ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न गटातील कुटुंबाच्या उपजिवीकेचे महत्वाचे साधन आहे. अल्प उत्पन्न असलेल्या ग्रामीण भागातील कुटुंबाच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी. शेळीपालन या व्यवसायाकरिता मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.

ग्रामीण भागातील शेळी मेंढी पालनावर उदरनिर्वाह करणारी गोरगरीब कुटूंबे पैशा अभावी शेळया-मेंढयाना चांगल्या प्रकारचा सरंक्षित निवारा देऊ शकत नाहीत. चांगल्या निवाऱ्याअभावी शेळया मेंढयामध्ये विवीध प्रकाराचे जंतजन्य, संसर्गजन्य, बाहयपरजीवी किटकांचा प्रादुर्भाव होतो.

त्यामुळे रोगग्रस्त, खुरटी व आर्थिकदृष्टया फारशी किफायतशीर नसलेल्या शेळया-मेंढयाचे कळप पाळले जातात. याकरिता मागणी केलेल्या प्रत्येक कुटुंबास नरेगा योजनेअंतर्गत. शेळीपालन शेड बांधणे हे काम उपलब्ध करुन देण्यात येईल.

Sheli Palan Shed Anudan Yojana

ग्रामीण भागामध्ये शेळया – मेंढयापासून मिळणारे शेण, लेंडया व मूत्र यापासून तयार. होणा-या उत्कृष्ठ दर्जाच्या सेंद्रीय खतांचा पक्क्या स्वरुपाचे व चांगले गोठे नसल्याने नाश होतो. शेळया मेंढयाकरिता चांगल्या प्रतीचे शेड बांधून दिल्यास या जनावरांचे आरोग्य देखील चांगले राहणार.

असून वाया जाणारे मल, मूत्र एकत्र करुन शेतीमध्ये उत्कृष्ठ प्रकारचे सेंद्रीय खत म्हणून वापर करता येईल. यामुळे शेतीच्या सुपिकतेबरोबरच शेती उत्पादन वाढीवर चांगला परिणाम होऊन उदरनिर्वाहासाठी मदत होऊ शकेल.

नियोजन (रोहयो) विभाग शासन परिपत्रक दिनांक ०९ ऑक्टोबर, २०१२ अन्वये तसेच नियोजन (रोहयो) विभाग शासन निर्णय. दिनांक ०१ ऑक्टोबर, २०१६ मधील परिच्छेद ३.५.९ तरतुदींनुसार, १० शेळयांकरिता ७.५० चौ.मी.निवारा पुरेसा आहे.

तसेच त्याची लांबी ३.७५ मी. आणि रुंदी २.० मी.असावी. चारही भिंतीची सरासरी उंची २.२० मी. असावी. भिंती १:४ प्रमाण असलेल्या सिमेंटच्या व विटांच्या असाव्यात. छतास लोखंडी तुळयांचा आधार देण्यात यावा.

हेही वाचा : दुग्ध व्यवसाय सुरु करण्यासाठी शासन देत 33% अनुदान येथे पहा  

छतासाठी गॅल्व्हनाइज्ड लोखंडी पत्रे / सिमेंटचे पत्रे वापरावेत. तळासाठी मुरुम घालावा. शेळयांना पिण्याच्या पाण्याची टाकी बांधावी. सदर कामाचा लाभ मिळविण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वत:ची जमीन, वैयक्तीक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील. तसेच भूमिहीन (शेती नसलेले) कुटूंबाना प्राधान्य देण्यात यावे.

शेळी पालन शेड अनुदान किती ? 

या कामाला नियोजन (रोहयो) विभागाच्या दिनांक ०२ सप्टेंबर, २०२० रोजीच्या शासन परिपत्रकातील परिशिष्ट-९ मधील अनुक्रमांक ७६ नुसार नरेगा अंतर्गत रु.४९,२८४/- इतका अंदाजित खर्च येईल. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अकुशल खर्च = रु. ४,२८४/- (प्रमाण ८ टक्के) कुशल खर्च = रु.४५,०००/- (प्रमाण ९२ टक्के) एकूण = रु.४९,२८४/- (प्रमाण १०० टक्के) एकूण तथापि हे मापदंड सध्या प्रचलित मजूरी दर व DSR प्रमाणे आहे. जेव्हा केव्हा या दोनपैकी कोणत्याही एक किंवा दोन्हींच्या दरात बदल होईल तेव्हा या अंदाजित खर्चात बदल होईल. त्या प्रकारच्या बदलास मान्यता देण्याचा अधिकार जिल्हा कार्यक्रम समन्वयक / जिल्हा कार्यक्रम सह समन्वयक/ आयुक्त, मग्रारोहयो यांना प्रदान करण्यात येत आहे.

लाभार्थाने शेळीची व्यवस्था स्वत: करणे

शेळी ही गरीबाची गाय समजली जाते. मुख्यत: भूमिहीन शेतमजूर शेळी पालन करतात. भूमिहीन शेतमजूराकडे समृद्धी करिता शेतजमीन नसल्यामुळे शेळीपालन किंवा तत्सम बाबीच श्रीमंती करिता शिल्लक राहतात. शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे १० शेळ्यांचा एक गट दिला जातो.

शासनाचे अनुदान न मिळाल्यास एका भूमिहीन शेतकऱ्याला स्वतःच्या पैशातून दहा शेळ्या विकत घेणे शक्य होत नाही. त्यामुळे हे स्पष्ट करण्यात येते की दहापेक्षा कमी शेळ्यांचा गट असल्यास त्या “गरिबीतून बाहेर पडणे अवघड जाते.

३० शेळी पर्यंत अनुदान मिळणार 

रोजगार हमी योजनेतून हा खर्च अनुज्ञेय नाही. एक भूमिहीन शेतमजूर स्वतःच्या पुंजी तून जर विकत घेऊ शकला तर त्या शेळ्यांची संख्या दर सहा महिन्यात किमान दोन पट होते त्यामुळे एका वर्षांत त्या शेतमजूर/शेतकरी यांच्याकडे १० शेळ्यांचा गट निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे उपरोक्त सर्व बाबी पाहता किमान दोन शेळ्या असलेल्या भूमिहीन मजुरांना/ शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ अनुज्ञेय करणे योग्य होईल. (Gai/Mhias Gotha Anudan Yojana) तसेच हेही स्पष्ट करण्यात येते की शेळीपालनाच्या शेडसाठी प्रत्येक दहा शेळ्यांसाठी एक गट

समजण्यात येईल व त्याप्रमाणे परिपत्रकानुसार अनुदान अनुज्ञेय करण्यात येईल तसेच, ज्या लाभार्थ्याकडे १० पेक्षा अधीक शेळ्या असतील त्यांना शेळ्यांसाठीचे दोन गट लक्षात घेवून दोन पट अनुदान राहील. मात्र एका कुटुंबास जास्तीत जास्त ३० शेळ्यांकरिता तीन पट अनुदान मंजूर करण्यात येईल.

हेही वाचा : कुकुट पालन साठी शासन देते 75% अनुदान येथे करा ऑनलाईन अर्ज 

कुक्कुटपालन शेड अनुदान योजना

सद्य:स्थिती:- परसातील कुक्कुट पालनामुळे ग्रामीण भागातील कुटुंबाना पूरक उत्पादनाबरोबरच आवश्यक पोषक प्राणीजन्य प्राथिनांचा पुरवठा होतो. खेडयामध्ये कुक्कूटपक्षांना चांगल्या प्रतीचा निवारा उपलब्ध नसतो. त्यामुळे त्यांचे आरोग्य नेहमीच खालावलेले असते.

कुक्कूटपक्ष्यांचे उन, पाऊस, परभक्षी जनावरे व वारंवार येणा-या आजारांपासून सरंक्षण करण्यासाठी चांगल्या प्रतीचा निवारा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. चांगल्या निवा-यामुळे रात्रीच्या वेळी त्यांचे, पिल्लांचे व अंडयाचे परभक्षी प्राण्यांपासून सरंक्षण होण्यास मदत होईल. सदर कामाचा लाभ मिळविण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वत:ची जमीन, वैयक्तीक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील.

तसेच भूमिहीन (शेती नसलेले) कुटूंबाना प्राधान्य देण्यात यावे. या कामाला नियोजन (रोहयो) विभागाच्या दिनांक ०२ सप्टेंबर, २०२० रोजीच्या शासन परिपत्रकातील परिशिष्ट-९ मधील अनुक्रमांक ७७ नुसार नरेगा अंतर्गत रु.४९,७६०/- इतका अंदाजित खर्च येईल. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Sheli Palan Anudan Yojana 

अकुशल खर्च = रु.४,७६०/- (प्रमाण १० टक्के)
कुशल खर्च = रु.४५,०००/- (प्रमाण ९० टक्के)
एकूण =       रु.४९,७६०/- (प्रमाण १०० टक्के)
तथापि हे मापदंड सध्या प्रचलित मजूरी दर व DSR प्रमाणे आहे. जेव्हा केव्हा या दोनपैकी कोणत्याही एक किंवा दोन्हींच्या दरात बदल होईल तेव्हा या अंदाजित खर्चात बदल होईल. त्या प्रकारच्या बदलास मान्यता देण्याचा अधिकार जिल्हा कार्यक्रम समन्वयक / जिल्हा कार्यक्रम सह समन्वयक/ आयुक्त, मग्रारोहयो यांना प्रदान करण्यात येत आहे.

Kukutpalan Shed Anudan Yojana 

नियोजन (रोहयो) विभाग शासन परिपत्रक दिनांक ०९ ऑक्टोबर, २०१२ अन्वये तसेच नियोजन (रोहयो) विभाग शासन निर्णय दिनांक ०१ ऑक्टोबर, २०१६ मधील परिच्छेद ३.५.८ तरतुदींनुसार, १०० पक्ष्यांकरिता ७.५० चौ.मी.निवारा पुरेसा आहे तसेच त्याची लांबी ३.७५ मी. आणि रुंदी २.० मी.असावी. लांबीकडील बाजूस ३० सेमी उंच व २० सेमी जाडीची, विटांची जोत्यापर्यंत भिंत असावी. तसेच छतापर्यंत कुक्कूट जाळी ३० सेमी x ३० सेमीच्या खांबानी आधार दिलेली असावी. आखूड बाजूस २० सेमी

जाडीची सरासरी २.२० मीटर उंचीची भिंत असावी. (Gai/Mhias Gotha Anudan Yojana) छतास लोखंडी तुळयांचा आधार द्यावा.छतासाठी गॅल्व्हनाइज्ड लोखंडी पत्रे / सिमेंटचे पत्रे वापरावेत. तळयाच्या पायासाठी मुरुमाची भर घालावी त्यावर दुय्यम दर्जाच्या विटा व सिमेंटचा १ : ६ प्रमाण असलेला मजबूत थर असावा. पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.

लाभार्थ्याने पक्ष्यांची व्यवस्था स्वत: करणे :-

सध्या शासन परिपत्रकानुसार १०० पक्ष्यांकरिता अनुदान अनुज्ञेय आहे. मात्र, यामध्ये असे स्पष्ट करण्यात येते की, ज्या शेतकऱ्यांना /शेतमजूरांना कुक्कुटपालन करावयाचे आहे. परंतु, १०० पेक्षा अधीक पक्षी ज्यांच्याकडे नाहीत अशा लाभार्थ्यांनी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दोन जामिनदारांसह कुक्कुटपालन शेडची मागणी करावी व त्यानुसार संबंधीत यंत्रणेने संबंधीत लाभार्थ्यास शेड मंजूर करावे व शेडचे काम पूर्ण झाल्यानंतरच्या १ महिन्यांच्या कालावधीत कुक्कुटपालन शेडमध्ये १०० पक्षी

या योजनेचा फॉर्म कसा भरायचा त्यासठी हा व्हिडीओ पहा

पाळण्यासाठी आणणे बंधनकारक राहील. (Gai/Mhias Gotha Anudan Yojana) जरी शेड १०० पक्ष्यांकरिता अनुज्ञेय करण्यात आले असले तरीही सदर शेडमध्ये १५० पक्षी सामावू शकतात. त्यामुळे १०० पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थ्यांनी पक्ष्यांची संख्या १५० च्या वर नेल्यास सदर लाभार्थ्यास मोठ्या शेडसाठी दोनपट निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तथापि, कोणत्याही कुटुंबास दोनपट पेक्षा अधीक निधी अनुज्ञेय राहणार नाही. शेतीला ९०% अनुदानावर तार कुंपण योजना 

गाय/म्हैस अनुदान योजना फॉर्म डाउनलोड 

गाय म्हैस गोठा अनुदान योजनेचा फॉर्म व योजनेचा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरून जाऊन आपण (डाउनलोड येथे करा) शकता त्याचबरोबर योजनेचा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला आपल्याजवळील ग्रामपंचायत मध्ये जाऊन अर्ज सादर करायचा आहे त्याचबरोबर त्या साठी लागणारे कागदपत्रे व अन्य संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ आपण पाहू शकता व्हिडिओची लिंक (येथे पहा)


📢 आपल्या पत्नीच्या नावावर उघडा हे खाते महिन्याला मिळतील 45 हजार रु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!