Gai Gotha Yojana 2022 | शेळी पालन शेड योजना | कुकुट पालन शेड योजना 2022

Gai Gotha Yojana 2022 | शेळी पालन शेड योजना | कुकुट पालन शेड योजना 2022

Gai Gotha Yojana 2022

Gai Gotha Yojana 2022 : नमस्कार  केंद्र सरकारने 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष ठेवले आहे. हे ध्यानात घेऊन केंद्र सरकार व राज्य सरकारतर्फे शेतकर्‍यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेशी संबंधित माहिती देणार आहोत. शरद पवार ग्रामीण समृध्दी योजना. हा लेख संपूर्ण वाचा.

Sharad Pawar Gram Samridhi Yojana 2022

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या नावाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना त्यांच्या जन्म दिवसाच्या दिवशी म्हणजे 3  फेब्रुवारी 2021 रोजी सुरू महाराष्ट्र सरकार ने सुरू केली. या योजनेचे नाव शरद पवारांनी त्यांच्या जन्मतारखेचा सन्मान करण्यासाठी ठेवण्यात आले आहे. च्या माध्यमातून खेड्यांचा आणि शेतकर्‍यांचा विकास होईल.

त्यांना या योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करुन देण्यात येईल. या योजनेचे नाव श्री शरद पवार साहेब यांच्या नावावर ठेवण्यासाठी महा विकास आघाडीने सुचविले होते. मंत्रालयाने या योजनेस मान्यता दिली आहे. शरद पवार ग्रामीण समृद्धी योजने ला मनरेगा सोबत जोडण्यात येणार आहे.

शरद पवार ग्राम समृध्दी योजना माहिती

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रभर राबविली जाईल. मनरेगा अंतर्गत देण्यात येणार्‍या रोजगाराला शरद पवार ग्रामीण समृध्दी योजनेशीही जोडले जाईल. ही योजना रोजगार हमी विभागातर्फे राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांची व खेड्यांची अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होईल.

गाय व म्हैस गोठा योजना

पक्का गोठा बांधकाम :- यात दोन ते सहा गुरांसाठी एक गोठा बांधता येईल. त्यासाठी 77,188 रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे. सहापेक्षा अधिक गुरांसाठी सहाच्या पटीत म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट, 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान मिळणार आहे.

शेळीपालन शेड अनुदान योजना   

10 शेळ्यां करिता शेड बांधण्यासाठी 49,284 रुपये अनुदान दिले जाणार आहे. 20 शेळ्यांसाठी दुप्पट, तर 30 शेळ्यांकरिता तिप्पट अनुदान दिले जाणार आहे. जर अर्जदाराकडे 10 शेळ्या नसतील तर किमान दोन शेळ्या असाव्यात, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

कुक्कुट पालन शेड योजना

100 पक्ष्यांकरिता शेड बांधायचे असेल तर 49,760 रुपये अनुदान दिले जाणार आहे. 150 पेक्षा जास्त पक्षी असल्यास दुपट निधी दिला जाणार आहे. जर एखाद्याकडे 100 पक्षी नसल्यास 100 रुपयांच्या स्टॅम्पवर दोन जामीनदारांसह शेडची मागणी करता येईल. त्यानंतर यंत्रणेने शेड मंजूर करावे आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये 100 पक्षी आणणे बंधनकारक राहील.

शरद पवार ग्राम समृध्दी योजना असा करा अर्ज

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. अर्जाच्या नमुन्यानुसार. सुरवातीला तुम्ही सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्यापैकी कुणाकडे अर्ज करत आहात. (Gai Gotha Yojana 2022)  नावावर बरोबरची खूण करा.

Sharad Pawar Gram Samridhi Yojana Anudan

🎯 गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे:

📌 अकुशल खर्च – रु. 6,188/- (प्रमाण 8 टक्के )
📌 कुशल खर्च – रु.71,000/- (प्रमाण 92 टक्के )
📌 एकूण – रु.77,188/- (प्रमाण 100 टक्के )

🎯 शेळीपालन शेड बांधणे:

📌 अकुशल खर्च – रु. 4,284/- (प्रमाण 8 टक्के)
📌 कुशल खर्च – रु.45,000/- (प्रमाण 92 टक्के)
📌 एकूण – रु.49,284/- (प्रमाण 100 टक्के)

🎯 कुक्कुटपालन शेड बांधणे:

📌 अकुशल खर्च – रु. 4,760/- (प्रमाण 10 टक्के)
📌 कुशल खर्च – रु.45,000/- (प्रमाण 90 टक्के)
📌 एकूण – रु.49,760/- (प्रमाण 100 टक्के)

🎯 भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग:

📌 अकुशल खर्च – रु. 4,046/- (प्रमाण 38 टक्के)
📌 कुशल खर्च – रु. 6,491/- (प्रमाण 62 टक्के)
📌 एकूण – रु.10,537/- (प्रमाण 100 टक्के


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 पीएम किसान योजनेचा ११ वा हफ्ता कधी येणार :- येथे पहा 

1 thought on “Gai Gotha Yojana 2022 | शेळी पालन शेड योजना | कुकुट पालन शेड योजना 2022”

  1. Pingback: Sheli Palan Shed Yojana Best | शेळी पालन शेड | कुकुटपालन शेड 100% अनुदान सुरु - कृषी योजना

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!