Gai Gotha Anudan Yojana | शेळी पालन शेड योजना | कुकुट पालन शेड योजना

Gai Gotha Anudan Yojana | शेळी पालन शेड योजना | कुकुट पालन शेड योजना

Gai Gotha Yojana 2022

Gai Gotha Anudan Yojana :  नमस्कार शेतकरी बांधवांनो .आम्ही आज आपल्यासाठी शासनाची नावीण योजने बद्दल माहिती घेऊन आलो आहे. चला तर पाहूया काय आहे शासनाची ही नवीन योजना. शरद पवार ग्रामसमृद्धी योजना हि राज्य योजना म्हणून राबवण्याबाबत शासनाची मान्यता मिळाली आहे. 3 फेब्रुवारी 2021 रोजी या योजनेला शासनाने मंजुरी दिली आहे.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना अर्ज 

शरद पवार ग्रामसमृद्धी योजने अंतर्गत4 वयक्तिक योजनेचा लाभ शेतकऱ्यांना व शेत मजुरांना देण्यात येणार आहे. तर शरद पवार ग्रामसमृद्धी योजने अंतर्गत100% अनुदान दिले जाणार आहे.आणि आपण या योजनेसाठी अर्ज कसा करू शकता हे बघूया. अर्ज आपल्याला कुठे उपलब्ध होईल त्याच बरोबर योजनेचा लाभ घेण्यासाठी कागतपत्रे. पात्रता व अटी शर्ती सविस्तर शरद पवार ग्रामसमृद्धी योजना.

200 गाय पालन योजनेसाठी 2 कोटी रु. अनुदान केंद्राची योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत राबवली जात आहे. या मध्ये आणखी काही योजना आहेत जसे की गाई म्हेस पालन पक्का गोठा बंधने. व शेळी पालन शेड कुकुट पालन व भूसंजीवणी नाडेप कंपोस्ट. या 4 वयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. 

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत काही योजनांच्या संयोजनातून सदर योजना राज्य योजना म्हणुन राबविण्यात येत आहे.

या योजनेत कोणती (Gai Gotha Anudan Yojana) कामे येतात. 

 • गाय व म्हैस यांच्या करिता पक्का गोठा बांधणे 
 • शेळी पालन शेड बांधणे 
 • कुक्कुटपालन शेड बांधणे 
 • भू-संजीवणी नाडेप कंपोस्टींग 
 • या बाबींचा लाभ घेण्या साठी अनुदान किती आहे-
 • गाय व म्हैस यांच्या करिता पक्का गोठा बांधणे साठी-
 • 2 ते 6 गुरांसाठी एक गोठा – रु.77188/-. 
 • 6 पेक्षा जास्त गुरे असतील तर दोन गोठेसाठी – रु. 154376/-
 • 12 पेक्षा जास्त गुरे असतील तर तीन गोठ्यांसाठी- रु. 231564/-.

500 शेळ्या25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना  2022 सुरु

शेळी पालन शेड योजना 2022

 • 2 ते 10 शेळ्यांसाठी एक शेड – रु.49284/-. 
 • 20 पेक्षा जास्त शेळ्या असतील तर दोन शेडसाठी – रु. 98568/-
 • 30 पेक्षा जास्त शेळ्या असतील तर तीन शेडसाठी- रु. 147852/-
 • 3. कुक्कुट शेड बांधणे साठी- 100 पक्ष्यांसाठी एक शेड रु. 49760/-
 • 150पेक्षा जास्त पक्षांसाठी दोन शेड साठी- रु. 99520/-

Gai Gotha Anudan Yojana

200 गाई पालन अनुदान योजना सुरु

शेड बांधकाम किती आकारमानाचे असावे

गाय व म्हैस यांच्या करिता पक्का गोठा बांधणे साठी 6 जनावरां करीता 26.95 चौ.मी.  गोठा लांबी- 7.7 मी. आणि रुंदी- 3.5 मी. गव्हाण- 7.7 मी x 0.2 मी. X 0.65 मी. तसेच 250 ली.क्षमतेचे मुत्रसंचय टाके आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याची 200 ली.क्षमतेची टाकी सुद्धा बांधण्यात यावी. 2. शेळी पालन शेड बांधणेसाठी 10 शेळ्यांसाठी 7.50 चौ.मी. ( लांबी- 3.75 मी, रुंदी- 2 मी.) 3. कुक्कुटपालन शेड बांधणे साठी- 100 पक्षांकरीता 7.50 चौ.मी. (लांबी- 3.75 मी, रुंदी- 2 मी.)

अर्ज कुठे करावा- ग्रामपंचायती मध्ये

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना gr

शासन निर्णय दि. 3 फेब्रुवारी 2021

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!