Gai Gat Vatap Yojana | गाय म्हैस अनुदान योजना | गाय म्हैस अनुदान योजना 2022

Gai Gat Vatap Yojana | गाय म्हैस अनुदान योजना | गाय म्हैस अनुदान योजना 2022

Gay Gotha Yojana Maharashtra

Gai Gat Vatap Yojana : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी तसेच पशु बालकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आहेस पालन अनुदान योजना पंचायत समितीमार्फत राबविण्यात येत असता. याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जसे गाई म्हशी साठी किती अनुदान दिलं जातं. यावर संपूर्ण माहिती या लेखामध्ये पण आरोप तर हा लेख संपूर्ण वाचा.

गाय पालन अनुदान योजना 2022 

सहा संकरित गाई/म्‍हशींचा गट प्रति गाय/म्‍हैस 40 हजार रुपयांप्रमाणे 2 लक्ष 40 हजार रुपये, जनावरांसाठी गोठा 30 हजार रुपये. स्‍वयंचलित चारा कटाई यंत्र 25 हजार रुपये, खाद्य साठविण्‍यासाठी शेड 25 हजार रुपये, 5.75 टक्‍के (+10.03 टक्‍के सेवाकर). दराने तीन वर्षाचा विमा 15 हजार 184 रुपये अशी एकूण 3 लक्ष 35 हजार 184 रुपये सहा संकरित गायी/म्‍हशींच्‍या एका गटाची किंमत ठरविण्‍यात आलेली आहे.

सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्‍यांना 6 दुधाळ जनावरांचा एक गट वाटप करतांना 50 टक्‍के अनुदान म्‍हणजेच 1 लक्ष 67 हजार 592 रुपये. तर अनुसूचित जाती/जमातीच्‍या लाभार्थ्‍यांना 75 टक्‍के म्‍हणजेच 2 लक्ष 51 हजार 388 रुपये शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.

खुल्‍या प्रवर्गातील लाभार्थ्‍यांना अनुदाना व्‍यतिरिक्‍त उर्वरित 50 टक्‍के रक्‍कम. तसेच अनुसूचित जाती/जमातीच्‍या लाभार्थ्‍यांना अनुदाना व्‍यतिरिक्‍त उर्वरित 25 टक्‍के रक्‍कम स्‍वत: अथवा बँक/वित्‍तीय संस्‍थेकडून कर्ज घेऊन उभारावी लागेल. बँक/वित्‍तीय संस्‍थेकडून कर्ज घेणा-या (खुल्‍या प्रवर्गासाठी 10 टक्‍के लाभार्थी हिस्‍सा व 40 टक्‍के बँकेचे कर्ज. व अनुसूचित जाती/जमातीसाठी 5 टक्‍के लाभार्थी हिस्‍सा व 20 टक्‍के बँकेचे कर्ज) लाभार्थ्‍यांना या योजनेंतर्गत प्राधान्‍य दिले जाईल.

गाय म्हशी योजना लाभार्थी निवड निकष

सर्वसाधारण प्रवर्गातील तसेच अनूसूचित जाती/जमातींच्‍या लाभार्थ्‍यांची निवड पुढील प्राधान्‍यक्रमाने केली जाईल. 1)दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, 2) एक हेक्‍टर पर्यंतचे भूधारक असलेले अत्‍यल्‍प भूधारक शेतकरी, 3) 1 ते 2 हेक्‍टर पर्यंतचे भूधारक असलेले. अल्‍प भूधारक शेतकरी, 4) रोजगार व स्‍वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले सुशिक्षीत बेरोजगार. तसेच 5) वरील चारही गटात महिला बचत गटातील लाभार्थी.

गाय पालन योजना अटी व शर्ती

या योजनेचा लाभ मिळण्‍यासाठी लाभार्थ्‍याने करावयाच्‍या अर्जाचा नमुना व त्‍यासोबत जोडावयाची इतर आवश्‍यक कागदपत्रे याचा तपशील तसेच गोठयाचा आराखडा पशुसंवर्धन आयुक्‍त त्‍यांच्‍या स्‍तरावर निश्‍चित करुन क्षेत्रीय अधिका-यांना पाठवतील. तसेच अर्जाचा नमुना पशुसंवर्धन आयुक्‍त व जिल्‍हाधिकारी यांच्‍या कार्यालयाच्‍या संकेत स्‍थळावर उपलब्‍ध करुन दिला जाईल. या योजनेचे विहीत नमुन्‍यातील अर्ज पशुधन विकास अधिकारी (विस्‍तार), पंचायत समिती स्‍तरावर उपलब्‍ध असतील. निवडतांना 30 टक्‍के महिलांना लाभार्थ्‍यांना प्राधान्‍य दिले जाईल.

गाय म्हैस गट वाटप योजना कधी सुरु असते 

लाभार्थ्‍यांचे अर्ज स्‍वीकारण्‍यासाठी एक महिन्‍याची मुदत दिली जाईल. या मुदतीनंतर अर्ज स्‍वीकारले जाणार नाहीत. या अर्जांची वैधता ही त्‍या आर्थिक वर्षातील उपलब्‍ध तरतुदीच्‍या मर्यादेच्‍या अधीन असेल. तसेच कोणत्‍याही स्‍वरुपात सदरील अर्ज पुढील आर्थिक वर्षासाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. प्राप्‍त झालेल्‍या सर्व अर्जांची छाननी करुन एका महिन्‍याच्‍या कालावधीत जिल्‍हा निवड समितीमार्फत पात्र लाभार्थ्‍यांची निवड व प्रतीक्षा (Gai Gat Vatap Yojana) यादी करण्‍यात येईल.

या योजनेसाठी लाभार्थ्‍यांची निवड झाल्‍यावर लाभार्थ्‍यांनी एका महिन्‍याच्‍या कालावधीत लाभार्थी हिश्याची रक्‍कम अथवा बँकेचे कर्ज उभारणे आवश्‍यक राहील. असे न केल्‍यास प्रतीक्षा यादीवरील पुढील लाभार्थ्‍यास या योजनेंतर्गत लाभ दिला जाईल. एका कुटुंबातील एकाच व्‍यक्‍तीस या योजनेचा लाभ दिला जाईल. या योजनेंतर्गत लाभ मिळालेल्‍या लाभार्थ्‍यांस पुन्‍हा सदर योजनेचा लाभ मिळणार नाही. ही योजना शक्‍यतो क्‍लस्‍टर स्‍वरुपात आणि अस्‍तित्‍वातील/प्रस्‍तावित दूध संकलन मार्गावरील गावांमध्‍ये राबविली जाईल आणि त्‍यानुसार लाभार्थ्‍यांची निवड केली जाईल.

गाय म्हैस जास्त दुध देणाऱ्या म्हशी 

या योजनेमध्‍ये वाटप करावयाच्‍या दुधाळ जनावरांमध्‍ये एच एफ, जर्सी या संकरित गायी तसेच मु-हा व जाफराबादी या सुधारित जातीच्‍या म्‍हशी, प्रतिदिन 10 ते 12 लिटर दूध उत्‍पादन असलेल्‍या दुस-या/तिस-या वेतातील असाव्‍यात. शक्‍यतो 1-2 महिन्‍यापूर्वी व्‍यालेल्‍या संकरित गायी/म्‍हशींचे वाटप करण्‍यात यावे. दुधाळ जनावरे लाभार्थ्‍यांच्‍या पसंतीने खरेदी करावीत, अशा मार्गदर्शक सूचना करण्‍यात आलेल्‍या आहेत.

जिल्‍हा पशुसंवर्धन उपायुक्‍त यांच्‍या संयुक्‍त नावे 3 वर्षांसाठी विमा उतरविण्‍यात येईल. योजनेमध्‍ये वाटप केलेले जनावर मृत झाल्‍यास विम्‍याच्‍या पैशातून व खात्‍याच्‍या संमतीने लाभार्थ्‍यांना दुसरे जनावर खरेदी करुन पुरविण्‍यात येईल. सदर योजना राबवितांना प्रथमत: तीन दुधाळ जनावरांचा पुरवठा करण्‍यात येईल. सहा महिन्‍यानंतर किंवा सदरची तीन दुभती जनावरे आटल्‍यानंतर (यामधील जो कालावधी कमी असेल तदनंतर) उर्वरित तीन दुधाळ जनावरे पुरविण्‍यात येतील.


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार ऑनलाईन फॉर्म 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!