Funds Approved For Onion Subsidy | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कांदा अनुदानासाठी तब्बल 550 कोटींचा निधी मंजूर; वितरणासाठी लेखाशीर्ष जारी, जाणून घ्या सविस्तर

Funds Approved For Onion Subsidy: चालू वर्षी राज्यात फेब्रुवारी २०२३ च्या सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. हीच बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये,

खाजगी बाजार समित्यामध्ये थेट नाफेडकडे १ फेब्रुवारी २०२३ ते दि. ३१ मार्च २०२३ या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ३५० प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान (Onion Subsidy) शासन निर्णय घेण्यात आला होता. याबाबत आनंदाची बातमी समोर आलाय आहे.

Funds Approved For Onion Subsidy

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये, खाजगी बाजार समित्यामध्ये, थेट नाफेडकडे १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदाविक्री केलेल्या. तसेच या संदर्भात शासनपत्र दिलेल्या अतिरिक्त सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना रुपये ३५० प्रति क्विंटल.

तसेच जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति (Funds Approved For Onion Subsidy) शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यासाठी तब्बल ५५० कोटी इतकी रक्कम २०२३ च्या पावसाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आली आहे.

कांदा अनुदानासाठी निधी मंजूर

या रकमेपैकी रू.४६५.९९ कोटी इतकी रक्कम वितरीत करण्यास वित्त विभागाने मान्यता प्रदान केली आहे. या योनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी यांचे प्रस्ताव तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांनी तपासून ते जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचेकडे सादर केले आहेत. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी पात्र प्रस्तावांची छाननी करून ती यादी पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना मान्यतेसाठी सादर केली आहे.

कांदा अनुदानासाठी लेखाशिर्ष

  • २४२५ सहकार
  • १०७ सहकारी पत संस्थांना सहाय्य
  • (०१) सहकारी पत संस्थांना सहाय्य, (०१)२०८) कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य दत्तमत (अनिवार्य)
  • (२४२५ १४२१) ३३ अर्थसहाय्य

Leave a Comment