काय म्हणतात शेतकरी
गेल्या तीन वर्षापासून महागाईने कळस गाठला आहे. जुलै सप्टेंबर मध्ये अतिवृष्टीने नुकसान झाले. विहिरीला मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने रब्बी हंगामात तरी साध्य येईल असे वाटले होते.
परंतु खाताच्या प्रचंड झालेल्या दरवाढीमुळे पिकांना यावर्षी कमी प्रमाणात खतांचा वापर केला आहे. खतांच्या या किमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
केंद्र व राज्य सरकारची दुर्लक्ष झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणी येत आहेत. रब्बी हंगामात डीएपी खत वगळता सर्व खतांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे शासनाने खताचे दर नियंत्रण ठेवावे.
असे आहेत रासायनिक खताचे दर प्रतिगोनी
- 18-18-10 – 1300 रुपये
- 18- 48-0 – 1350 रुपये
- 10-26-26 – 1470 रुपये
- 12 32 16 1470 रुपये
- युरिया – 266 रुपये