Electric Water Pump Best | शेतात वापरा हे पंप! कितीही खोलीवरून शेतात पोहोचेल वेगात पाणी 1

Electric Water Pump : पिकापासून मिळणारे उत्पादन भरघोस मिळावे याकरिता व्यवस्थापन जितके महत्त्वाचे आहे तितकेच सिंचनाच्या मुबलक सुविधा असणे देखील महत्वाचे आहेत. पिकांना पाणी देण्याकरिता शेतकरी बंधू विहिरी, बोरवेल आणि शेततळ्यासारख्या सोयी सुविधा उभारतो.

Electric Water Pump

परंतु या ठिकाणाहून पिकांपर्यंत पाणी पोहोचवण्याकरिता तुम्हाला विद्युत पंपांची आवश्यकता भासते. याचा अनुषंगाने आपण शेतीमध्ये शेतकऱ्यांना उपयोगी पडतील अशा महत्त्वाच्या आधुनिक पंपांविषयी माहिती घेणार आहोत. ज्यांची शेतीच्या सिंचनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

शेतीतील सिंचनाकरिता महत्त्वाचे असे आधुनिक पंप

पाणबुडी पंप

1- सिंगल स्टेज सबमर्सिबल पंप हा पंप एकच टप्प्यामध्ये काम करणारा असून एका मोटारीच्या माध्यमातून ऑपरेट केला जातो. जर तुम्हाला लहान नदी किंवा ओढ्याचे पाणी शेतामध्ये न्यायचे असेल तर सिंगल स्टेज सबमर्सिबल पंप उपयोगाचा ठरतो.

2- मल्टीस्टेज सबमर्सिबल पंप हा जो काही सबमर्सिबल पंपाचा प्रकार आहे तो एकापेक्षा जास्त टप्प्यात काम करणारा असून तुम्हाला जर हाय प्रेशरने पाणी उंच असलेल्या ठिकाणावर न्यायचे असेल तर हा पंप तुम्हाला फायद्याचा ठरतो. समजा एखाद्या तलावातून किंवा कालव्यातून तुम्हाला उंच ठिकाणावर पाणी द्यायचे असेल तर मल्टीस्टेज सबमर्सिबल पंप फायद्याचा राहतो.

3- वर्टीकल सबमर्सिबल पंप साधारणपणे विहिरीमध्ये (Electric Water Pump) किंवा शेताच्या काठावर एखाद्या पाण्याच्या स्त्रोतापासून आपल्याला पाणी लिफ्ट करायचे असेल तर त्याकरिता व्हर्टिकल सबमर्सिबल पंपाचा वापर केला जातो.

सेंट्रीफ्यूगल पंप

सेंट्रीफ्युगल पंप हा उच्च दुहेरी कोन इम्पेलर द्वारे ऑपरेट होतो. त्याला जर अधिक उंचीवर लिफ्ट करायचे असेल तर खूप वेगाने पाणी उचलण्यासाठी या पंपाचा उपयोग केला जातो. शेतीसाठी सेंट्रीफ्युगल पंप हे खूप उपयोगाच्या असून खूप मोठ्या प्रमाणावर पाणी उंच जागेवर.

लिफ्ट करण्याची (Electric Water Pump) क्षमता यांच्यामध्ये असते. नाले तसेच विहिरी व कालवे तसेच तलावातून पाणी उंच ठिकाणावर शेतात लिफ्ट करण्याकरिता सेंट्रीफ्युगल पंप फायद्याचा ठरतो.

हायड्रोलिक रॅम पंप

हायड्रोलिक रॅम पंप देखील खूप महत्त्वाचा असून शेतीमध्ये जर तुम्हाला एका ठराविक उंचीपर्यंत पाणी न्यायचे असेल तर हा पंप हायड्रोलिक प्रणालीचा वापर करून ते पाणी उंचीवर पोहोचवण्यास मदत करतो. दाब आणि जलद कार्यक्षमता हे हायड्रोलिक रॅम पंपाची वैशिष्ट्य  आहेत. विहिरी किंवा तलाव आणि नाल्या मधून जर तुम्हाला शेतीत पाणी आणायचे असेल तर हायड्रोलिक रॅम पंप वापरतात.

2 thoughts on “Electric Water Pump Best | शेतात वापरा हे पंप! कितीही खोलीवरून शेतात पोहोचेल वेगात पाणी 1”

Leave a Comment