Eknath Shinde New Announcement | विद्यार्थी व पालकांना खुशखबर शिंदे सरकार विद्यार्थ्याना शिक्षणासाठी देणार 50 हजार

Eknath Shinde New Announcement: नमस्कार आपल्या शिंदे सरकारने विद्यार्थ्यांसाठी घेतला मोठा निर्णय आता सर्व विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी मिळणार आहे. 50 हजार रु तर ते नेमके कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. व कोणत्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना हे 50 हजार रु मिळणार आहे. व ते मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना काय करावे लागणार आहे. या विषयी सविस्तर माहिती वाचा.

Eknath Shinde New Announcement

देशात तंत्रशिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या वाढावी; तसेच मुलींना शिक्षणासाठी आर्थिक साह्य मिळावे. यासाठी इंजिनीअरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेणाऱ्या मुलींना दर वर्षी 50 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) प्रगती शिष्यवृत्ती योजनेंतर्गत महाराष्ट्रासह सर्व राज्यातील विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती गुणवतेच्या आधारावर देण्यात येणार आहे.

या विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रु 

‘एआयसीटीई’ने याबाबतची माहिती परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केली आहे. डिप्लोमा इन इंजिनीअरिंग या अभ्यासक्रमाला प्रथम वर्ष किंवा थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश घेण्यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

हेही वाचा : आता 40% अनुदानावर घरच्या छतावर बसवा सोलर panal येथे करा अर्ज 

देशभरातील राज्यांमधील एकूण पाच हजार विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती दहावीच्या गुणांच्या आधारावर किंवा प्रवेश घेतानाच्या पात्रता गुणांवर देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक विद्यार्थिनींनी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे.

काय असणार पात्रता पहा 

या शिष्यवृत्तीसाठी कुटुंबातील एकत्रित उत्पन्न आठ लाख रुपयांच्या आत असावे. अर्ज दाखल केल्यानंतर इन्स्टिट्यूटकडून अर्जांची पडताळणी करायची आहे. त्यानंतर तंत्रशिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) अर्जाची पडताळणी करून, शिष्यवृत्ती मिळण्याबाबत कार्यवाही करता येणार आहे.

महाराष्ट्रातील 624 विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात येईल. त्याचप्रमाणे ईशान्येकडील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सर्व पात्र विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात येईल.

शिष्यवृत्तीची अधिक माहिती आणि महत्त्वाच्या तारखांसाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल आणि ‘एआयसीटीई’ च्या वेबसाइटशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : कृषी सिंचन पंप साठी मिळतंय अनुदान येथे करा अर्ज व मिळवा लाभ 

गरजू विद्यार्थिनींना फायदा

आर्थिक दुर्बल घटकांमधील अनेक विद्यार्थिनींकडे शुल्क भरण्यासाठी आणि दैनंदिन खर्च भागवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पैसे नसल्याने त्या डिप्लोमाचे शिक्षण घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे काही विद्यार्थिनींना शिक्षणासाठी कोणतेही आर्थिक साह्य मिळत नसल्याने, आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते. यामुळे अशा गरजू विद्यार्थिनींसाठी ही शिष्यवृत्ती उपयोगी पडणार आहे.


📢 या फुलाची करा शेती महिन्याला मिळणार 15 लाख रु उत्पन्न :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!