E Sharm Card Online | ई श्रम कार्ड योजना ऑनलाइन फॉर्म सुरु येथे करा अर्ज

E Sharm Card Online | ई श्रम कार्ड योजना ऑनलाइन फॉर्म सुरु येथे करा अर्ज

Shram Kard Yojana 2022

E Sharm Card Online : नमस्कार मित्रांनो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे. इ श्रम कार्ड योजना या योजने अंतर्गत शेतकऱ्याना आर्थिक सहाय्य म्हणून मदत केली जाते. तर आपण बघू या कसे मीळणार आहे त्याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे. या विषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्या साठी हा लेख संपूर्ण वाचा.

ई श्रम कार्ड योजना 

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी. भारत सरकारनं एक पोर्टल विकसित केलं आहे.या पोर्टलवर नोंदणी केल्यास असंघटित क्षेत्रातील. कामगाराला 2 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळू शकणार आहे.आतापर्यंत देशभरातल्या 25 कोटींहून अधिक कामगारांनी या पोर्टलवर नोंदणी केल्याचं. भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयानं म्हटलं आहे.पण, हे पोर्टल नेमकं काय आहे? या पोर्टलवर जाऊन ई-श्रम कार्ड कसं काढायचं? आणि याचे फायदे काय आहेत, याचीच माहिती आपण आता जाणून घेणार आहोत.

E Sharm Card Online

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा एक राष्ट्रीय डेटाबेस तयार. करण्यासाठी भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयानं ई-श्रम पोर्टल विकसित केलं आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर संबंधित कामगाराला ई-श्रम कार्ड दिलं जाणार आहे.देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतात. यात बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घर कामगार, स्थानिक रोजंदारीर काम करणारे मजूर, भूमिहीन शेतमजूर व इतर असंघटित कामगारांचा समावेश होतो.

ई श्रम कार्ड योजना 

ई-श्रम कार्ड मिळवण्यासाठी कामगाराचं वय मात्र 16 ते 59 च्या दरम्यान असणं गरजेचं आहे.आयकर भरणारी तसंच EPFO (Employee provident fund organisation), ESIC (Employees state insurance corporation) चा सदस्य असलेली व्यक्ती मात्र यासाठी नोंदणी करू शकणार नाही.एकदा का या पोर्टलवर नोंदणी केली, की कामगारांना 12 अंकी युनिक कोड असलेलं ई-श्रम कार्ड दिलं जाईल. ज्याला यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर असं म्हटलं गेलं आहे.

कसा भरायचा ई श्रम कार्ड फॉर्म 
  • यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला e shram असं सर्च करायचं आहे. त्यानंतर ई-श्रम पोर्टलची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल
  • इथं Self Registration या रकान्यात आधारशी लिंक मोबाईल क्रमांक. आणि कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा म्हणजे पुढच्या रकान्यात दिसणारे अंक आणि अक्षरं जशीच्या तशी टाकायची आहेत.
  • त्यानंतर तुम्ही EPFO आणि ESIC चे सदस्य नाही असं सांगायचं आहे. या दोन्ही पर्यायांपुढील NOया पर्यायावर क्लिक करायचं आहे. आणि मग सेंड ओटीपी वर क्लिक करायचं आहे.
  •  मोबाईलवर आलेला ओटीपीटाकून सबमिटम्हणायचं आहे. पुढे आधार नंबर टाकायचा आहे. ओटीपी पर्यायावरील बरोबरची टिक तशीच ठेवायची आहे. आणि मग कॅप्चा टाकायचा आहे.
  • त्यानंतर मग नोंदणीसाठीच्या अटी आणि शर्थी मला मान्य आहेत, यासमोरील डब्ब्यात टिक करायचं आहे आणि मग सबमिट म्हणायचं आहे.
  • पुढे तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो टाकून validateवर क्लिक करायचं आहे.
  • मग तुम्हाला स्क्रीनवर तुमच्या आधार कार्डचे डिटेल्स नाव, जन्मतारीख पत्ता दिसेल. याखाली असलेल्या वरची सगळी माहिती बरोबर आहे, या डब्ब्यात तुम्हाला टिक करायचं आहे आणि मग continue to other detailsवर क्लिक करायचं आहे.
  • आता सगळ्यात आधी वैयक्तिक माहिती भरायची आहे. यात लग्नाचं स्टेटस, वडिलांचं नाव आणि सामाजिक प्रवर्ग टाकायचा आहे. पुढे अपंग असाल तर yesनसाल तर noवर टिक करायचं आहे.
  • त्यानंतर नॉमिनीचे डिटेल्स टाकायचे आहेत. यात नॉमिनीचं नाव, त्यांची जन्मतारीख, लिंग आणि तुमच्यासोबतचं नातं निवडायचं आहे. मग save and continue वर क्लिक करायचं आहे.
ई श्रम कार्ड चे फायदे 

ई-श्रम कार्ड हे आधारसोबत लिंक करण्यात आलं आहे. या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत सामाजिक सुरक्षेच्या योजना पोहोचवण्याचा सरकारचा उद्देश आहे.जसं की असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे अपघात विमा संरक्षण दिलं जाणार आहे. या योजनेत अपघाती मृत्यू आणि कायमचं अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये, आंशिक म्हणजेच काही प्रमाणात अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांचा लाभ दिला जातो.भविष्यात सर्व सामाजिक सुरक्षेच्या योजनांचा लाभ याच पोर्टलद्वारे दिला जाणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.


📢 सोलर कृषी पंप अनुदान योजना २०२२ सुरु :- येथे पहा 

📢 200 शेळ्या २५ बोकड अनुदान योजना २०२२ सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!