Digital Satbara Online | सातबारा उताऱ्यात 11 नवीन बदल, शेतकऱ्यांना मिळणार याचा फायदा, असा काढा घरबसल्या नवीन 7/12 उतारा

Digital Satbara Online : शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. राज्य सरकारच्या महसूल विभागाने सातबारा उताऱ्यात 11 नवीन बदल केले आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे असे सांगण्यात येत आहे.

Digital Satbara Online

गेल्या 50 वर्षांनंतर सातबारा उताऱ्यात 11 नवीन बदल करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना हे नवे सातबारा उतारे ऑनलाईन मिळणार आहे. आता सातबारा उतारे काढण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही. (Digital Satbara Online)

शेतकऱ्यांना आता ऑनलाईन पद्धतीने घरी बसून तलाठीच्या डिजिटल स्वाक्षरीसह सातबारा उतारा काढता येणार आहे. हा सातबारा उतारा सर्व सरकारी कामासाठी शेतकऱ्यांना वापरता येईल. तर हा डिजिटल सातबारा उतारा घरबसल्या कसा काढायचा जाणून घेऊया. (7/12 Online Maharashtra)

सातबारा उतारा असा काढा ऑनलाईन

 • सर्वप्रथम http://bhulekh.mahabhumi.gov.in/ ही वेबसाईट ओपन करा.
 • या वेबसाईटवर उजव्या बाजूला ‘Digitally Signed 7/12’ ऑप्शनवर क्लिक केल्यावर आपला 7/12’ नावाचं पेज ओपन होईल.
 • तुम्ही या अगोदर वेबसाईटवर नोंदणी केली असेल तर ‘लॉग-इन आयडी’ आणि ‘पासवर्ड’ टाका. जर पहिल्यांदा तुम्ही या वेबसाईटवर आला असाल,
 • तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून नोंदणी करा. त्यानंतर तुम्हाला सातबारा काढता येईल.
 • पहिल्यांदा सातबारा उतारा काढताना ‘OTP Based Login’ या ऑप्शनवर क्लिक करा. नंतर खालील चौकटीत मोबाईल नंबर टाकून, ‘Send OTP’ या ऑप्शनवर क्लिक करा.
 • तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो ओटीपी टाकून ‘Verify OTP’ या ऑप्शनवर क्लिक करा. ‘आपला सात-बारा’ नावाचे नवीन पेज ओपन होईल.
 • नवीन पेज मध्ये ‘Digitally signed 7/12’ ऑप्शनवर क्लिक करा.
 • नंतर ‘डिजिटल स्वाक्षरीत सातबारा’ असं शीर्षक असलेलं नवीन पेज ओपन होईल.
 • तिथे तुम्हाला 15 रुपये देऊन हा नवीन डिजिटल सातबारा उतारा मिळणार आहे. डिजिटल सहीचा सातबारा उतारा मिळवण्यासाठी फॉर्मवरील
 • संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे.
 • जिल्हा, तालुका व गाव निवडून सर्व्हे’ किंवा ‘गट नंबर’ सर्वांत शेवटी ‘डाऊनलोड’ ऑप्शनवर क्लिक करा.
 • तुमचा सातबारा डाऊनलोड होईल. या सातबारा उताऱ्यावर तलाठ्याची डिजिटल स्वाक्षरी असेल.

या पद्धतीने तुम्ही घरबसल्या ऑनलाईन नवीन डिजिटल 7/12 उतारा येत्या 1 ऑगस्टपासून काढता येणार आहे. तुम्ही देखील या पद्धतीचा अवलंब करून सातबारा उतारा काढून पहा. यामुळे शेतकऱ्यांनाचा वेळ देखील वाचणार आहे. (Satbara Utara Maharashtra Online 2022) आता तलाठी कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही. (how to get digital 7 12 utara online)


📢 नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रु. प्रोत्साहन अनुदान परिपत्रक जाहीर :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!