Digital Automatic Spray Machin | शेतकऱ्यांसाठी नवीन भेट ! पहा या फवारणी यत्राची काय आहेत वैशिष्ट्य

Digital Automatic Spray Machin | शेतकऱ्यांसाठी नवीन भेट ! पहा या फवारणी यत्राची काय आहेत वैशिष्ट्य

Digital Automatic Spray Machin

Digital Automatic Spray Machin: नमस्कार परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे शेतकऱ्यांना एक नवीन भेट दिली आहे. ती म्हणजे शेतकऱ्यांना आता संपूर्ण शेतात आपला फवारणी यंत्र घेऊन फिरायची गरज नाही.

आता या विद्यापिठाणे स्वयंम चालित फवारणी यंत्र निर्माण केले आहे. आणि या यंत्रासाठी पेट्रोल किंवा डिझेल ची आवश्यकता नाही हे यंत्र सोलर द्वारे चालणार आहे. तर या यंत्राची वैशिष्ट्य काय आहेत हे जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

Digital Automatic Spray Machin

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सौरऊर्जेवर (Solar Energy) आधारित स्वयंचलित फवारणी यंत्र विकसित केले आहे. हे यंत्र मोबाईल फोनद्वारे (Mobile Phone) नियंत्रित करता येते. या यंत्राचा वापर मूग, उडीद, सोयाबीन, तूर, हरभरा, ज्वारी, करडई, भुईमूग, गहू, मका, बाजरी इ. पिकामध्ये सुलभपणे करता येतो.

फवारणी खारक होणार कमी 

शेतीतल्या वाढत्या उत्पादनखर्चामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. मजुरांचा तुटवडा, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव या कारणांमुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडून जाते.

हेही वाचा : स्वताचा व्यवसाय सुरु करायचा आहे तर या योजने अतर्गत मिळतात 50 हजार ते 10 लाख रु कर्ज 

विशेषतः लहान शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसतो. यावर उपाय म्हणून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित यंत्रांचा वापर करण्याचा सल्ला शास्त्रज्ञांकडून दिला जातो. त्या अनुषंगाने हे स्वयंचलित फवारणी यंत्र महत्त्वाचे ठरणा आहे.

स्वयंचलित फवारणी यंत्राची वैशिष्ट्येः

 • हे यंत्र पूर्णपणे स्वयंचलित असून सौरऊर्जेवर चालते.
 • हे यंत्र १२ व्होल्ट क्षमतेच्या बॅटरीवर चालते. बॅटरी चार्ज होण्यासाठी साधारण तीन तास लागतात.
 • एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर हे यंत्र ६ तासांपर्यंत काम करू शकते.
 • या यंत्राद्वारे एका तासामध्ये साधारण २० ते २२ गुंठे क्षेत्रावर फवारणी करता येते.
 • यंत्राचे वजन साधारण ११० किलो असून यंत्रावर ४० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसवण्यात आली आहे.
 • फवारणीसाठी यंत्रामध्ये ६ बूम नोझल बसविण्यात आले आहेत. हे यंत्र एकावेळी ७५ ते ८० किलो इतके वजन उचलू शकते.
 •  यंत्रामध्ये ३६० अंशांमध्ये गोल फिरणारे कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे फवारणीसोबतच पिकाचे निरीक्षण करणे शक्य होते.
 • यंत्रावर विविध प्रकारचे आवाज येणारे स्पीकर बसवले आहेत. त्यामुळे वन्य प्राणी आणि पक्ष्यांपासून होणारे पिकाचे नुकसान टाळता येते.
 • या यंत्राने दीड किमी प्रति तास या वेगाने फवारणी होते. मोबाईल फोनद्वारे यंत्र नियंत्रित करता येते.

हेही वाचा : केद्र सरकार महिलांना देते आहे फ्री शिलाई मशीन येथे पहा माहिती 

 • यंत्राची रुंदी १.७ मीटर असून एकावेळेस त्याच्या आकाराएवढ्या क्षेत्रावर फवारणी करणे शक्य होते.
 • मूग, उडीद, सोयाबीन, तूर, हरभरा, ज्वारी, करडई, भुईमूग, गहू, मका, बाजरी इत्यादी पिकांमध्ये

📢 कडबा कुट्टी मशीन अनुदानात झाली मोठी वाढ आजच करा खरेदी :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!