Daughter Rights In Fathers Property | मुलीचा वडिलांच्या संपत्तीत किती वाट असतो ! पहा काय म्हणतो कायदा

Daughter Rights In Fathers Property: लग्न झाल्यावर मुलीचे माहेरशी संबंध संपतात, तसे अधिकारही कमी होतात असा पूर्वी समज होता. मात्र भारतातील कायद्यानं मुलीला वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार दिला आहे.

वडिलांनी मृत्युपत्रामध्ये काही लिहून ठेवले नसल्यास वडिलांच्या संपत्तीत मुलगा व मुलगी दोघांनाही समान वाटा मिळतो. मुलीचं लग्न झाल्यावर वडिलांची संपत्ती मुलीला मिळू शकते का? याविषयी अनेक गैरसमज आहेत. मात्र कायद्यात याविषयी सर्व बाजू स्पष्ट करण्यात आल्या आहेत. ‘टीव्ही 9 हिंदी’नं याविषयी वृत्त दिलं आहे.

Daughter Rights In Fathers Property

वडिलांच्या संपत्तीत मुलीला कायद्यानं समान अधिकार दिला आहे. लग्न झालेल्या मुलीकडे आई राहत असेल, तर टॅक्सचा विचार केल्यास आईकडचे सोन्याचे दागिने हे मुलीचे जास्तीचे दागिने मानले जाणार नाहीत. अशा प्रकरणांमध्ये आयकर सहायता संघाच्या विशाखापट्टणाम शाखेनं मुलीच्या सासरी राहणाऱ्या आईला मुलीच्या सासरच्या मंडळींपैकी एकच असल्याचं मानलं जातं असं म्हटलं आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डानं (CBDT) 1994 च्या सूचनेअंतर्गत सोनं ठेवण्याविषयी मर्यादा निश्चित केली आहे. ज्याला इन्कम टॅक्स बसत नाही, अशा व्यक्तीला सोन्याचे दागिने घरात किती ठेवायचे, याची मर्यादा निश्चित केलेली आहे.

मुलीचा वडिलांच्या संपत्तीत किती वाट असतो 

देशातील सोने नियंत्रण कायदा यापूर्वीच रद्द झाला आहे. त्यामुळे सोनं घरात ठेवण्याबाबत कोणतीही मर्यादा नाही. मात्र सीबीडीटीनं सोन्याच्या दागिन्यांबाबत एक मर्यादा निश्चित केली आहे.

हेही वाचा : मिनी tractor साठी शासन देते आहे 90% अनुदान येथे पहा माहिती

विवाहित स्त्री तिच्याकडे 500 ग्रॅमचे सोन्याचे दागिने ठेवू शकते, तर अविवाहित स्त्री 250 ग्रॅम सोन्याचे दागिने ठेवू शकते. पुरुष विवाहित किंवा अविवाहित असतील, तरी त्यांच्यासाठी व कुटुंबातील इतर सदस्यांसाठी ही मर्यादा 100 ग्रॅम इतकीच आहे.

मुलीला वडिलांच्या संपत्तीत अधिकार असतो

मुलीला वडिलांच्या संपत्तीत अधिकार असतो, मात्र वडिलांच्या माघारी त्यांनी संपत्तीबाबत मृत्यूपत्र करून कोणाला. संपत्तीचा अधिकार दिला असेल, तर मुलीला किंवा मुलाला वडिलांची संपत्ती मिळत नाही. वडिलांनी कोणतंही कागदपत्र केलं नसेल, तर वडिलांच्या संपत्तीत सर्व मुलांना समान अधिकार असतो. लाईव्ह लॉ हिंदी वेबसाईटनं या विषयी वृत्त दिलं आहे.

काय आहे कायदा 

हिंदूंना या संदर्भात हिंदू उत्तराधिकार कायदा लागू होतो, तर मुसलमान व्यक्तींना मुस्लिम पर्सनल लॉ लागू होतो. हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या 1956च्या अधिनियमानुसार मुलगा आणि मुलीला वडिलांच्या संपत्तीत समान अधिकर मिळतो. विवाहित मुलीलाही वडिलांच्या संपत्तीत तितकाच अधिकार असतो. लग्न झालेली मुलगीही वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा मागण्यासाठी दावा करू शकते.

वडिलांची संपत्ती स्वकष्टानं मिळवलेली असल्याचं न्यायालयात सिद्ध झालं तर मुलीला संपत्तीत समान वाटा मिळतो. वारसा हक्कानं वडिलांना मिळालेली संपत्ती काही प्रमाणात मुलीला मिळते. मुस्लिमांच्या बाबतीत परिस्थिती थोडी वेगळी होती. मात्र आता भारतीय उत्तराधिकार कायदा लागू करून मुस्लिम मुलीला तिच्या वडिलांच्या संपत्तीत समान वाटा मिळवून दिला जातो.

हेही वाचा : आता 40% अनुदानावर आपल्या घरच्या छतावर बसवा सोलर panal येथे करा अर्ज 

मुलींचे काय असतात अधिकार 

वडिलोपार्जित मालमत्तेबाबत मुलीचे अधिकार थोडे वेगळे आहेत. वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे पूर्वजांकडून मिळालेली संपत्ती. आधीच्या कायद्यानुसार मुलगी लग्न करून दुसऱ्या घरी जाते, त्या परिस्थितीत मुलीचे अधिकार थोडे कमी होतात. मात्र 2005मध्ये हिंदू उत्तराधिकार कायद्यात बदल करून वडिलोपार्जित संपत्तीतही मुलीला समान अधिकार देण्यात आले आहेत.

मुलीना कधी मिळतो संपत्तीत वाट 

वडिलांनी कायदेशीर कागदपत्रं करून संपत्तीच्या हक्काविषयी नोंद करून ठेवली असेल, तर त्यानुसारच वडिलांच्या माघारी संपत्तीचं वितरण होतं. वडिलांनी मृत्यूपत्रात मुलींच्या नावे काहीच संपत्ती ठेवली नसेल व त्याची कायदेशीर नोंद केली असेल, तर मुलींना संपत्तीत वाटा मिळत नाही. स्वकष्टानं मिळवलेल्या संपत्तीबाबत मृत्युपत्र करता येतं. वडिलोपार्जित संपत्तीबाबत करता येत नाही. त्यामुळे त्या संपत्तीत मुलीला समान वाटा मिळू शकतो.

मुलीने स्वत:च वारसा हक्क नको असं कायदेशीररित्या जाहीर केलं असेल तर तिला वडिलांपश्चात त्यांच्या अर्जित किंवा वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मिळत नाही.


📢 कडबा कुट्टी मशीन साठी शासन देते आहे 50% अनुदान :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सूर :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!