Cycle Vatap Yojana | आता सायकलसाठी सरकारकडून मिळतंय 5 हजार रुपये अनुदान; असा करा अर्ज

Cycle Vatap Yojana: अनेक गावांत इयत्ता 7वी पर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय असते. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घ्यावा लागतो. विद्यार्थ्यांसमोर 7वी नंतर विद्यार्थ्यांच्या समोर शाळेत प्रवास करण्याचा प्रश्न निर्माण होतो. खास करून मुलांपेक्षा मुलींसाठी हा मोठा प्रश्न आहे. पण आता मुलींना काळजी करण्याची गरज नाही.

Cycle Vatap Yojana

राज्यातील इयत्ता 8वी ते 12वीचे शिक्षण घेत असलेल्या मुलींना सायकल खरेदी करण्यासाठी ‘मानव विकास कार्यक्रम अंतर्गत’ 5000 रुपये अनुदान दिले जाईल. तर या लेखात योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊया..

सायकल वाटप योजनेची वैशिष्ट्ये

 • राज्य सरकारने मोफत वाटप सायकल योजना सुरू केलेली आहे.
 • फक्त गरजू मुलींनाच इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शालेय शिक्षण घेत असलेल्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
 • या योजनेमुळे मुलींना सायकल घेण्यासाठी कुणावर अवलंबून राहण्याची गरज नाही.
 • या योजनेची अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही सरकारी कार्यालयात चकरा मारायची गरज नाही.
 • या योजनेचा लाभ DBT मार्फत मुलींच्या बॅंक खात्यात जमा होईल.
 • या योजनेमुळे इयत्ता 7वी नंतर मुलींना शाळेच्या प्रवासासाठी कोणतीही अडचण येणार नाही.

हेही वाचा : पीएम किसान मानधन योजने अतर्गत मिळणार 36 हजार दरवर्षी 

योजनेची पात्रता

 • योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी ही इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असावी.
 • मुलीच्या घरापासून ते शाळेपर्यंतचे अंतर 5 किलोमीटर पेक्षा जास्त असणं आवश्यक आहे.
 • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मुलगी सायकलसाठी गरजू असावी.
 • इयत्ता आठवी ते बारावीप या चार वर्षामध्ये सायकल खरेदी करण्यासाठी एकदाच अनुदान दिल्या जाईल.
 • सदरील मुलगी ही सरकारी, जिल्हा परिषद किंवा कोणत्याही सरकारी अनुदानित शाळेत शिक्षण घेत असावी.
योजनेचा लाभ

योजनेच्या लाभाची रक्कम दोन टप्प्यांत ‘डीबीटी’ प्रणालीद्वारे जमा होईल. पहिल्या टप्प्यात मुलींच्या बॅंक खात्यात 3500 रुपये जमा होईल. तर दुसऱ्या टप्प्यात खरेदीची पावती जोडून काही कागदपत्रे सादर केल्यानंतर उरलेले 1500 रुपये जमा होऊन जाईल.

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

 1. आधार कार्ड
 2. राशन कार्ड
 3. निवासप्रमाण पत्र
 4. मोबाईल नंबर
 5. ई-मेल आयडी
 6. बॅंक खाते
 7. विद्यार्थ्यांनी इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिकत असल्याचे शालेय प्रमाणपत्र
 8. सायकल खरेदी केल्याची पावती

हेही वाचा : 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान येथे पहा माहिती 

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी असा करा अर्ज

योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थींनाला स्वतःच्या शाळेच्या कार्यालयातून किंवा मुख्याध्यापकांकडून या योजनेचा अर्ज घेऊन अर्जामध्ये विचारलेली माहिती भरावी आणि आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज शाळेत जमा करावा.

तसेच तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन नियोजन विभागाला भेट द्यावी. येथे देखील तुम्हाला दिलेला अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावी.


📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना अतर्गत शेळी,मेंढी,कुकुट,गाई ,म्हशी पालन साठी देते अनुदान :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!