Currency Nots Rules Change: भारतात नोटाबंदी झाली. केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीनंतर भारतीय चलनाबाबत अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत. तुमच्याकडेही 500 रुपयांची नोट असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. 500 रुपयांच्या नोटेबाबत रिझर्व्ह बँकेने माहिती दिली आहे.
Currency Nots Rules Change
500 च्या 2 प्रकारच्या नोटा बाजारात उपलब्ध आहेत आणि दोन्ही नोटांमध्ये फारच कमी फरक आहे. या दोन प्रकारच्या नोटांपैकी एक नोट बनावट असल्याचे म्हटले जात आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, व्हिडिओतील नोट बनावट असल्याचे सांगण्यात आले. तर आम्ही तुम्हाला सांगतो खऱ्या नोटा कोणत्या आहेत.
व्हिडिओमध्ये काय म्हटले होते?
व्हिडीओमध्ये असे म्हटले आहे की, तुम्ही ५०० रुपयांची कोणतीही नोट घेऊ नका, ज्यामध्ये हिरवी पट्टी आरबीआय गव्हर्नरच्या स्वाक्षरीतून जाते किंवा गांधीजींच्या फोटोच्या अगदी जवळ असते.
या व्हिडिओमध्ये एक प्रकारची नोट बनावट असल्याचे बोलले जात आहे. पीआयबीने या व्हिडिओची सत्यता तपासली, त्यानंतर त्याचे सत्य समोर आले आहे.
शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दोन्ही प्रकारच्या नोटा आहेत,
मूळ व्हिडिओची सत्यता तपासणी केल्यानंतर हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट असल्याचे समोर आले आहे. बाजारात चालणाऱ्या दोन्ही प्रकारच्या नोटा खऱ्या आहेत. तुमच्याकडे 500 ची नोट असेल तर घाबरण्याची अजिबात गरज नाही. दोन्ही प्रकारच्या नोटा वैध असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घ्या,
तुम्हालाही असा काही मेसेज आला तर अजिबात काळजी करू नका. असे (Currency Nots Rules Change) फेक मेसेज कोणाशीही शेअर करू नका. याशिवाय तुम्ही कोणत्याही बातमीची तथ्य तपासणी देखील करू शकता.
यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकला भेट द्यावी लागेल . याशिवाय, तुम्ही व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 किंवा ईमेल : pibfactcheck@gmail.com वर व्हिडिओ पाठवू शकता .
📢 पाईप लाईन साठी शासन देणार 80% अनुदान :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजनेचे नवीन अर्ज सुरु :- येथे पहा