Crop Loan Maharashtra 2022 | राज्य सरकारचा मोठा निर्णय ! शेतकऱ्यांना मिळणार 3 लाख बिन व्याजी कर्ज

Crop Loan Maharashtra 2022: शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. करोना प्रतिबंधक नियमांच्या अधीन राहून या निर्णयाची ग्रामसभा स्तरावर जनजागृती करून प्रभावीपणे अंमलबजावणी करा.

अर्थसहाय्य बाबत शेतकऱ्यांच्या समस्यांची सन्मानाने सोडवणूक करून मागील वर्षाच्या तुलनेत कर्ज वाटपाचे. उद्दिष्ट वाढवून ३० जूनच्या आत शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप करा. असे निर्देश महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बँक शाखा अधिकाऱ्यांना दिले.

Crop Loan Maharashtra 2022

Crop Loan सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात सोमवारी तालुक्यातील खरीप पीककर्ज बाबत आढावा बैठक झाली. या वेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या व पीककर्ज संदर्भात अधिकाऱ्यांना निर्देशित केले.

या वेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी डॉ. अशोक दांडगे, सहाय्यक दुय्यम निबंधक ज्ञानेश्वर मातेरे यांच्यासह तालुक्यातील विविध बँकेचे शाखा अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: शेतकऱ्याला आपल्या शेतात पाईप लाईन करण्यासठी शासन देत आहे अनुदान पहा ते किती 

का घेतला हा निर्णय

सत्तार म्हणाले,अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यातच करोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी पुरता हवालदिल झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खते बियाणे घेण्यासाठी वेळेत पैसे मिळाले पाहिजे. शेतकरी सावकाराच्या तावडीत जाऊ नये,यासाठी सरकार विविध योजना आखत आहेत.

अशा वेळी शेतकऱ्यांच्या समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन पिककर्जासाठी शेतकऱ्यांना बँकेत चकरा माराव्या लागणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. कर्ज मागणीसाठी ऑनलाइनऐवजी ऑफलाइनचा पर्याय बॅंकेने ठेवावा.

हेही वाचा : 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान संपूर्ण माहिती जाणून घ्या

कोणत्या बँक देणार कर्ज 

बँकांनी गावात ग्रामसभा घेऊन पीककर्ज, शैक्षणिक कर्ज अशा विविध योजनांची माहिती देऊन जास्तीत. जास्त शेतकऱ्यांनी सरकारच्या तीन लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्जाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे, राज्य सरकारने तीन लाख रुपयांपर्यंत हमी घेतलेली आहे.

याचे व्याज सरकार भरणार आहे. त्यामुळे बँकांनी याची चिंता करू नये असे स्पष्ट करीत यापुढे शेतकऱ्यांची तक्रार येता कामा नये. नवीन कर्जदारांच्या संचिका तात्काळ निकाली काढून जास्तीत जास्त. शेतकऱ्यांना पिककर्जाचा लाभ द्या असे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी या वेळी दिले.


📢 खरीप हंगाम 2022-23 साठी सर्व रासायनिक खताचे भाव जाहीर :- येथे पहा 

📢 कांदा चाळ योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!