Cow Pregnancy Best | गाय म्हैस गाभण राहत नाही का? करा हा घरगुती उपाय मिळेल खूप फायदा 1

Cow Pregnancy: पशुपालन व्यवसायामध्ये आर्थिक नफा मिळण्याच्या दृष्टिकोनातून गाई किंवा म्हशी गाभण राहण्याला खूप महत्त्व आहे. कारण या माध्यमातूनच दुधाचे उत्पादन अवलंबून असल्यामुळे आणि दूध उत्पादनावरच सगळी पशुपालनाची मदार असल्यामुळे ही बाब खूप महत्त्वाची आहे.

व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून पशुपालन व्यवसायामध्ये खूप काळजी घ्यावी लागते. या सगळ्या व्यवस्थापनामध्ये जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचे असून तुमच्या सगळ्या व्यवसायाची मदारच जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनावर असते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

Cow Pregnancy

परंतु बऱ्याचदा गाय किंवा म्हैस गाभण न राहण्याची समस्या उद्भवते व ही समस्या पशु पालकांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून खूपच नुकसानदायक असते. याकरिता अनेक प्रकारच्या उपाययोजना देखील पशुपालकांकडून केल्या जातात.परंतु त्याचा काही फायदा मिळतो असे बरेचदा दिसून येत नाही. याचा अनुषंगाने या लेखांमध्ये आपण काही घरगुती उपाय पाहणार आहेत जे गाय किंवा म्हैस 100% गाभण राहण्यासाठी  उपयुक्त ठरतील.

जर तुमच्या गोठ्यातील गाय किंवा म्हैस गाभण राहत नसेल तर तुम्ही कमी खर्चाचा एक घरगुती उपाय करू शकतात. याकरिता तुम्हाला सगळ्यात अगोदर हळकुंडाची आवश्यकता भासेल. ते तुम्ही आणल्यानंतर त्याची भुकटी करणे गरजेचे आहे.

साधारणपणे दीडशे ग्रॅम बुकटी तयार होईल एवढे हळकुंड तुम्ही विकत (Cow Pregnancy) आणणे गरजेचे आहे. या माध्यमातून तुम्ही जनावरांना सात दिवसाचा डोस तयार करू शकतात. यातील पहिल्या टप्प्यातील डोस प्रति दिवस 20 ग्रॅम जनावराला देणे गरजेचे असून त्यामुळे खूप मोठा फायदा मिळतो.

गाय  म्हैस गाभण राहण्यासाठीचा घरगुती उपाय

तसेच याकरता तुम्हाला थोडे गव्हाचे पीठ देखील लागते. गव्हाचे पीठ तुम्ही तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे व यामध्ये गुळ किंवा साखर मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर या गव्हाच्या पिठाचा हलवा तयार करायचा आहे आणि हा हलवा तयार झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला 20 ग्रॅम हळद पावडर टाकायची आहे.

म्हणजेच एका दिवसाकरिता 20 ग्रॅम हळद यामध्ये टाकणे (Cow Pregnancy) गरजेचे आहे. त्यानंतर हे मिश्रण तुम्ही जनावरांना खाऊ घालावे. यामध्ये काळजी घेण्याची गोष्ट म्हणजे हे मिश्रण तुम्ही जनावरांना देताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

जसे की तुम्हाला ज्या जनावरांना हे मिश्रण द्यायचे असेल तर त्यांचा चारा खाऊन झाल्यावर ते द्यावे. प्रामुख्याने संध्याकाळी आठ ते नऊच्या सुमारास हे मिश्रण जनावरांना दिले तर फायद्याचे ठरते. हे मिश्रण देताना पहिल्या टप्प्यातील मिश्रण जनावरांना सात दिवस देणे गरजेचे आहे.

सात दिवसानंतर तुम्हाला बऱ्यापैकी फरक दिसून येईल. हे मिश्रण (Cow Pregnancy) एक किंवा दोन दिवस न देता ते सात दिवस संपूर्णपणे देणे गरजेचे आहे. तसेच जनावरांना हे मिश्रण दिल्यानंतर कोणत्याही प्रकारचा चारा आणि पाणी देऊ नये. या मिश्रणाने गाय किंवा म्हशीच्या गर्भाशयामध्ये ज्या समस्या असतात त्या दूर होण्यास मदत होते.

जनावरे उलटण्यावर उपाय

बऱ्याचदा जनावर गाभण राहिल्यानंतर देखील उलटतात. परंतु त्यावर देखील एक फायदेशीर घरगुती उपाय आहे. त्यासाठी तुम्ही सदाहरी वनस्पतीचा वापर करू शकतात. याच वनस्पतीला दगडी पाला किंवा कंबरमोडी असे देखील म्हटले जाते. ही वनस्पती तुम्ही रानातून घरी नेऊन स्वच्छ पाण्याने तिला धुवून घ्यायची आहे व त्यानंतर ज्या जनावराला हा उपाय करण्याची गरज आहे त्या जनावराला पाचशे ग्राम या प्रमाणात खाऊ घालायचे आहे.

ही वनस्पती तुम्ही दोन पद्धतीने जनावराला (Cow Pregnancy) खाऊ घालू शकता. जर तुम्ही कुट्टीच्या स्वरूपात चारा देत असाल तर या कुट्टीमध्ये मिक्स करून तुम्ही जनावरांना खायला देऊ शकतात किंवा तुमच्या हाताने देखील जनावरांना खाऊ घालू शकतात. याचा देखील खूप मोठा फायदा जनावरे उलटण्याच्या समस्येवर होतो.