Cotton Management | शेतकऱ्यांनो, कापसाचे खत व्यवस्थापन असे करा; उत्पादनात होईल मोठी वाढ

Cotton Management: यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीचे प्रमाण वाढले. मागील हंगामात कापसाचा भाव 13 ते 14 हजार पर्यंत गेला. यामुळे कपाशी लागवडीचे प्रमाण वाढले. पण मागील हंगामात जास्त अतिवृष्टीने कापसाचे अपेक्षित उत्पन्न झाले नाही. कापसाचे उत्पादन वाढविण्यासाठी व्यवस्थापन असणं आवश्यक आहे. वेळोवेळी जे पिकांना आवश्यक असतं ते मिळायला हवं.

Cotton Management

यंदा कपाशीचे प्रमाण वाढले जरी4860-2 असले, तरी पण कापसाचा भाव चांगला राहील. कापसाची या वर्षी देखील मोठी मागणी असल्याचा अंदाज आहे. मागील वर्षी अतिवृष्टीने कापसाचे अपेक्षित जरी उत्पादन झाले नसेल, तरी पण कापसाला दर चांगला मिळाल्याने शेतकऱ्यांना फायदा झाला. यंदा शेतकरी जास्तीत जास्त कपाशीचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतील.

जास्त उत्पादन घेण्यासाठी योग्य पद्धतीने कपाशीचे व्यवस्थापन झालं पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांनी कपाशीच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे. यामध्ये खत व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे आहे. कापसाचे खत व्यवस्थापन कसे करावे हे या लेखात जाणून घेऊया.

कापसाचे खत व्यवस्थापन

कपाशीला एकरी 100 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 50 किलो पालाश शिफारस केली गेलेली आहे. परंतु, त्यासोबत कापूस तेलवर्गीय पीक असल्याने, कापसाला गंधक (Sulphur) या दुय्यम अन्नद्रव्याची NPK सोबत गरज असते. नेहमी कापूस आणि सोयाबीनचे पिके घेतल्यामुळे जमिनीतील गंधक कमी झालेले असते, त्यासाठी रासायनिक गंधक खत देणे गरजेचं आहे.

 हेही वाचा :- 200 गाई पालन साठी शासन देते 50% अनुदान येथे करा ऑनलाईन अर्ज 

लागवडी नंतर पहिले खताचे व्यवस्थापन

कपाशी लागवडीच्या 20 ते 30 दिवसाच्या दरम्यान खत देणे आवश्यक आहे. यामध्ये आपण एकरी एक बॅग 10:26:26+ 10 किलो गंधक किंवा एकरी एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट (दाणेदार) 25 किलो नत्र+ 25 किलो पोटॅश किंवा एकरी एक बॅग 20:20:0:13 किलो पोटॅश घेऊ शकता.

दुसरे खताचे व्यवस्थापन

कपाशी लागवडीच्या 40 ते 50 दिवसाच्या दरम्यान एकरी एक बॅग डीएपी + 25 किलो पोटॅश + सुक्ष्म अन्नद्रव्ये 10 किलो असे खताचे व्यवस्थापन करावे.

हेही वाचा :- कुकुट पालन साठी शासन देते 75% अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज 

तिसरे खताचे व्यवस्थापन

कपाशी लागवडीनंतर 65 व्या दिवशी एकरी दाणेदार एक बॅग + एक युरिया बॅग + 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट असे खत व्यवस्थापन करावे.

चौथे खत व्यवस्थापन

कपाशी लागवडीच्या 90 दिवसांनंतर कपाशीला नत्राची गरज असल्यामुळे एकरी एक युरिया खत द्यावे.

अशाप्रकारे शेतकरी कापसाचे खत व्यवस्थापन करू शकता. यामुळे कपाशीच्या उत्पादनात वाढ होईल. अशाच प्रकारची महत्वाची माहिती आम्ही शेतकऱ्यांना पुरवित असतो. आपणं देखील ही माहिती पुढे शेतकऱ्यांना नक्की शेअर करा.


📢 खरीप पिक विमा 2022-23 सठी ऑनलाईन अर्ज सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!